मराठी बातम्या /बातम्या /explainer /50 वर्षात बिकिनीतून बुरख्यात कसा गेला इराण? हिजाबवरुन का जातोय महिलांची जीव?

50 वर्षात बिकिनीतून बुरख्यात कसा गेला इराण? हिजाबवरुन का जातोय महिलांची जीव?

इराणमध्ये 1979 पूर्वी स्त्रिया पुरुषांसोबत बीचवर बिकिनी घालून मजा करू शकत होत्या. पण आज या सर्व गोष्टींसाठी मनाई आहे. हिजाबमुळे महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर बिकिनी परिधान केलेल्या इराणी महिलांचे अनेक फोटो शेअर करून हिजाबचा उघडपणे विरोध केला जात आहे.

इराणमध्ये 1979 पूर्वी स्त्रिया पुरुषांसोबत बीचवर बिकिनी घालून मजा करू शकत होत्या. पण आज या सर्व गोष्टींसाठी मनाई आहे. हिजाबमुळे महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर बिकिनी परिधान केलेल्या इराणी महिलांचे अनेक फोटो शेअर करून हिजाबचा उघडपणे विरोध केला जात आहे.

इराणमध्ये 1979 पूर्वी स्त्रिया पुरुषांसोबत बीचवर बिकिनी घालून मजा करू शकत होत्या. पण आज या सर्व गोष्टींसाठी मनाई आहे. हिजाबमुळे महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर बिकिनी परिधान केलेल्या इराणी महिलांचे अनेक फोटो शेअर करून हिजाबचा उघडपणे विरोध केला जात आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    तेहरान, 20 सप्टेंबर : हिजाब (Hijab) न घातल्याने इराणमध्ये (Iran) पोलिसांच्या क्रूरतेला 22 वर्षांची महसा अमिनी (Mahsa Amini) ही विद्यार्थिनी बळी पडली. या घटनेमुळे इस्लामिक देशात (Islamic Country) पुन्हा निदर्शनं सुरू झाली आहेत. इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये अनेक महिला हिजाब जाळून टाकताना दिसत आहेत. इराणची न्यूज एजन्सी एतेमादने दिलेल्या वृत्तानुसार, महसा अमिनी ही तरुणी तिच्या भावासोबत तेहरानमधल्या हघानी मेट्रो स्टेशनसमोर उभी होती. त्यावेळी हिजाबची सक्ती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मोरॅलिटी पोलिसांनी (Morality Police) या विद्यार्थिनीला अटक केली. त्यानंतर महसा हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. इराणमध्ये कधीकाळी महिला बिकिनी (Bikini) परिधान करून मुक्तपणे फिरू शकायच्या, तिथं अचानक हिजाब न घातल्यामुळे त्यांची हत्या का होत आहेत, अशी चर्चा या प्रकरणानंतर जगभरात सुरू झाली आहे.

    घुसमट सुरू

    1950 च्या दशकात अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या (CIA) पाठिंब्यामुळे सत्तेवर निवडून आलेल्या मोहम्मद रजा पहलवी यांनी या इस्लामिक देशात बरेच बदल केले. महिलांना मतदानाच्या अधिकारापासून ते कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यापर्यंतचे अनेक बदल यात समाविष्ट होते. यामुळे महिलांनी समुद्र किनाऱ्यावर शॉर्ट्स आणि बिकिनी परिधान करुन फिरणं अगदी सामान्य झालं होतं. क्लब आणि बारमध्येही महिला पुरुषांसोबत जाऊ शकत होत्या. मात्र, इस्लामिक क्रांतीनंतर परिस्थिती झपाट्याने महिलांच्या विरोधात गेली. आता महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे कपडे परिधान करण्याची तसंच केस मोकळे सोडून फिरण्याची परवानगी नाही.

    बिकिनी ते बुरखा

    इराणच्या बाहेर राहून `माय स्टेल्थी फ्रीडम` नावाची संस्था चालवणऱ्या मसीह अलीनेजादी यांनी सांगितलं, ``केसांना मोकळी हवा मिळावी असं इराणी महिलांना वाटतं. एकेकाळी स्विमसूटमध्ये बोल्ड दिसणाऱ्या महिलांच्या केसांना आज मोकळी हवा मिळणंही दुरापास्त झालं आहे. इराणमधल्या क्रांतीनंतर जन्मलेल्या महिलांना आजपर्यंत आपल्या केसांना मोकळी हवा देता आलेली नाही. महिला या गोष्टीचा अनेकदा विरोध करतात पण त्यांना संस्काराचे धडे देण्याच्या नावाखाली मोरॅलिटी पोलिसांकडून जबरदस्तीने अटक केली जाते आणि मारहाणही केली जाते,`` असं अलीनेजादी यांनी सांगितलं.

