Home /News /explainer /

गाडी चालवायला शिकताय? असा करा घरबसल्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज

गाडी चालवायला शिकताय? असा करा घरबसल्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTOच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

    मुंबई, 23 मे : कोणतंही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही लायसन्सशिवाय वाहने चालवली तर पोलिसांकडून कधीही तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving License) असणं आवश्यक आहे. लर्निंग लायसन्स का आवश्यक? तुम्ही वाहन चालवायला शिकत असाल तरीही तुमच्याजवळ रस्त्यावर वाहन चालवताना लर्निंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तुमच्याजवळ लर्निंग लायसन्स नसल्यास तुम्हाला तुमच्या गुन्ह्यानुसार 450 रुपये दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो.  तुम्हाला पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर लर्निंग लायसन्स (Learning Driving License) ही एक महत्त्वाची पहिली पायरी आहे. खरं तर भारतात फक्त पेमेंट नाही तर आणखी बऱ्याच गोष्टी डिजिटल (Digital) झाल्या आहेत आणि ड्रायव्हिंग लायसन्सही त्याला अपवाद नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTOच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ( Online Learning Driving License) अर्ज करू शकता.  'इंडिया टुडे'नं या संदर्भात वृत्त दिलंय. कशी ठरते LPG ची किंमत? जाणून घ्या सिलिंडरच्या वाढत्या दरामागची कारणं... असा करा घरबसल्या अर्ज - sarathi.parivahan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. — वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला तुमचे राज्य निवडण्यास सांगितले जाईल. —राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नवीन विंडोसह मल्टिपल विंडोमध्ये नेले जाईल. -त्यापैकी “Apply for Learner Licence” वर क्लिक करा. — जेव्हा तुम्ही Apply for Learner Licence वर क्लिक करता, तेव्हा तुम्हाला आधार कार्डसह अर्ज करायचा आहे की त्याशिवाय ते निवडण्यास सांगितले जाईल. - तुम्ही Applicant with Aadhar हा ऑप्शन निवडल्यास तुम्ही तुमच्या घरातून किंवा कोणत्याही पसंतीच्या ठिकाणावरून चाचणी देण्यास पात्र ठराल. - त्यानंतर तुम्हाला भारतात ड्रायव्हिंग किंवा लर्निंग लायसन्स मिळालंय की नाही हे निवडण्यास सांगितलं जाईल. -  सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड डिटेल्स सबमिट करण्यास सांगितले जाईल. - तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर आणि त्या खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर सबमिट केल्यावर तुमचे अर्धे काम पूर्ण होईल. - लायसन्ससाठी तुमचे नाव आणि फोटो तुमच्या आधार कार्डमधून घेतले जातील. — सर्व डिटेल्स भरल्यानंतर, तुम्हाला लायसन्ससाठी पैसे भरण्यास सांगितले जाईल. - पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला 10-मिनिटांचे ड्रायव्हिंग ट्यूटोरियल पाहण्यास सांगितले जाईल. तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, त्यानंतरच तुम्ही चाचणीसाठी पात्र असाल. — एकदा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर, चाचणीसाठी तुमच्या फोनवर एक OTP आणि पासवर्ड पाठवला जाईल. — तो ओटीपी अर्जात भरा आणि तुमची चाचणी सुरू करण्यासाठी proceed for your test to beginवर क्लिक करा. हे करताना तुमच्या डिव्हाइसचा फ्रंट कॅमेरा चालू आहे, हे एकदा बघून घ्या. - एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला 60 सेकंद दिली जातील. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वेळेत आणि बरोबर आहेत याची खात्री करा. लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला 10 पैकी किमान 6 प्रश्नांची बरोबर उत्तरं देता आली पाहिजेत. — तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास, तुमच्या परवान्याची लिंक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवली जाईल. जर तुम्ही चाचणीत नापास झालात, तर तुम्हाला 50 रुपये retest fee भरावी लागेल आणि पुन्हा चाचणी द्यावी लागेल. अशा या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करून चाचणी देऊ शकता.
    First published:

    Tags: Driving license, Vehicles

    पुढील बातम्या