भारतात रेल्वे, मोनो रेल, मेट्रोनंतर आता बुलेट ट्रेनही धावणार आहे. भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं काम तितक्यातच वेगाने सुरू आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर सर्वात आधी तयार होणारं भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन म्हणजे गुजरातमधील सूरत. रेल्वे मंत्रालयाने या स्टेशनचे काही ग्राफिकल फोटो शेअर केले आहेत.
डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनही डायमंडच्या डिझाइनमध्ये आहे. (फोटो सौजन्य - रेल्वे मंत्रालय)
या बहुमजली इमारतीत सेंट्रलाइझ्ड एसी, स्वयंचलित जिने आणि बिझनेस लाऊंज अशा सुविधा आहेत. (फोटो सौजन्य - रेल्वे मंत्रालय)
अगदी एअरपोर्टसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा या सूरत बुलेट रेल्वे स्टेशनवर मिळणार आहे. या स्टेशनचं काम डिसेंबर 2024 सालापर्यंत पूर्ण होणार आहे. (फोटो सौजन्य - रेल्वे मंत्रालय)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. जो भारत जपानच्या मदतीने साकारत आहे.
नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (NHSRCL) यांचं काम केलं जातं आहे. 320 किलोमीटर प्रति ताशी वेगाने ही ट्रेन चालवली जाईल
तब्बल 508 किमी लांबीचा हा मार्ग आहे. यावर एकूण 12 स्टेशन असणार आहे. यामध्ये साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई यांचा समावेश आहे.