Home /News /explainer /

गंगूबाई काठियावाडी आता OTT वर! काय आहे ओटीटी प्लॅटफॉर्म? चित्रपट कसे कमावतात पैसे?

गंगूबाई काठियावाडी आता OTT वर! काय आहे ओटीटी प्लॅटफॉर्म? चित्रपट कसे कमावतात पैसे?

कोविड-19 महामारी नसती तर प्रत्येकजण आलिया भट्टचा (alia bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्येच गेला असता. आजकाल ओटीटी रिलीजमधून चित्रपट निर्मात्यांना चांगला नफा मिळत असल्याचे समोर आले आहे. OTT प्लॅटफॉर्मवर व्यवसायाचे गणित काय आहे ते जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 एप्रिल : तब्बल तीन वर्षांनंतर चित्रपटगृहे पूर्णपणे उघडली आहेत. कोरोनाच्या काळात लोकांनी OTT प्लॅटफॉर्मवरच घरबसल्या त्यांच्या मनोरंजनाचा शोध घेतला. सिनेमा हॉल सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या भीतीने अनेकजण गर्दीत जाण्याचे टाळत आहेत. अशा परिस्थितीत आलिया भट्टच्या चाहत्यांना तिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे. आलिया भट्टचा (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai kathiawadi) पाहण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला असेल की ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट निर्माते नेमका कसा पैसा कमवतात? एका अहवालानुसार, जर आजकाल एखादा चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित झाला, तर सुमारे 80 टक्के महसूल OTT अधिकारांमधून येतो आणि 20 टक्के नफा सॅटेलाइट अधिकारांमधून येतो. OTT वर चित्रपटांच्या व्यवसायाचे गणित काय आहे ते जाणून घ्या. ओटीटी म्हणजे काय? खरं तर, ओटीटी हा शब्द ओव्हर-द-टॉपचा एक छोटा प्रकार आहे. जेव्हा इंटरनेटमुळे टीव्ही कंटेंट पाहण्याची सुविधा मिळाली, म्हणजेच केबलचा डबा सुटला आणि हातातल्या स्मार्ट फोनवर टीव्हीचे सर्व कार्यक्रम बघता आले, तेव्हा या प्लॅटफॉर्मला ओटीटी म्हटलं गेलं. भारतातील OTT प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज, कॉमेडी कार्यक्रम आणि टीव्हीसह चित्रपटांचे स्ट्रीमिंग खूप लोकप्रिय आहे. OTT मधून चित्रपट कसे कमाई करतात? ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांच्या कमाईचे गणित सरळ आहे. OTT ला चित्रपटांचे रिलीज किंवा स्ट्रीमिंगसाठी हक्क विकत घ्यावे लागतात. निर्मात्याला हक्कासाठी रक्कम मिळते. हा करार एकाच चित्रपटाच्या वेगवेगळ्या भाषेतील आवृत्त्यांसाठी वेगवेगळा असतो, म्हणजेच प्रत्येक आवृत्तीचे हक्क स्वतंत्रपणे हाताळले जातात. Bhool Bhulaiyaa 2 मध्ये 'छोटे पंडित' दिसणार; मग अक्षय कुमार-विद्या बालनचा पत्ता का केला कट? दुसरीकडे, काही चित्रपटांची निर्मिती OTT प्लॅटफॉर्मद्वारे केली जाते. म्हणजेच, OTT प्लॅटफॉर्म विशेषतः चित्रपटासाठी करार करतो. जसा HBO एक OTT प्लॅटफॉर्म आहे, जो केवळ त्याच्या प्लॅटफॉर्मसाठी चित्रपट बनवण्याच्या व्यवसायात आहे. या डीलमध्ये प्लॅटफॉर्म चित्रपट निर्मात्यांना एक निश्चित रक्कम देते आणि निर्माते त्यापेक्षा कमी रकमेमध्ये चित्रपट बनवतात, म्हणजे उर्वरित रक्कम त्यांचा नफा असतो. OTT नफा कसा मिळवतात? जर चित्रपट निर्माते अशा प्रकारे नफा कमवत असतील म्हणजेच OTT प्लॅटफॉर्म त्यांना पैसे देत असतील तर या प्लॅटफॉर्मचा नफा कसा होतो. या व्यवसायात प्रामुख्याने तीन प्रकारच्या पद्धती प्रचलित आहेत. जेव्हा TVOD म्हणजेच OTT चा प्रत्येक वापरकर्ता कोणतीही सामग्री डाउनलोड करतो, तेव्हा त्यासाठी शुल्क भरावे लागते. म्हणजेच, प्रत्येक डाउनलोडवर एक व्यवहार होतो. SVOD चा अर्थ असा आहे की कोणताही वापरकर्ता दरमहा किंवा ठराविक कालावधीसाठी रक्कम देतो आणि त्या प्लॅटफॉर्मची सर्व सामग्री पाहू शकतो. AVOD हा तिसरा मार्ग आहे, सामग्री पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु, वापरकर्त्याने सामग्रीच्या दरम्यान जाहिराती पाहणे आवश्यक आहे. जसे की यूट्यूब विनामूल्य आहे. परंतु, व्हिडिओच्या मध्यभागी जाहिराती पहाव्या लागतील. या जाहिरातींद्वारे OTT ची कमाई होते. Tiger Shroff ला पाहून 'जबरा फॅन'ला आली चक्कर, 'हिरो'ने चाहतीसाठी केलं असं काही... पाहा VIDEO एकूणच OTT वरील बिझनेस मॉडेल अतिशय सोपे आहे. प्रथम प्लॅटफॉर्म त्याची सामग्री तयार करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करते आणि त्यानंतर प्रेक्षक किंवा वापरकर्त्यांकडून शुल्क घेऊन सामग्री विकली जाते. ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. त्याच वेळी ती व्यवसाय जगतात निगेटीव्ह कॅश प्लो प्रणाली आहे. दुसरीकडे, अनेक प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांच्या सोयीनुसार दर आठवड्याला, दरमहा, दररोज आणि वार्षिक पेमेंट सिस्टम देखील प्रदान करतात. चित्रपटगृहांना पर्याय म्हणून ओटीटी हे निश्चितच एक व्यासपीठ आहे. त्याचे फायदे आणि तोटे आहेत. परंतु, तरीही चित्रपट निर्मातेच नाही तर प्रेक्षकही चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या शब्दात सांगायचे तर, सिनेमा जो लार्जर-दॅन-लाइफ अनुभव देतो तो टीव्ही किंवा छोट्या पडद्यावर पूर्णपणे मिळत नाही. चित्रपटगृहात चित्रपट पाहणे हा एक सामाजिक उत्सव आणि सामूहिक अनुभव असतो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Gangubai kathiawadi, OTT

    पुढील बातम्या