6G Internet Speed पाहुन तुमचेही डोळे विस्फारतील! 6 GB चित्रपट फक्त 51 सेकंदात डाउनलोड होणार

6G Internet Speed पाहुन तुमचेही डोळे विस्फारतील! 6 GB चित्रपट फक्त 51 सेकंदात डाउनलोड होणार

Who is leading in 6G: 6G नेटवर्कमध्ये डेटा डाउनलोड स्पीड 1000 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, LG ने 6G चाचणी सुरू केली आहे. 6G नेटवर्कमध्ये तुम्ही 1000 मेगाबाइट्स प्रति सेकंद या वेगाने 6 जीबी मूव्ही फक्त 51 सेकंदात डाउनलोड करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली 24 नोव्हेंबर: देशातील दूरसंचार कंपन्या सध्या 5G नेटवर्कची (5G Network Speed) चाचणी घेत असून पुढील वर्षी 5G तंत्रज्ञान (5G Network Technology) भारतात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. दमर्यान, असेही वृत्त आहे की 6G तंत्रज्ञान देखील लवकरच सुरू होऊ शकते. भारतात 6G तंत्रज्ञानाची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, 6G चा इंटरनेट स्पीड (6G Internet Speed) 5G पेक्षा 50 पट जास्त असेल. डीएनएच्या रिपोर्टनुसार सरकारने 6जी नेटवर्कची तयारी केली आहे. दूरसंचार विभागाने आपली जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी C-DoT ला दिली आहे.

सरकारने C-DoT ला 6G तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यास सांगितले आहे. दूरसंचार सचिव के. राजारामन म्हणाले की, 6G शी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचा विचार केला पाहिजे जेणेकरून 6G तंत्रज्ञान जगभरातील बाजारपेठेसोबत भारतात एकाच वेळी लॉन्च करता येईल. 5G तंत्रज्ञानाची चाचणी भारतात सुरू आहे, तर 2019 मध्ये दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेत 5G लाँच करण्यात आले होते.

कोणत्या देशांकडे 6G तंत्रज्ञान आहे?

जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या 6G नेटवर्कवर काम करत आहेत. सॅमसंगप्रमाणेच, LG आणि Huawei ने 6G तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. असे मानले जाते की 6G नेटवर्क 2028-30 पर्यंत जगभरात लॉन्च केले जाऊ शकते. यामुळेच भारताने 6G नेटवर्कची तयारी सुरू केली आहे.

5G नेटवर्कचा वेग किती आहे?

5G नेटवर्कबद्दल बोलायचे झाले तर डेटा डाउनलोडिंग स्पीड 20Gbps इतका असेल. दुसरीकडे, भारतात 5G नेटवर्कच्या चाचणी दरम्यान, डेटा डाउनलोड गती 3.7 Gbps वर पोहोचली आहे. देशातील एअरटेल, व्होडाफोन आणि जिओ या तीन कंपन्यांनी 5G नेटवर्कच्या चाचणीत 3 Gbps चा डेटा डाउनलोड स्पीड मिळवला आहे.

Internet म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या हे नेमकं कसं काम करतं

6G तंत्रज्ञानाचा वेग किती असेल?

दुसरीकडे, 6G नेटवर्कमध्ये डेटा डाउनलोडचा वेग 1000 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, LG ने 6G चाचणी सुरू केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने बर्लिन, जर्मनीमध्ये 6G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. माहितीनुसार, या चाचणीदरम्यान 100 मीटर अंतरावर डेटा पाठवला आणि प्राप्त झाला. ही चाचणी यशस्वी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. 6G नेटवर्कमध्ये तुम्ही 1000 मेगाबाइट्स प्रति सेकंद या वेगाने 6 जीबी मूव्ही फक्त 51 सेकंदात डाउनलोड करू शकता.

6G नेटवर्क तंत्रज्ञान कधी लाँच होईल?

6G नेटवर्क 5G नेटवर्कपेक्षा 15 पट अधिक वेगवान असेल. जपानमध्ये 6G नेटवर्क 2030 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. जपान व्यतिरिक्त दक्षिण कोरिया, चीन आणि फिनलंड देखील 6G नेटवर्कची तयारी करत आहेत. त्याचवेळी भारतातही 6G नेटवर्क आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी 6G नेटवर्कची तयारी सुरू केली

कंपन्यांनी 6G नेटवर्कबाबत तयारी सुरू केली असून लवकरच 6G नेटवर्कवर आधारित स्मार्टफोन बाजारात दाखल होतील. यामध्ये Samsung, LG आणि Huawei सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे आणि या कंपन्यांनी 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6G नेटवर्क 5G नेटवर्कच्या स्पीडपेक्षा 50 पट जास्त वेगवान असेल. वृत्तानुसार, जागतिक बाजारपेठेत 6G नेटवर्क आणले जाण्याची शक्यता आहे.

Published by: Rahul Punde
First published: November 24, 2021, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या