    या संदर्भातले अनेक व्हिडिओ अलीनेजादी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केले आहेत. महिलांनी सैल हिजाब घातल्याबद्दल त्यांना जबरदस्तीने अटक केली जात असल्याचं या व्हिडिओंमध्ये दिसतं. 1979 पूर्वी इराणमध्ये महिला बिकिनी परिधान करून पुरुषांसोबत समुद्रात आनंद घेऊ शकत होत्या. पण आज त्यांना एकत्र आंघोळ करण्यास मनाई आहे. हिजाबमुळे झालेल्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर (Social Media) बिकिनी परिधान केलेल्या इराणी महिलांचे अनेक फोटो शेअर करून हिजाबला उघडपणे विरोध केला जात आहे. अशाच एका वृत्तात ब्रिटनची न्यूज वेबसाईट डेली स्टारने घट्ट स्विमसूट घातलेल्या इराणी महिलांच्या फोटोचा खरपूस समाचार घेतला आहे. ``आजच्या काळात असा विचार करणंही महिलांना अशक्य झालं आहे,`` असं या वेबसाइटनं म्हटलं आहे.

    गश्त-ए-इर्शादकडून समवयस्क मुलांसोबत खेळणाऱ्या मुलींना होतेय अटक

    इराणमधील महिलांवर नजर ठेवण्यासाठी 2005 मध्ये मोरॅलिटी पोलीस अर्थात गश्त-ए-इर्शादची (Gasht-e-Irshad) या विभागाची स्थापना करण्यात आली. हे पोलीस अनेकदा रस्त्यावरील महिलांना वाहनांमध्ये ओढून नेताना दिसतात. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाचे मुख्य अधिकारी इस्माईल अहमदी यांच्या मते, मोरॅलिटी पोलीस दरवर्षी सुमारे 36 लाख महिलांना अटक करतात. इराणची वेबसाइट इराण वायरने दिलेल्या माहितीनुसार, मुली, तरुणी आणि वृद्ध महिलांनी हिजाब घातला नाही तर पोलीस त्यांना अटक करतात. यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. 2019 मध्ये एका लहान मुलीला मुलांसोबत खेळल्याबद्दल अटक केल्याचं प्रकरणही वादात सापडलं होतं.

    वाचा - हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांकडून भयंकर शिक्षा, 22 वर्षीय अमिनीचा दुर्देवी मृत्यू

    हिजाब परिधान न केल्याने राष्ट्रीय खेळाडूला घातल्या गोळ्या

    इराण वायरच्या वृत्तानुसार, 28 एप्रिल 22 रोजी इराण नॅशनल बॉक्सिंग टीमचे माजी सदस्य आणि चॅम्पियन रझा मोरदाखानी यांना हिजाबच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणानंतर गोळ्या घालण्यात आल्या. मोरॅलिटी पोलिसांनी त्यांची पत्नी मारिया आरेफी यांना अयोग्य पद्धतीनं डोक्यावर स्कार्फ घातल्याने रोखलं तेव्हा ही घटना घडली. दरम्यान या वादावादीत पोलिसांनी महिलेला बेदम मारहाण करत तिच्या पतीवर एकामागून एक चार गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास काही महिन्यांनंतर सोडून देण्यात आलं.

    कारवर चढून जाळला हिजाब

    मोरॅलिटी पोलिसांच्या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला आता उघडपणे आंदोलन (Agitation) करत आहेत. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबला तीव्र विरोध सुरू झाला आहे. इराणवर वार्तांकन करणाऱ्या पत्रकार गोलनाझ इसफंदियारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर निषेध म्हणून हिजाब जाळणाऱ्या महिलेचा फोटो पोस्ट केला आहे. इराण पोलिसांसमोर हिजाब जाळणारी ही महिला सर्वोच्च नेते खामेनी यांच्या विरोधातही घोषणा देताना दिसत आहे. आंदोलक खुलेआम हिजाब काढून `डेथ टू खामेनी` अशा घोषणा देत आहेत.

    ट्विटरवर 20 लाखांहून अधिक लोकांनी नोंदवला निषेध

    इराणमधील पर्शियन ट्विटर वेबसाईटवर (Persian Twitter) देशातल्या सुमारे 20 लाख लोकांनी हिजाबच्या विरोधात ट्विट केले आहेत. `रॉयटर्स`ने दिलेल्या माहितीनुसार, मृत महसा अमिनीच्या समर्थनार्थ `#MahsaAmini` हॅशटॅगला 20 लाखांहून अधिक लोकांनी ट्विट केलं आहे. ट्विटसोबत अनेक महिला हिजाबशिवाय आपले फोटो शेअर करत मोरॅलिटी पोलिसांचा धिक्कार करत आहेत.

    या महिलांना पाठिंबा देत इराणमधील सुधारणावादी नेते आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद खतामी यांनी हिजाबप्रकरणी मोरॅलिटी पोलिसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तथापि, अल जझिराच्या वृत्तानुसार, विरोध होत असतानाही इराण पोलिसांनी हिजाबच्या अंमलबजावणीबाबत अधिक कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

    First published:

    Tags: Iran, Women