मुंबई, 7 ऑक्टोबर : यंदाचे सर्व नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. नोबेल पुरस्कार दरवर्षी सहा श्रेणींमध्ये दिले जातात. त्यात साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र आणि शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका प्रश्नावर हमखास चर्चा होते. तो म्हणजे गणितानं काय घोडं मारलंय? इतका महत्त्वाचा विषय असूनही या पुरस्काराचे संस्थापक आल्फ्रेड नोबेल यांनी त्याचा विचारही केला नाही. काही लोक यामागे आल्फ्रेड नोबेल यांना प्रेमात धोका मिळाल्याचा अँगल सांगतात.
नोबेल पुरस्कारात गणिताचा समावेश नसल्याबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला जातो. आल्फ्रेड नोबेल यांना गणितज्ञ आवडत नसल्याचं म्हटलं जातं. कारण, एका मॅथेमेटेशियनचे त्यांच्या पार्टनरसोबत अफेअर होते. वास्तविक, आल्फ्रेड नोबेल यांनी कधीही लग्न केले नाही.
एक मोठा मॅथेमेटेशियन त्यांच्या पार्टनरला गेला घेऊन
असे म्हटले जाते की आल्फ्रेड नोबेलने गणितातील नोबेल पुरस्काराचा ट्रेंड सुरू केला नाही. कारण, त्यांना हे पारितोषिक स्वीडिश गणितज्ज्ञ गोस्टा मिटाग-लेफ्लर यांच्याकडे जाईल अशी भीती होती. आल्फ्रेड नोबेलची पार्टनर सोफी हेस हिच्याशी लेफ्लरचे अफेअर होते. आल्फ्रेड नोबेल दीर्घकाळ सोफी हेससोबत रिलेशनशिपमध्ये होते.
आल्फ्रेड नोबेलची पार्टनर सोफी हेस हिचं एका गणितज्ज्ञाशी असलेल्या अफेअरमुळे गणितातील नोबेल पारितोषिक दिले जात नाही याची पुष्टी इतिहासकार करत नाहीत. नोबेलने कधीही लग्न केले नाही. मात्र, त्यांनी सुरुवातीला एका महिलेला प्रपोज केलं होतं. तिचे नाव अलेक्झांड्रा होते, तिने त्यांची ऑफर नाकारली. त्यामुळे आल्फ्रेड याचे मन तुटलं.
पुन्हा सेक्रेटरीसोबत प्रेम
यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रेम आलं. पण, वेगळ्या पद्धतीने. ते त्यांच्या सेक्रेटरी बर्था किन्सेच्या प्रेमात पडले. पण, काही लोक याकडे प्रेम म्हणून पाहत नाहीत तर एडजस्टमेंट म्हणून पाहतात. कारण, सेक्रेटरी किन्सेचं काही काळापूर्वीच आपल्या प्रियकरासोबत ब्रेकअप झालं होतं. दोघेही रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण किन्सी आल्फ्रेडला कंटाळली. ती पुन्हा जुना प्रियकर बॅरन आर्थर गुंदेकरकडे परतल्यानंतर त्याच्याशी लग्नही केले.
सोफी 18 वर्षे एकत्र राहिल्यानंतर गणितज्ञासोबत निघून गेली
आल्फ्रेड यांना कदाचित आयुष्यातील तिसऱ्या प्रेमाचा, सोफी हेसचा सर्वात मोठा धक्का सहन करावा लागला होता. ज्यांच्यासोबत ते एक-दोन नव्हे तर 18 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अर्थात, त्यांनी एकमेकांशी लग्न केले नाही. मात्र, जेव्हाही आल्फ्रेड यांनी पत्र लिहिले तेव्हा त्यांनी सोफीला मॅडम सोफी नोबेल असंच लिहीत होते. नोबेल वगळता ज्या व्यक्तीशी हेसचे प्रेमसंबंध होते, ती एक गणितज्ञ होती, ज्यांच्याबद्दल तुम्ही वर वाचले आहे.
कदाचित म्हणूनच लेफलरशी त्यांचे संबंध कटूच राहिले. आल्फ्रेड नोबेलला गोस्टा मिटाग-लेफलर आवडत नसल्याचे म्हटले जाते. त्यांच्यातील संबंध इतके बिघडले होते की आल्फ्रेड नोबेल यांनी केवळ त्यांच्यामुळेच गणितातील नोबेल पारितोषिक ठेवले नाही. या महिलांशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणतीही महिला आल्याची नोंद नाही.
आल्फ्रेड नोबेल यांना गणितात रस नव्हता
वास्तविक, नोबेल पुरस्कार एखाद्या अविष्कारक किंवा शोधकाला देण्याच्या कल्पनेने सुरू झाला आहे. असा शोधकर्ता ज्याच्या शोधाचा संपूर्ण जगाला फायदा होईल. एक व्यापारी आणि शोधक असल्याने, आल्फ्रेड नोबेलला असे वाटले की गणित खूप सैद्धांतिक आहे. त्याला त्याच्या व्यावहारिक उपयोगात फारसा शोध घ्यायचा नव्हता. म्हणून त्याने गणित बाजूला ठेवले.
आल्फ्रेड यांचे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात काम
आल्फ्रेड नोबेल यांचे स्वतःचे कार्य भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या क्षेत्रात आहे. त्यांना साहित्य आणि वैद्यकशास्त्रात रस होता. शांततेसाठी नोबेल पारितोषिक सुरू झाले. कारण, त्यांची प्रतिमा दुरुस्त करायची होती. डायनामाइटच्या शोधामुळे त्यांना मृत्यूचा व्यापारी म्हटले गेले. आपली सार्वजनिक प्रतिमा सुधारण्यासाठी आल्फ्रेड नोबेल यांनी शांततेच्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक देण्याची प्रथा सुरू केली. पण, त्यांना गणितात रस नव्हता.
त्याकाळी गणित क्षेत्रासाठी मोठे बक्षीस होते
एक गोष्ट अशीही सांगितली जाते की गणिताच्या क्षेत्रात नोबेलसारखे पारितोषिक देण्याची प्रथा त्याकाळी सुरू झाली होती. किंग ऑस्कर दुसरा हा एक प्रसिद्ध गणितज्ञ होता. गणिताच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना त्यांनी गणित पुरस्कार देण्यास सुरुवात केली. कदाचित आल्फ्रेड नोबेल यांना असे वाटले असेल की, जेव्हा गणिताच्या क्षेत्रात आधीच पुरस्कार दिला जात आहे, तेव्हा या क्षेत्रात नवीन पुरस्कार देण्याची काय गरज आहे. त्याऐवजी त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांना नोबेल पारितोषिक देण्याची परंपरा सुरू केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nobel, Nobel peace prize