जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / काय सांगता! माणसू एलियन आहे? मग तो पृथ्वीवर कसा आला? वाचा शास्त्रज्ञांचं धक्कादायक संशोधन

काय सांगता! माणसू एलियन आहे? मग तो पृथ्वीवर कसा आला? वाचा शास्त्रज्ञांचं धक्कादायक संशोधन

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

एलियन आणि मानव यांचे जुने नाते आहे. वैज्ञानिकांनी मोठा दावा करत पृथ्वीवर जीवसृष्टी कुठून आली हे सांगितले आहे. एलियन हे माणसे असल्याचे दाव्यात म्हटले आहे. याचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी हा अहवाल वाचा.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 27 एप्रिल : पृथ्वीपासून (Earth) दूर असलेल्या काही ग्रहांवर (Planet) जीवसृष्टी असून, तिथले लोक पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. अशा परग्रहवासियांना ‘एलियन’(Alien) म्हटलं जातं. एलियन्सच्या अस्तित्वाबाबतचं रहस्य अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेलं नाही. मात्र, एलियन्सबद्दल अनेक कथा चर्चेचा विषय ठरतात. पण जर कोणी तुम्हाला सांगितलं की आम्ही, तुम्ही आणि पृथ्वीवरील सर्व माणसंच एलियन आहेत, तर तुमचा विश्वास बसेल का? आम्ही हे विचारण्याचं कारण म्हणजे माणूसच एलियन असू शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. याचं कारण म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीचं मूळ हे खरब मैल दूर असलेल्या ग्रहावरून आलं असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. माणसंच एलियन असू शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी कोणत्या आधारावर केला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर, अब्जावधी वर्षांपूर्वी आपल्या ग्रहाशी टक्कर झालेल्या लघुग्रहांमध्ये (Asteroids) पहिल्यांदाच आपल्या डीएनएचे रासायनिक “बिल्डिंग ब्लॉक्स” आढळून आले आहेत. म्हणजेच जीवसृष्टीचं बीज अंतराळामध्ये इतर कुठून तरी आणून लावलं गेलं होतं. आता, शास्त्रज्ञ असा दावा कोणत्या आधारावर करत आहेत, याच्याशी संबंधित प्रत्येक तथ्याविषयी समजून घेऊयात. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार काय आहे? डीएनए (DNA) आणि आरएनए (RNA) तयार करण्यासाठी दोन प्रकारचे रासायनिक बिल्डिंग ब्लॉक्स किंवा न्यूक्लिओबेस आवश्यक आहेत. त्यांना पायरीमिडीन (Pyrimidines) आणि प्युरिन म्हणतात. या पायरीमिडिन्समध्ये सायटोसिन, युरॅसिल (Uracil), थायमिन (Thymine), आणि प्युरिन्स (Purines) यांचा समावेश असून, त्यात ग्वानिन (Guanine) आणि एडनिन (Adenine) असतात. पूर्वीच्या अभ्यासात उल्कापिंडांमध्ये प्युरिन आणि युरॅसिल आढळले असले तरी, सायटोसिन आणि थायमिन आतापर्यंत कधीही आढळले नव्हते. या संदर्भात झी हिंदुस्थानने वृत्त दिलंय. तीन उल्कापिंडांचं विश्लेषण जपानमधील होक्काईदो विद्यापीठातील (Hokkaido University, Japan) शास्त्रज्ञांच्या टीमने त्यांच्या नवीन अभ्यासात मर्चिसन, मरे आणि टॅगिश लेक या तीन उल्कापिंडांचं (three carbon-rich meteorites) विश्लेषण केलं आहे. 