मराठी बातम्या /बातम्या /explainer /Amarnath Cloudburst : खरंच आभाळ फाटतं का? ढगफुटी म्हणजे नेमकं होतं तरी काय?

Amarnath Cloudburst : खरंच आभाळ फाटतं का? ढगफुटी म्हणजे नेमकं होतं तरी काय?

अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

श्रीनगर, 08 जुलै : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) असलेल्या अमरनाथमध्ये ढगफुटी झाली आहे (Amarnath Cloudburst update). या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या प्रवाहाने अक्षरश: हाहाकार माजवल्याची माहिती मिळाली आहे.  महादेवाच्या दर्शनासाठी अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या भाविकांवर मोठं संकट कोसळलं आहे (Amarnath Cloudburst video). या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पण ही ढगफुटी नेमकं म्हणजे काय आणि कशी होते ते पाहुयात.

खरंतर, पाण्याच्या बाष्पीभवनामुळे ढग तयार होतात हे पाठ्यपुस्तकात आपण शिकलो आहोत. पण जेव्हा गरम हवा आणि आर्द्रता वाढते तेव्हा ढगामधील पाण्याचं प्रमाण देखील वाढतं. अब्जावधी थेंब जेव्हा ढगांमध्ये विखुरले जातात तेव्हा जोरदार पाऊस पडतो. अगदी थोड्या कालावधीत जास्तीत जास्त पाऊस कोसळला तर त्याला ढगफुटी म्हणता येते. जेव्हा एका मिनिटाच्या आत तब्बल दोन इंचाहून अधिक पाऊस कोसळतो त्याला आपण ढगफुटी म्हणू शकतो.

हे वाचा - अमरनाथमध्ये ढगफुटी, देवाच्या दारात मोठं संकट, यात्रेला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

खरंतर, ढगफुटी या शब्दातच याचा अर्थ दडला आहे. एखादी पाण्याची भली मोठी टाकी हवेत पकडली आणि तिचा तळचं निघाला त्यावेळी टाकीतील पाणी जसं वेगानं खाली कोसळेल. ढगफुटी होतानाही असंच घडतं. फरक एवढाचं की इकडे टाकीचा तळ निघतो तिकडे आभाळ फाटतं.

टाकी ही काही हजार लिटरपर्यंत असून शकते. पण ढगांचं तसं नसतं. ढग हे कित्येक मैल पसरलेले असतात. एखाद्या संपूर्ण शहाराला पाण्याखाली घेण्याची ताकद एखाद्या ढगात असून शकते. अशा आक्राळ विक्राळ ढगाला, खालच्या बाजूने भगदाड पडलं तर, अब्जावधी गॅलन पाणी भरलेले हे ढग जमीनीच्या दिशेनं कोसळतात. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरशः फाटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो. याचा आकारमान आपल्या कल्पनेपेक्षा खूपच मोठा असतो. यातील पाण्याचे थेंब 3.5 मिमीहून मोठे असू शकतात.

हे वाचा - अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 5 भाविकांचा मृत्यू, पावसाचं रौद्र रुप दाखविणारा भयंकर Video

कधीकधी ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. हा स्तंभ पाण्याच्या थेंबांना घेऊन वरच्या दिशेनं जातो. यामुळे आकाशात चक्रीय स्थिती तयार होऊन अनेक ढग एकत्र येतात. अनेक ढग एकत्र आल्यानंतर हवेचा स्तंभ जितक्या वेगानं वरच्या दिशेला गेलेला त्याच्यापेक्षा अधिक वेगान जमिनीच्या दिशेनं झेपावतो. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेयितील ढगफुटीचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला होता. त्यात तुम्ही हे स्पष्टपणे पाहू शकता. @Theia32314852 ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ. यात तुम्ही ढगफुगी म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्षात पाहू शकता.

कमी वेळात खूप जास्त पाऊस झाल्यानं हे पाणी जमिनीत न मुरता जिकडे वाट मिळेल, त्या दिशेने पुढे सरकते. या पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो की, वाटेत येणारी झाडं, घरं, वाहनं देखील प्रवाहासोबत वाहून जातात.

First published:

Tags: Explainer, Jammu and kashmir, Lifestyle, Rain