मुंबई, 4 डिसेंबर : भारतासाठी (India) नौदलाचे (Navy) महत्त्व आज जेवढे आहे तेवढे कदाचित कधीच नव्हते. पण, हे समजायलाही खूप कालावधी गेला. याचे कारण भारतावरील हल्ले आणि धोका हा जमीनीवरुन जास्त होते. भारतीय इतिहास हा वायव्येकडील हल्ल्यांच्या घटनांनी भरलेला आहे. पण भारताची सागरी सीमा खूप विस्तीर्ण आहे आणि आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत तिची सुरक्षा आणि भारतीय नौदलाचे महत्त्व या दोन्ही गोष्टी अधिकाधिक संवेदनशील झाल्या आहेत. 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नौदल दिन हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वर्धापन दिन नाही तर भारतीय नौदलाला योग्य दृष्टीकोनातून पाहण्याचा दिवस आहे.
4 डिसेंबरलाच का
दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा करण्यामागे नौदलाचे विशेष यश आहे. 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश मुक्तीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या घटनांमध्ये, 4 डिसेंबर रोजी, भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला करून तो नष्ट केला. त्याच्या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
तो हल्ला निर्णायक ठरला
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यशाली आणि चपळ रणनीतीचा हा परिणाम होता की पाकिस्तान हतबल झाला होता. यानंतर पाकिस्तानला युद्धात सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानची जमीन सीमा बांगलादेश असल्यामुळे खूप मोठी होती. त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून नौदलाचे महत्त्व एवढेच होते की पश्चिम पाकिस्तान नौदलाच्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानात माल पाठवू शकतो.
पाकिस्तानाची एक चूक अन् कराची बंदर बेचिराख! नौदल आजही साजरं करतं Killer Night
1971 मध्ये भारतीय नौदलाची भूमिका मोठी होती
पाकिस्तानच्या रणनितीविरोधात भारतीय नौदलाने जो धडा शिकवला त्यानंतर पाकिस्तानला सावरण्याची संधीच मिळाली नाही. एवढेच नव्हे तर पश्चिम पाकिस्तानला आपल्या नौदलाच्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानपर्यंत कोणतीही मदत पोहोचवता आली नाही, हा भारतीय नौदलाच्या धोरणाचा परिणाम होता.
सुवर्णमहोत्सवी वर्ष
2021 हे वर्ष 1971 च्या युद्धाच्या विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळेच यावेळी भारतीय नौदल हा दिवस सुवर्ण विजय वर्ष म्हणून साजरा करत आहे. भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती, ज्याचे नंतर रॉयल इंडियन नेव्ही असे नामकरण करण्यात आले आणि 1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव इंडियन नेव्ही ठेवण्यात आले.
नौदलाचा दिवस बदलत होता
भारतातील नौदल दिन पूर्वी रॉयल नेव्हीच्या ट्रोफॅगलर दिनासोबत साजरा केला जात होता. रॉयल इंडियन नेव्हीने 21 ऑक्टोबर 1944 रोजी पहिल्यांदा नेव्ही डे साजरा केला. सामान्य लोकांमध्ये नौदलाबद्दल जागरुकता वाढावी हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश होता. 1945 पासून दुसऱ्या महायुद्धानंतर 1 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला. यानंतर 15 डिसेंबर 1972 पर्यंत नौदल दिन साजरा केला जात राहिला आणि 1972 पासून तो 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला कसं लावलं? काय होती भारताची रणनिती?
4 पाकिस्तानी जहाजे उद्ध्वस्त
भारतीय नौदलाने कराची बंदर नष्ट केलेल्या ऑपरेशन ट्रायडंटच्या यशाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतीय नौदलाने पीएनएस खैबर या प्रमुख जहाजासह चार पाकिस्तानी जहाजे बुडवली होती. या कारवाईत शेकडो पाकिस्तानी नौसैनिक मारले गेले.
आज भारतीय नौदलाच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून काम करण्याची गरज आहे. चीन आपले महत्त्वाकांक्षी विस्तारवादी धोरण राबवून भारतासाठी मोठे आव्हान बनत आहे. हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवून ते पूर्व आशियातील भारतीय सागरी सीमेवरील देशांना कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे. यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार यांचा समावेश आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत चीनचे वर्चस्व कमी करण्याचा भारताचाही प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Indian navy, Navy