जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / MayBach Car | पंतप्रधानांची नवीन कार म्हणजे अभेद्य किल्लाच जणू! एकाहून एक सरस वैशिष्ट्ये

MayBach Car | पंतप्रधानांची नवीन कार म्हणजे अभेद्य किल्लाच जणू! एकाहून एक सरस वैशिष्ट्ये

Prime Minister New Fort like MayBach Car : पंजाबमधील फिरोजपूरच्या सभेला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. पण, पंतप्रधान ज्या नवीन मर्सिडीज मेबॅक कारमध्ये स्वार असतात, ती सुरक्षिततेच्या दृष्टीने एखाद्या अभेद्य किल्याप्रमाणे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेली कार एका अभेद्या किल्ल्यासारखी सुरक्षित आहे. या कारमध्ये VR10 लेव्हलचे संरक्षण मिळते. परिणामी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हे कार वापरतात. कारची बॉडी विशिष्ट धातूपासून तयार केली आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचा गोळीबार आणि गोळीचा परिणाम होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेली कार एका अभेद्य किल्ल्यासारखी सुरक्षित आहे. या कारमध्ये VR10 लेव्हलचे संरक्षण मिळते. परिणामी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हे कार वापरतात. कारची बॉडी विशिष्ट धातूपासून तयार केली आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचा गोळीबार आणि गोळीचा परिणाम होत नाही.

मेबॅक कारच्या आजूबाजूला कोणी स्फोट घडवून आणला तरीही तिला काहीही होणार नाही. या कारपासून 2 मीटर अंतरावर 15 किलो टीएनटीचा स्फोट झाला तरी ती सहज सहन करू शकते. गाडीवरील पॉली कार्बोनेट कोटींग स्फोटापासून तिचे संरक्षण करते. या कारच्या काचेवरही गोळी वा स्फोटाचा कोणताही परिणाम झालेला नाही.

जर मेबॅक एस 650 गार्ड कारवर गॅसने हल्ला केला तर कारमधील केबिन त्वरित गॅस सेफ चेंबरमध्ये बदलते. बॅकअपमधून लगेचच ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होतो. कारमध्ये ऑक्सिजन टाकी देखील आहे. यात सेल्फ-सीलिंग इंधन आहे, ज्यामुळे इंधनाचा कोणत्याही स्थितीत स्फोट होऊ शकत नाही.

या कारमध्ये भूसुरुंगांना तोंड देण्याची क्षमताही आहे. गाडीच्या खाल्या बाजूला आर्मर प्लेट्स लावल्या केल्या आहेत. यामध्ये आपत्कालीन एक्झिट देखील आहे.

या लक्झरी कारचे इंटीरियर अतिशय खास असून आतमध्ये भरपूर जागा आहे. सीटजवळील विविध बटणांमध्ये अनेक प्रकारचे कंट्रोल आहेत. ही एस-क्लास इतर मर्सिडीज कारपेक्षा लांब आहे.

या आलिशान कारमध्ये एक्सटर्नल कम्युनिकेशन सिस्टम आहे, याचा अर्थ कारमध्ये आपण सतत दळणवळणाच्या साधनांच्या संपर्कात असतो. पंतप्रधानांच्या ताफ्यात अशा तीन गाड्या आहेत, ज्यामध्ये ते कोणत्याही गाडीत बसू शकतात. उरलेल्या दोन गाड्या नंतर डमी गाड्यांप्रमाणे काफिल्यात फिरतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात