मराठी बातम्या /बातम्या /explainer /Income Tax Raid: कधी, कशी आणि का पडते रेड? छापा टाकल्यावर तुमचे अधिकार काय?

Income Tax Raid: कधी, कशी आणि का पडते रेड? छापा टाकल्यावर तुमचे अधिकार काय?

Income Tax Raid: यूपीतील परफ्यूम व्यापारी पियुष जैनच्या घरावर टाकलेला छापा (Income Tax Raid on Piyush Jain) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरातील घबाड पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की आयकर छापा म्हणजे काय? (What is Income Tax Raid), चला सविस्तर जाणून घेऊया.

Income Tax Raid: यूपीतील परफ्यूम व्यापारी पियुष जैनच्या घरावर टाकलेला छापा (Income Tax Raid on Piyush Jain) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरातील घबाड पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की आयकर छापा म्हणजे काय? (What is Income Tax Raid), चला सविस्तर जाणून घेऊया.

Income Tax Raid: यूपीतील परफ्यूम व्यापारी पियुष जैनच्या घरावर टाकलेला छापा (Income Tax Raid on Piyush Jain) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरातील घबाड पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की आयकर छापा म्हणजे काय? (What is Income Tax Raid), चला सविस्तर जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 डिसेंबर : उत्तर प्रदेशमध्ये कन्नौज आणि कानपूरमधील कथित परफ्यूम व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) याच्या घरी आयकर विभागाने मारलेला छापा (Income Tax Raid on Piyush Jain) सध्या चर्चेत आहे. या छाप्यात कोट्यवधीची रोकड आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे. यात पैशांचं घबाड इतकं मोठं होतं की छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या पथकाचे अधिकारीही चक्रावून गेले. ऑपरेशन बिग बझारमध्ये (Operation Big Bazaar) जिकडे पाहावे तिकडे पैसे आणि सोने मिळालं आहे. यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, इन्कम टॅक्स छापा म्हणजे काय (What is Income Tax Raid), छापा कधी, का (why income tax raid happen) आणि कसा होतो? (how income tax raid happen) ज्याच्यावर पडेल तो काय करू शकतो? (your rights while it raid) चला सर्व पटापट सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊ.

आयकर छापा आयकर कलम 132 अंतर्गत येतो. या अंतर्गत अधिकारी कोणत्याही व्यक्तीच्या व्यवसायावर किंवा घरावर कुठेही छापा टाकू शकतात. छापा कधीही होऊ शकतो आणि कितीही काळ असू शकतो. एवढेच नाही तर काही चुकीची गोष्टी आढळल्यास जप्तीची कारवाईही होऊ शकते. संपूर्ण परिसरात हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा पोलिसांच्या मदतीने शोध घेता येतो. छाप्यांदरम्यान, अधिकारी माहिती मिळविण्यासाठी कुलूप देखील तोडू शकतात.

का आणि कधी रेड पडू शकते?

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील एजन्सी आयकर विभाग, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यासारख्या संस्था कर न भरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवतात. ज्या लोकांची कर आणि कमाई वेगळी आहे किंवा ज्यांच्यावर करचुकवेगिरीचा संशय आहे अशा लोकांवरही याचं लक्ष असतं. अनेकवेळा या एजन्सींना कुठूनतरी एखादी व्यक्ती कर चुकवत असल्याची किंवा काळा पैसा गोळा करत असल्याची टीप मिळते. अशा स्थितीत त्याच्यावर नजर ठेवली जाते आणि मग योग्य संधी मिळताच छापा टाकला जातो.

कशी पडते रेड?

सदर व्यक्तीला कोणतीही कल्पना नसताना छापा मारण्याची आयकर विभागाची योजना असते. बहुतेक छापे पहाटे किंवा रात्री उशिरा मारले जातात, जेणेकरून आरोपीच्या घरापर्यंत लवकर पोहोचता येईल आणि काही समजण्यापूर्वीच त्याला पकडता येईल. छापा टाकताना घराची झडती घेण्यासाठीचे वॉरंटही पथकाच्या सोबत असते. जेव्हा छापे टाकले जातात, तेव्हा कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आयकर अधिकारी पोलिस दल आणि कधीकधी निमलष्करी दलासोबत छापा टाकतात. रेड 2-3 दिवस चालू शकते. या काळात घरात किंवा कार्यालयात उपस्थित असलेले लोक आयकर अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय बाहेर जाऊ शकत नाहीत. आयकर अधिकारी छाप्यादरम्यान त्यांच्याकडून सर्व वस्तू काढून घेतात.

IT Raid : तळघरातून, भिंतीतून आणि कपाटांमधून निघतायंत कॅश आणि सोनं! पाहा PHOTOS

कोणत्या गोष्टी आयकर विभाग जप्त करू शकत नाही

एखाद्या दुकानात किंवा शोरूमवर छापा टाकला असेल तर तेथे विक्रीसाठी ठेवलेला माल जप्त करता येणार नाही, त्याची नोंद फक्त कागदपत्रांमध्ये करता येईल. काही प्रकरणांमध्ये त्या वस्तूशी संबंधित कागदपत्रे जप्त केली जाऊ शकतात. दुकानातून किंवा घरातून मोठ्या प्रमाणात रोख किंवा सोने किंवा इतर काही सापडल्यास, ज्याचे खाते त्या व्यक्तीकडे आहे म्हणजेच त्याने सर्व काही ITR मध्ये दाखवले असेल तर अशा वस्तू जप्त करता येत नाहीत.

छापा पडल्यावर संबंधित व्यक्तीकडे कोणते अधिकार आहेत?

सर्वप्रथम तुम्ही छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना वॉरंट तसेच ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता. दुसरीकडे छापा टाकणाऱ्या पथकाला घरातील महिलांची झडती घ्यायची असेल तर महिला कर्मचारीच करू शकतात. जर सर्व पुरुष असतील तर अधिकार्‍यांना महिलेच्या कपड्यात काहीतरी लपविल्याचा संशय आला तरीही ते घरातील महिलेची झडती घेऊ शकत नाही. तुम्हाला जेवण करण्यापासून किंवा शाळेची बॅग तपासल्यानंतर आयकर अधिकारी तुम्हाला शाळेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत.

आयकर सर्वेक्षण म्हणजे काय?

आयकर सर्वेक्षण आयकर कायद्याच्या कलम 133A अंतर्गत येते. हे फक्त व्यवसायाच्या ठिकाणीच होऊ शकते. कंपनीची कागदपत्रे घरात असल्याशिवाय हे कोणाच्याही घरात करता येत नाही. इतकेच नाही तर आयकर सर्वेक्षण केवळ कामकाजाच्या दिवसांतच करता येते. तसेच या अंतर्गत कोणताही अधिकारी कोणत्याही प्रकारची जप्ती करू शकत नाही. तसेच यामध्ये पोलिसांची मदत घेतली जाऊ शकत नाही. वैयक्तिक गोष्टींचा शोधही यात घेता येत नाही.

First published:
top videos

    Tags: Case ED raids, Income tax, Raid