मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : भारत-चीन सीमावादामुळे हवामान बदलाच्या संशोधनावर होतोय परिणाम

Explainer : भारत-चीन सीमावादामुळे हवामान बदलाच्या संशोधनावर होतोय परिणाम

India China border dispute: भारत आणि चीन यांच्यामधल्या सीमावादामुळे या हवामान बदलाच्या (Climate Change) नोंदी घेणं शक्य होत नाही आहे

India China border dispute: भारत आणि चीन यांच्यामधल्या सीमावादामुळे या हवामान बदलाच्या (Climate Change) नोंदी घेणं शक्य होत नाही आहे

India China border dispute: भारत आणि चीन यांच्यामधल्या सीमावादामुळे या हवामान बदलाच्या (Climate Change) नोंदी घेणं शक्य होत नाही आहे

नवी दिल्ली, 8 मार्च:  भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद (India China Border Dispute) 50 वर्षांहूनही जुना आहे. काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतचा हिमालयाचा भाग भारत आणि चीन (INDIA CHINA) यांच्यामध्ये सीमा तयार करतो. भारत आणि आजूबाजूच्या देशांचं हवामान, त्यातले बदल यांमध्ये हिमालय महत्त्वपूर्ण भूमिका तर असतेच. शिवाय संपूर्ण क्षेत्राच्या हवामानबदलाचे छोटे छोटे संकेतही तो देत असतो. भारत आणि चीन यांच्यामधल्या सीमावादामुळे या हवामान बदलाच्या (Climate Change) नोंदी घेणं शक्य होत नाही आहे. या नोंदींचा दोन्ही देशांना चांगलाच फायदा होऊ शकतो. कारण त्या नोंदींमुळे हवामानबदलासंदर्भातलं संशोधन (Research) पुढे जाऊ शकेल.

आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हेशनल सायन्सेस (ARIES) यांसारख्या संस्था हिमालयाच्या प्रदेशातल्या हवामानाच्या नोंदी बऱ्याच काळापासून करत आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी जमा होणारी प्रदूषित हवा मान्सूनच्या हंगामात मैदानी प्रदेशातून येते. 'अनडार्क'च्या अहवालानुसार, एरिस संस्थेकडून अशा बऱ्याच प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते.

अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत हिंदुकुश हिमालय पर्वतरांगा 2000 मैल लांबीच्या परिसरात विस्तारलेल्या आहेत. या प्रदेशात जगातली सर्वांत उंच पर्वतशिखरं आहेत. इथल्या विशेष पर्यावरणामुळे इथल्या पर्वतशिखरांवर जागतिक तापमानवाढीचा परिणाम होऊन वेगाने त्यांचं तापमान वाढत आहे. पृथ्वीवरच्या तापमानवाढीच्या अंदाजांनुसार कमीत कमी 1.5 अंश सेल्सिअस एवढं जरी तापमान वाढलं, तरी या भागातल्या एक तृतीयांश हिमनद्या या शतकाच्या अखेरीपर्यंत नष्ट होऊ शकतात, ज्यावर जगभरातल्या एक अब्ज नागरिकांचं जीवन अवलंबून आहे.

त्या अहवालात म्हटलं आहे, की धोरणनिश्चिती करणाऱ्या व्यक्ती, तसंच हवामानबदलाचा धोका किती लोकांना पोहोचू शकतो, याच्या अंदाजासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवरील मॉडेल्सची निर्मिती केली जाऊ शकते. त्यासाठी शास्त्रज्ञ संपूर्ण हिमालयात हवामानाची स्थानिक माहिती गोळा करत असतात. आंतरराष्ट्रीय टीमला ती माहिती दिली जाते. त्याच्या आधारे कम्प्युटरच्या साह्याने जागतिक पातळीवर हवामानबदलाचा परिणाम कसा होऊ शकेल, याचा अभ्यास केला जातो आणि अंदाज वर्तवले जातात.

Explainer: काहिली वाढणार; IMD ने दिला प्रखर उन्हाळ्याचा अंदाज

मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या नोंदी नेहमीच मिळतात असं नाही. त्याचं एक कारण म्हणजे त्या भागात नैसर्गिक रचना दुर्गम आहे, हे आहेच; पण भारत-चीन सीमावाद हेही त्याचं एक कारण आहे. यापूर्वीही अशा कारणांमुळे शास्त्रज्ञांना या भागातल्या प्रकल्पांवर काम करणं मुश्किल होत होतं. गेल्या वर्षी मे महिन्यात पुन्हा एकदा सीमावादाला तोंड फुटल्यामुळे अशा अनेक उपक्रमांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. या भागातल्या हवामानबदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ते उपक्रम राबवले जात होते आणि त्याची आकडेवारी दोन्ही देशांकडे दिली जात होती.

नेपाळमधली इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) ही संस्था हिमालयाच्या हिंदुकुश क्षेत्रातल्या आठ देशांसह काम करते. तिथल्या नाजूक पर्यावरणाचं रक्षण आणि हवामानबदलाशी दोन हात करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. सीमावादासारख्या समस्या या संस्थेच्या कामात थेट अडथळे आणतात. त्या संस्थेचे माजी संचालक डेव्हिड मोल्डन यांचं म्हणणं आहे, की अशा स्थितीत काही छोटे उपक्रम तर रद्दच केले जातात.

'या' 7 वनस्पती घरी लावाच; अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत

शोध, संशोधन, निरीक्षणं, नोंदी या बाबी सैन्य-विवादांपासून वेगळ्या राखल्या पाहिजेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे हिमालयाच्या प्रदेशातल्या सगळ्या देशांना हवामानबदलामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना येऊ शकेल. चीनमधल्या अनेक वैज्ञानिकांनाही असंच वाटत असतं. कारण त्यांनाही त्यांच्या संशोधनासाठी भारतीय बाजूकडील संशोधनाची, निरीक्षणांची माहिती हवी असते; मात्र सीमावादामुळे दोन्ही देशांसाठीही ही समस्या बनली आहे.

First published:

Tags: Climate change, India china