नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : जगातील सर्वात प्रतिष्ठेचा या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. यावेळी शांततेचा नोबेल पुरस्कार एका व्यक्तीसह दोन संस्थांना मिळाला आहे. बेलारूसी मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की, रशियाची मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, बेलारशियन अधिकार कार्यकर्ते अॅलेस बिल्यात्स्की सध्या तुरुंगात आहेत.
नॉर्वे नोबेल समितीचे प्रमुख बेरिट रिज अँडरसन यांनी शुक्रवारी ओस्लो येथे नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला. निअँडरथल डीएनएचे रहस्य उलगडणाऱ्या शास्त्रज्ञाला वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन नोबेल पारितोषिकांच्या घोषणेच्या आठवड्याची सुरुवात सोमवारी झाली. तीन शास्त्रज्ञांनी मंगळवारी एकत्रितपणे त्यांच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचे पारितोषिक जिंकले. लहान कण वेगळे झाले तरीही एकमेकांशी नाते टिकवून ठेवू शकतात, या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान, यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना 'एकाच वेळी रेणूंचे विखंडन' समान भागांमध्ये करण्याची पद्धत विकसित केल्याबद्दल बुधवारी पुरस्कार देण्यात आला. तर गुरुवारी, स्वीडिश अकादमीने फ्रेंच लेखिका अॅनी अर्नॉक्स यांना या वर्षीचा साहित्याचा नोबेल पारितोषिक त्यांच्या लेखनासाठी जाहीर केला. तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यावेळी किती लोकांना नामांकन -
खरं तर, यावर्षी एकूण 343 जणांना नामांकन देण्यात आले होते, त्यापैकी 251 वैयक्तिक नावे आहेत आणि 92 संस्था आहेत, ज्या शांततेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ही संख्या नोबेल शांतता पुरस्काराच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये 376 जणांची नावे होती. गेल्या वर्षी ही संख्या 329 होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.