नवी दिल्ली, 28 जानेवारी : ट्रॅफिक पोलिसांनी
(Traffic Police) जर तुमचं चालान
(Challan) चुकून कापलं किंवा तुमची चूक नसताना चालान कापण्यात आलं असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुमचं चालान कॅन्सल करण्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय आहेत. याबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवरही कॉल करू शकता. त्याशिवाय जवळच्या ट्रॅफिक पोलीस स्टेशनमध्येही याबाबत माहिती देऊ शकता. चालान कॅन्सल करताना खरोखर चूकीचे नाहीत, हेदेखील पाहाणं गरजेचं आहे.
या ठिकाणी तुमची तक्रार घेतली नाही, तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता. जर तुम्ही तुमची चूक नसल्याचं सिद्ध केलं तर तुम्हाला चालान भरण्याची गरज लागणार नाही.
जर तुम्ही कार, ट्रक, बाइक, स्कूटर चालवत असाल, तर तुमचं चालान कधीही नियमांचं पालन न केल्यास कापलं जाऊ शकतं. चूक नसताना चालान कापलं गेलं, तर सर्वात आधी जवळच्या ट्रफिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागेल. जर चालान कापण्याची वेळ आणि त्या दिवसाबाबत तुम्ही योग्यरित्या सिद्ध करुन देऊ शकलात, की तुमची चुकी नाही, आणि ही बाब त्यांनी मान्य केली, तर तुमचं चालान रद्द केलं जाऊ शकतं.
चुकीच्या कापलेल्या चालानबद्दल तुम्ही कोर्टातही आव्हान देऊ शकता. कोर्टात कोणत्या कारणासाठी चालानबद्दल चॅलेंज करत आहात ते सांगावं लागेल. कोर्टात याबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यावेळी तुम्ही कोणतीही चूक केली नाही, कोणत्या ठिकाणी होतात अशी सर्व माहिती द्यावी लागेल. कोर्टाने तुम्ही सांगितलेली चुकीचं चालान कापलं गेल्याची बाब मान्य केली, तर ते रद्द केलं जाईल आणि पैसे भरण्याची गरज लागणार नाही.
दरम्यान, ट्रफिक पोलिसांनी ओव्हर स्पीडिंग, रेडलाइट जंपिंग आणि स्टॉप लाइनहून पुढे गाडी थांबवणं यासारख्या ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाची माहिती ठेवण्यासाठी कॅमेरे लावले आहेत. या कॅमेरातून ट्रफिक नियम मोडणाऱ्यांची नंबर प्लेट ऑटोमेटिक रीड करुन चालान जनरेट केलं जातं.
काही वेळेला नंबर प्लेटवर चिखल-माती असल्याने किंवा नंबर योग्यरित्या लिहिला नसल्याने गाडीचा नंबर नीट दिसत नाही आणि चुकीचं चालान कापलं जाऊ शकतं. नंबर प्लेट नीट रीड न झाल्याने चुकी करणाऱ्या व्यक्तीऐवजी दुसऱ्याचं चालान कापलं जातं. परंतु अशाप्रकारे चुकीचं चालान कापलं गेलं असल्यास तुम्ही ते रद्द करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.