
3 डिसेंबर 1971 रोजी जेव्हा पूर्व पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात घुसण्याची तयारी केली होती. ते फक्त पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या इशाऱ्याची वाट पाहत होते. पण, 3 डिसेंबर रोजी पाकिस्ताननेच कुरापत काढली, ज्यासाठी भारत तयार होता. पाकिस्तान असं काहीतरी करणार याची भारताला कल्पना होतीच.

3 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतातील सहा भारतीय हवाई तळांवर हल्ला केला. परिणामी दोन्ही देशात तणाव वाढला. काही वेळातच भारताने युद्धाची घोषणा केली. भारतीय नौदल ताबडतोब पाकिस्ताना धडा शिकवायला निघाले.

भारतीय नौदलाने पटकन पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय कराचीवर हल्ला करण्याची रणनीती आखली. कराचीवरील हल्ल्याची सर्व तयारी करण्यात आली होती. रात्री गुजरातमधील ओखा येथून भारतीय नौदलाच्या तुकडीने हल्ला करण्यास सुरुवात केली. तीन विद्युत वर्गाच्या क्षेपणास्त्र बोटी, दोन अँटी सबमरीन आणि एक टँकर विद्युत वर्ग बोटीतून हल्ला केला जाणार होता.

रात्री 10.30 वाजता भारतीय नौदलाची ही तुकडी हल्ल्यासाठी सज्ज झाली होती. संकेत मिळताच हल्ला सुरू झाला, तेव्हा पाकिस्तानला काय करावे हे समजत नव्हते. याचे उत्तर पाकिस्तानकडे नव्हते. त्यांच्याकडे असे विमानही नव्हते, जे रात्रीच्या वेळी बॉम्बच्या माध्यमातून हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकले असते. आयएनएस निपट आणि आयएनएस निर्घटने पाकिस्तानची पीएनएस खैबर युद्धनौका आणि एमव्ही व्हीनस चॅलेंजर जहाज क्षेपणास्त्रांनी बुडवले. चॅलेंजरमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाची शस्त्रे मोठ्या प्रमाणात लोड करण्यात आली होती.

यानंतर तोफांच्या वर्षावाने कराची बंदर पेटू लागले. कराची बंदरातील तेल डेपो क्षणात उद्ध्वस्त झाला. मुहाफिज हे पाकिस्तानी जहाज मारा करण्यासाठी पुढे गेले तेव्हा भारतीय नौदलाने क्षेपणास्त्राने ते बुडवले. भारतीय नौदलाच्या या तुकडीने अवघ्या दीड तासात म्हणजेच 90 मिनिटांत हे संपूर्ण ऑपरेशन केले. पाकिस्तानला काही कळेपर्यंत त्यांचे कराची मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. यानंतर 1975 मध्ये पाकिस्तानने नौदल मुख्यालय इस्लामाबादला हस्तांतरित केले.

भारतीय नौदलात किलर्स नाईटला विशेष अर्थ आहे. हीच ती रात्र होती जेव्हा आपल्या नौदलाने 1971 मध्ये स्वतःच्या बळावर कराची बंदर उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय नौदलावर हल्ला करणे त्यांना खूप जड गेलं होतं. त्याच रात्रीच्या स्मरणार्थ, भारतीय नौदल दरवर्षी 3 डिसेंबर रोजी किलर्स नाईट साजरा करते. ही रात्रही आमच्यासाठी अभिमानाची रात्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.