जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Driving License आधारशी लिंक केल्याने होतील अनेक फायदे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving License आधारशी लिंक केल्याने होतील अनेक फायदे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving License आधारशी लिंक केल्याने होतील अनेक फायदे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

असे केल्याने बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती सहज उपलब्ध होईल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving License) योग्य माहितीही मिळेल. त्यामुळे सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड (Aadhaar card) लिंक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जानेवारी : आजच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि आधार कार्ड (Aadhaar card) ही आवश्यक कागदपत्र झाली आहेत. जसं तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कोणतेही वाहन चालवू शकत नाही. तसेच आधार कार्डाशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की आपण ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत का बोलत आहोत? वास्तविक, तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक केलेच असेल. त्यानंतरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळू लागला असेल. पण, इथे आणखी एक मुद्दा आहे. वास्तविक सरकारचे म्हणणे आहे की, असे केल्याने बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती सहज उपलब्ध होईल आणि तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची योग्य माहितीही मिळेल. त्यामुळे सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश जारी केले आहेत. तुम्ही घरबसल्या तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी आधार कार्ड कसे लिंक करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. DL आणि आधार लिंक करण्यासाठी हे काम करा ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप-डाउनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक विचारला जाईल. तो नंबर टाका. mParivahan: गाडी चालवताना DL किंवा RC घेऊन जायला विसरलात? फोनमध्ये असे करा सेव्ह, नाही होणार दंड DL सोबत आधार लिंक असे होईल वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला Get Details चा पर्याय मिळेल. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुमच्यासमोर सबमिटचा पर्याय असेल. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. जो सबमिट केल्यानंतर तुमचं DL आधारशी जोडलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात