जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / ऐकावं ते नवलंच! जेव्हा सूर्य झोपतो तेव्हा काय होतं? भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडलं मोठे रहस्य

ऐकावं ते नवलंच! जेव्हा सूर्य झोपतो तेव्हा काय होतं? भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडलं मोठे रहस्य

ऐकावं ते नवलंच! जेव्हा सूर्य झोपतो तेव्हा काय होतं? भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडलं मोठे रहस्य

एखाद्या सौरमंडळातला तारा कधी झोपी गेल्याचे ऐकलंय?

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 3 ऑक्टोबर : अंतराळात अगणित आकाशगंगा आहेत. आपली आकाशगंगांही त्यापैकीच एक आहे. प्रत्येक आकाशगंगेत एक सौरमंडळ असू शकतं. तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी या पूर्वी वर्तवली आहे. सौरमंडळ म्हटलं की तारे, ग्रह, लघुग्रह, धुमकेतू आदींचा समावेश होतो. पण एखाद्या सौरमंडळातला तारा कधी झोपी गेल्याचे ऐकलंय? नक्कीच नाही. शास्त्रज्ञांनी याबाबत धक्कादायक निरीक्षण नोंदवलं आहे. तारा हा स्वयंप्रकाशी असतो. आपल्या सौरमालेतील सगळ्यात जास्त चमकणारा तारा म्हणजे सूर्य होय. सूर्य म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्रोतच आहे. पण शास्त्रज्ञांनी सूर्याबाबत काही निरीक्षण नोंदवली आहेत. या वर्षी सूर्याची कार्यक्षमता खूप आहे असं निरीक्षणात म्हटलंय. सूर्य हा त्याच्या सौरचक्राच्या अंतिम पर्वात आहेत. मागील तीन आठवड्यांत तीन सोलर फ्लेअर्स शास्त्रज्ञांनी शूट केले. यासोबतच सूर्याने आपल्या सौरचक्रात 18 कोरोनल मास इंजेक्शनस आणि 1 जिओमॅग्नेटिक वादळ निर्माण केलं. परंतु, हे प्रत्येकवेळेस होईल याबाबत खात्री नाही. अनेकदा सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग नाहीसे होतात. अशावेळेस हा प्रचंड ऊर्जेचा स्रोत निद्रिस्त अवस्थेत असल्याचं भासतं. इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चच्या संशोधकांनी आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. यात सूर्यावर घडणार्‍या विविध घटनांबद्दलची माहिती दिली. तसेच ज्यावेळेस एखादा तारा आपली ऊर्जा पुनरुज्जीवीत करण्यासाठी कसे स्फोट घडवून आणतो. या स्फोटांमुळे संपूर्ण सौरमंडळाचं किती नुकसान होतं याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. वाचा - 82 वर्ष जुन्या स्वदेशी कंपनीनं बनवलं जबरदस्त लढाऊ हेलिकॉप्टर, वाचा खास माहिती रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक जर्नलमध्ये या संशोधनाची माहिती एका लेखात प्रसिद्ध झाली. सकृतदर्शनी जरी एखादा तारा निद्रिस्त दिसत असला तरी, त्याचे दोन्ही ध्रुव आणि तारा यांच्यात अंतर्गत हालचाली सुरू असतात. तसंच सूर्याच्या इंटरनल डायनेमो मेकॅनिझमवर संपूर्ण सौरमालेचे कार्य सुरू राहतं. पण सूर्य निद्रिस्तावस्थेत असताना सौरमालेचं कार्य अवघड होतं. सूर्य कधी निद्रिस्तावस्था असतो? सूर्याच्या पृष्ठभागावर सतत स्फोट होत असतात. पण अशी एक वेळ येते, जेव्हा सूर्याचं कार्य मंदावतं. अशावेळेस एकही सौरडाग दृष्टीस पडत नाही. या क्षणाला ग्रँड मिनिमम टाइम असं म्हटलं जातं. यादरम्यान सोलर रेडिएशन कमी होतं; हेच ग्रँड मिनिमम टाइमचं वैशिष्ट्य आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की, इसवीसन 1645 ते 1715 या कालावधीत सूर्यावर सौरडागांचे प्रमाण कमी होते. ही एकमेव घटना नाही. उलट सूर्याच्या एकंदर आयुष्यातील हे एक पर्व होतं. सूर्याचे एकंदर आयुष्य हे 4.6 अब्ज इतकं आहे. अंतराळात होणार्‍या विविध बदलांबाबत आपण नेहमीच उत्सुक असतो. तसंच या बदलाचे पडसाद पृथ्वीवरही पडतात असं शास्त्रज्ञांचा दावा आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या गोष्टींचा उलगडा होतोय हे मात्र निश्चित.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात