Home /News /explainer /

mParivahan: गाडी चालवताना DL किंवा RC घेऊन जायला विसरलात? फोनमध्ये असे करा सेव्ह, नाही होणार दंड

mParivahan: गाडी चालवताना DL किंवा RC घेऊन जायला विसरलात? फोनमध्ये असे करा सेव्ह, नाही होणार दंड

mParivahan अॅपच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (Driving licence) यासारखी महत्त्वाची कागदपत्रे स्मार्टफोनवर डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात.

  मुंबई, 29 जानेवारी : अनेकदा लोक त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स (Driving licence) किंवा वाहनाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे विसरतात आणि वाहतूक पोलिस अधिकारी त्यांना तपासणीदरम्यान पकडतात. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन सरकारने यासाठी अधिकृत अॅप तयार केले आहे. mParivahan असे या अॅपचे नाव आहे. या mParivahan अॅपच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि वाहन चालविण्याचा परवाना यांसारखी आवश्यक कागदपत्रे स्मार्टफोनवर डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात. हे अॅप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे आणि अॅप स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. डॉक्युमेंट्सचे व्हर्च्युअल स्वरूप मूळ कागदपत्रांइतकेच वैध आहेत. त्याला व्हेरीफाय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ट्रॅफिक इन्स्पेक्टरने तुम्हाला थांबवले तर तुम्ही स्मार्टफोनवर डीएल किंवा आरसीसारखी कागदपत्रे दाखवू शकता. या अॅपच्या मदतीने व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करण्यासाठी, तुमच्याकडे वाहन नोंदणी क्रमांक आणि मूळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा जन्मतारीख देखील टाकावी लागेल. त्यामुळे या कागदपत्रांनंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. असे अॅप डाउनलोड करा अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनवर अॅपल अॅप स्टोअरवर जा. येथे mParivahaan नावाने अॅप शोधा. अॅपवर क्लिक केल्यानंतर, इंस्टॉल वर टॅप करा. व्हर्च्युअल आरसी डाउनलोड कसे करावे mParivahaan अॅप उघडा. वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ओळींवर टॅप करा.

  Traffic पोलिसांनी कापलं चुकीचं Challan, असं करा कॅन्सल; भरावे नाही लागणार पैसे

  येथे Sign in पर्यायावर टॅप करा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि एसएमएस सत्यापन कोड प्रविष्ट करा. आता अॅपच्या होम स्क्रीनवर जा आणि RC वर टॅप करा. सर्च क्षेत्रात वाहन क्रमांक प्रविष्ट करा आणि शोधा. अॅप नोंदणी क्रमांकाशी संबंधित डेटा आपोआप मिळेल. आता तुम्ही Add to dashboard वर टॅप करून RC जोडू शकता. व्हर्च्युअल DL असे करा डाउनलोड होमस्क्रीनवरील RC टॅबवर टॅप करा. आता सर्च क्षेत्रात DL क्रमांक टाकून शोधा. यानंतर DL शी लिंक केलेला सर्व डेटा अॅपमध्ये दिसेल. आता तुम्हाला फक्त Add to dashboard वर टॅप करायचे आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Apps, Driving license

  पुढील बातम्या