मुंबई, 21 डिसेंबर : अलीकडेच मुलींचे लग्नाचे किमान वय 21 वर्षे करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने याबाबत निर्णयही दिला आहे. मात्र, 13-14 वर्षांच्या वयात मुले जैविक पिता बनल्याच्या घटना जगात कमी नाहीत. एक मुलगा आणि मुलगी कोणत्या वयात आई आणि वडील होऊ शकतात, हा मुद्दा जगभरात अनेकदा वादात येतो. अनेक वर्षांपूर्वी असेच एक प्रकरण न्यूझीलंडमध्ये न्यायालयात पोहोचले होते. त्यात मुलाचे वय 11 वर्षे होते. हे मूल जगातील सर्वात तरुण वडील असल्याचे बोलले जात आहे.
11 वर्षांचा सर्वात लहान बाप
न्यूझीलंडमध्ये एक प्रकरण कोर्टात पोहोचले, त्यानंतर 11 वर्षांचा मुलगा बाप झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात आई झालेली महिला वयाने मोठी असली तरी या मुलाची आणि आईची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती. न्यूझीलंडच्या नोंदी सांगतात की 2008 मध्ये देशात 15 वर्षांपेक्षा कमी वयाचे 11 मुलं बाप झाली होती तर 2007 मध्ये ही संख्या 15 होती.
मेक्सिकोमध्ये 10 वर्षांचा मुलगा बाप झाल्याची बातमी
12 नोव्हेंबर 2015 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी मुलाचा बाप झाल्याची बातमी देखील मेक्सिकोतून आली होती. Telemundo.Com या वृत्त साईटने सांगितले की, मेक्सिकोच्या ज्या भागात ही घटना घडली आहे. हा तिथला सर्वात मागासलेला आणि गरीब भाग आहे. तेथे पालकांनी आपल्या 10 वर्षाच्या मुलाला गुरांच्या बदल्यात विकले. यानंतर मुलाला 16 वर्षीय मुलीसोबत ठेवण्यात आले. काही महिन्यांनी तो बाप झाला. तो जगातील सर्वात तरुण वडील असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याचे वय निश्चित होऊ शकले नाही.
चीनमध्ये 10 वर्षांची मुलगी झाली आई
2010 मध्ये जेव्हा रशियन न्यूज साइट Pravda ने वृत्त दिले होते की चीनमधील एका मुलीने वयाच्या 10 व्या वर्षी बाळाला जन्म दिला होता, तेव्हा खळबळ माजली होती. मात्र, चीनने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दोन वर्षांनंतर प्रवदाने ही बातमी आपल्या साइटवरून काढून टाकली.
भारतातही असे प्रकरण समोर
27 मार्च 2007 रोजी खलीज टाईम्सने एक बातमी प्रसिद्ध केली होती. केरळच्या एर्नाकुलम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 16 वर्षीय मुलीला मुलगा झाला. त्याचे वडील 12 वर्षांचा मुलगा होता. ज्याला भारताचा सर्वात तरुण बाप म्हटले जाते. डीएनए चाचणीतूनही हे सिद्ध झाले आहे. त्यानंतर या मुलाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. डीके जब्बार म्हणाले की, काही वेळा मुलांमध्ये परिपक्वता खूप लवकर येते.
marriage age of women | भारतात मुलगा आणि मुलीचे लग्नाचे वय वेगवेगळे का आहे? कायदा काय सांगतो?
यूकेमध्ये 11 वर्षांचा बाप आणि 16 वर्षांची आई
ब्रिटनच्या इंडिपेंडंटने 21 जानेवारी 1998 रोजी सीन स्टीवर्ट हे ब्रिटनमधील सर्वात तरुण वडील असल्याचा अहवाल प्रकाशित केला होता. वयाच्या 11 व्या वर्षी तो वडील झाला. त्याची मैत्रीण 16 वर्षांची होती. दोघेही एकमेकांचे शेजारी होते. दोन्ही कुटुंबांनी या गोष्टीचा आनंदाने स्वीकार केला.
अमेरिकेतील नॅशव्हिलमधील बातमी एक पाऊल पुढे होती. यामध्ये 13 वर्षांच्या मुलाने 15 वर्षांच्या वँडी चॅपलशी लग्न केलं. यानंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर त्याने तिला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टातून घटस्फोट मिळताच त्याने पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
पुनरुत्पादनाचे किमान वय किती आहे?
हे वय मुलांमध्ये 14 वर्षे आणि मुलींमध्ये 13 वर्षे असल्याचा बहुतेक डॉक्टरांचा विश्वास आहे. सुप्रसिद्ध वैद्यकीय साइट मेडिसिन नेटमधील एमडी, डॉ. मेलिसा कोनार्ड, लिहितात की बहुतेकदा हे वय मुला-मुलींच्या बाबतीत खूप लवकरही असते. मुलांमध्ये हे वय 12 ते 14 वर्षे असू शकते तर मुलींमध्ये ते 10 ते 12 वर्षे असू शकते. विज्ञानाशी संबंधित एका जर्नलमध्ये असे म्हटले आहे की कोणत्याही मुलामध्ये 14 वर्षांच्या वयापर्यंत हार्मोन्स विकसित होतात, त्यापूर्वी त्याचे शरीर शुक्राणू तयार करू शकत नाही.
puberty रेकॉर्ड काय सांगतात?
जर तुम्ही विकिपीडियाच्या पानावर जाल तर सर्वात तरुणपणी बाप झालेल्या वडिलांची List of youngest birth fathers यादी तुम्हाला मिळेल. जगात 11 व्या वर्षी बाप होणारे दोघेजण आहेत, तर वयाच्या 12 व्या वर्षी बाप झालेल्या तीन प्रकरणांची नोंद मिळते. पेजने त्याच्या संदर्भ विभागात त्याचे तपशील देखील दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Child marriage, Marriage