1950, 1969 आणि 2000 मध्ये पृथ्वीवर कोसळलेल्या तीन वेगवेगळ्या उल्कापिंडांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांच्या या टीमने डीएनए आणि आरएनए तयार करण्यासाठी आवश्यक संयुगं शोधून काढली. मर्चिसन (Murchison), मरे (Murray) आणि टॅगिश लेक (Tagish Lake) नावाच्या या तीन कार्बनयुक्त उल्कापिंडांचे नमुने घेऊन उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचं विश्लेषण करण्यात आले. उल्कापातानंतर डायनासोर नामशेष झाले! पण, पक्षी कसे वाचले? अखेर कोडं उलगडलं वैज्ञानिकांनी मानवच एलियन असल्याचा दावा का केलाय? जपानमधील होक्काइदो विद्यापीठातील प्राध्यापक यासुहिरो ओबा (Prof Yasuhiro Oba) म्हणाले, ‘आम्हाला न्यूक्लियोबेस असलेल्या विविध प्रकारच्या जैविक सामग्री सापडल्या. चार अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा बाह्य अवकाशातील राडारोडा किंवा कचरा आपल्या ग्रहावर आदळून बॉम्बस्फोट होत होते, तेव्हा हे लघुग्रह, उल्का, धूमकेतू आणि ग्रहावरील धुलीकणांच्या मदतीने पृथ्वीवर पोहोचवले जाऊ शकत होते.’ मर्चिसन उल्का ही एक अंतराळ खडक आहे, जी 1969 मध्ये ऑस्ट्रेलियात पडली होती, तर मरे उल्का केंटकीमध्ये 1950 मध्ये सापडली होती. तर, टॅगिश लेक ही 2000 मध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये पडली होती. टीमच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की, उल्कांमध्ये ग्वानिन, एडेनिन आणि युरॅसिलसह अंतराळ खडकांमध्ये पूर्वी सापडलेली संयुगं होती. शिवाय त्यामध्ये सायटोसिन आणि थायमिनदेखील आढळून आलं आहे. प्राध्यापक यासुहिरो ओबा म्हणाले, ‘आम्हाला विश्वास आहे की या जीवांच्या प्रवाहाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा एक अतिशय रोमांचित करणारा शोध आहे जो जीवनाची सुरुवात कशी झाली, याबद्दल आपल्या माहितीत भर टाकतो. या शोधातून आलेले निष्कर्ष असं सूचित करतात की डीएनएचे रासायनिक बिल्डिंग ब्लॉक्स अंशतः इंटरस्टेलर मीडियामध्ये फोटोकेमिकल प्रतिक्रियांद्वारे तयार केले जाऊ शकतात. सूर्यमालेच्या निर्मितीनंतर त्यांचा लघुग्रहांमध्ये समावेश करता येईल,’ असे त्यांनी सांगितले. आदिमानवांच्या गुहा चित्रांबद्दल अनोखी माहिती समोर, आतापर्यंतची गृहितकं ठरणार फेल दरम्यान, पृथ्वीवरील जीवनाचे मूलभूत घटक उल्कापिंडापासून आले आहेत, असं अनेक प्रमुख शास्त्रज्ञ सांगतात. याशिवाय इतर अनेक सिद्धांतही प्रचलित आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचं संशोधन काय सांगतं? ज्वालामुखींच्या पहिल्या ठिणगीतून जीवाची निर्मिती झाली असावी, असं कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील 2008 च्या अभ्यासात सुचवण्यात आलं होतं. याच वर्षी पाणबुडीच्या हायड्रोथर्मल व्हेंटमध्ये जीवसृष्टीची उत्पत्ती झाली असावी, असा दावा डसेलडॉर्फ विद्यापीठातील संशोधकांनी केला होता. मात्र, नासाच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की अंतराळातील इतर ठिकाणांहून आपल्या ग्रहावर म्हणजेच पृथ्वीवर जीवसृष्टीचं मूळ बीज आलं. “पृथ्वीवर जीवसृष्टी इतक्या लवकर निर्माण झाली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी आणि कार्बन-आधारित रेणूंच्या मार्गात पाणी नव्हतं, तर जीवांचे हे बिल्डिंग ब्लॉक्स इतक्या लवकर पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे आले,” असं नासाचं म्हणणं आहे. या वस्तूंमध्ये पाणी आणि कार्बन-आधारित रेणूंचा मुबलक पुरवठा आहे, त्यामुळे उत्तरामध्ये धूमकेतू आणि लघुग्रहांची पृथ्वीशी टक्कर झाल्याने हे घडलं असावं अशी शक्यता शास्त्रज्ञांनी मांडली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात