जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / महाराष्ट्र पोलिसांचा 'ब्रिटिश कालीन' युनिफॉर्म आता बंद होणार? वाचा काय आहे कारण

महाराष्ट्र पोलिसांचा 'ब्रिटिश कालीन' युनिफॉर्म आता बंद होणार? वाचा काय आहे कारण

महाराष्ट्र पोलिसांचा 'ब्रिटिश कालीन' युनिफॉर्म आता बंद होणार? वाचा काय आहे कारण

राज्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) ते उपअधीक्षक (DYSP) रँकपर्यंतच्या अधिकार्‍यांनी ट्युनिक युनिफॉर्म (Tunic Uniform) वापरणं बंद करावं, असं या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र (Maharashtra) हे आपल्या देशात चर्चेत असलेलं राज्य समजलं जातं. देशातील आर्थिक घडमोडींचं केंद्र, उद्योगधंदे, बॉलिवुड इंडस्ट्री, शिक्षण संस्था यामुळे राज्यात सतत काहीनाकाही घडामोडी घडत असतात. अशा या गजबजलेल्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचं काम सांभाळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल (Maharashtra Police Force) कार्यरत आहे. देशातील सर्वांत मोठ्या पोलीस दलांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास दोन लाख महिला आणि पुरुष कर्मचारी आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे यांनी बुधवारी (9 फेब्रुवारी 2022) काढलेल्या एका सर्क्युलरमुळे (Circular) पोलीस दल चर्चेत आलं आहे. राज्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) ते उपअधीक्षक (DYSP) रँकपर्यंतच्या अधिकार्‍यांनी ट्युनिक युनिफॉर्म (Tunic Uniform) वापरणं बंद करावं, असं या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक (SP) आणि त्यावरील रँकचे अधिकारी या युनिफॉर्मचा वापर सुरू ठेवू शकतात, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डीजीपी संजय पांडे यांनी काढलेल्या सर्क्युलरनंतर ट्युनिक युनिफॉर्म म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ट्युनिक युनिफॉर्म हा ब्रिटिश काळातील (British Era) एक ओव्हरकोट (Overcoat) आहे, जो पोलीस दलाच्या पारंपरिक युनिफॉर्मवर घातला जातो. पूर्वी आणि आत्तासुद्धा ब्रिटिश पोलीस अधिकारी (British Police Officers) या ट्युनिक युनिफॉर्मचा वापर करतात. वसाहतीकरणाच्या काळात ब्रिटिशांनी भारतामध्येसुद्धा पोलिसांना याच प्रकारचा युनिफॉर्म दिला होता. आजतागायत त्याचा वापर केला जातो. ब्रिटिश पोलीस थंड हवामानात (Cold British Climate) काम करत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा युनिफॉर्म योग्य ठरतो. मात्र, उच्च तापमान आणि आर्द्रता यामुळे महाराष्ट्रासह भारतातील बहुतेक राज्यांमध्ये ट्युनिक युनिफॉर्मचा वापर केवळ सेरेमोनियल परेडपर्यंतच (Ceremonial Parades) मर्यादित ठेवला गेला आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा पोलीस अधिकारी कोटवर क्रॉस बेल्ट (Cross Belt) घालतात आणि सोबत तलवार (Sword) हातात घेतात.

    हे वाचा -  Wow! असं असणार तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन; पहिल्यांदाच समोर आला PHOTO

    आता महाराष्ट्र पोलीस दलानं या ट्रॅडिशनल युनिफॉर्मचा वापर काहीअंशी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसकम्फर्ट (Discomfort ) म्हणजे वापरण्यास असुलभ आणि जास्त किंमत (Expensive) या दोन कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं डीजीपींच्या सर्क्युलरमध्ये नमूद केलं आहे. उष्ण वातावरणात ट्युनिक युनिफॉर्म घालणं गैरसोयीचं ठरतं. शिवाय तलवार, शर्ट, पँट, टाय आणि कोट यासह संपूर्ण सेट मिळवणं जास्त खर्चिक होतं, असं काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी डीजीपींना कळवलं होतं. अधिकाऱ्यांच मत आणि युनिफॉर्मची कालबाह्यता लक्षात घेऊन, डीजीपींनी सर्क्युलर जारी केलं. डीजीपींच्या सर्क्युलरमुळे आता राज्यातील डीवायएसपींपासून खालील रँकच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक युनिफॉर्मपासून कायमची सुटका झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात