Home /News /explainer /

कडक उन्हात तुमच्या कारचा AC नीट का चालत नाही? ह्या चुका टाळा नाहीतर होईल पश्चाताप

कडक उन्हात तुमच्या कारचा AC नीट का चालत नाही? ह्या चुका टाळा नाहीतर होईल पश्चाताप

या वर्षी वाढत्या आणि कडक उन्हात, लोक अनेकदा आपल्या गाडीचा एसी रस्त्यावर काम करत नसल्याच्या तक्रारी करताना आढळतील. या उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जात असताना गाडीचा एसी (Car AC) का चालत नाही?

  मुंबई, 17 मे : सध्या देशातील अनेक राज्यात कडक उन्हाळा सुरू आहे. अशात तुम्ही लांबच्या प्रवासात एक गोष्टी नक्की अनुभवली असेल. गाडी लांबच्या रस्त्यावर धावत असताना बाहेर खूप उष्णता असेल तर अनेकदा तुमच्या वाहनाचा एसी व्यवस्थित चालत नाही. तुमच्या लक्षात येईल की कारचा एअर कंडिशनर सामान्यपणे जितके काम करतो तितके करत नाही. उलट कधी कधी तो गरम हवा फेकताना दिसतो. सामान्य दिवसात नाही तर अति उष्ण दिवसात जेव्हा पारा 40-42 अंश सेल्सिअसच्या वर जात असतो. तेव्हा अनेकदा गाडीचा एसी काम करताना दिसत नाही. बाहेरील तापमान जितके जास्त गरम असेल तितके तुमच्या AC प्रणालीला कार्य करणे अधिक कठीण होईल. यामागे काय कारण आहे. अखेर बाह्य उष्णतेचा तुमच्या कार किंवा वाहनावर कसा परिणाम होतो आणि तुमच्या AC चे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय करावे. चला लगेच जाणून घेऊ. बाहेरील उष्णतेचा कारच्या AC वर कसा परिणाम होतो? जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते किंवा बाहेरचे तापमान वाढू लागते तेव्हा वाहनाच्या एअर कंडिशनरला काम करणे कठीण होते. मग ते तुमच्या वाहनाच्या इंजिन आणि कूलिंग सिस्टमवर भार वाढवू लागते. यामुळे कारच्या इंजिनसह बॅटरी आणि कार थंड करण्याचे काम करणारे सर्व भाग दबावाखाली येतात. यासोबतच कारचे इतर पार्ट्सही तुमच्या कारचा आतील भाग चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. जेव्हा बाहेरचे तापमान 40 अंशांच्या वर जाते बाहेरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागताच, एसी पूर्ण क्षमतेने काम करू लागतो. जर तुम्ही गाडीचा वेगही वाढवला तर इंजिनवर दुप्पट लोड येईल आणि त्याचा परिणाम पुन्हा एसी वर सुरू होईल. तो नीट चालणार नाही. तुम्हाला वाटेल की कारचा एसी कमी थंड होत आहे.

  डॉ. स्ट्रेंज चित्रपटात दाखवलेलं मल्टीव्हर्स वास्तवात आहे की फक्त सायन्स फॅन्टसी?

  तेव्हा गाडीचा वेग काय असावा? काहीवेळा 40 डिग्री सेल्सिअस तापमानावर 100 पेक्षा जास्त वेगाने कार चालवताना, एसी गरम हवा फेकल्यासारखे देखील होऊ शकते. अशा स्थितीत, कोणतीही कार किंवा एसी तज्ञ तुम्हाला वाहनाचा वेग कमी ठेवा आणि नंतर एसी चालवा, असा सल्ला देतील, अशा स्थितीत एसीमुळे काही प्रमाणात गाडीच्या आत थंडावा जाणवू शकेल. एसी जास्त फास्ट करू नका, स्पीड खूप कमी ठेवा एसीचा वेग पूर्णपणे न वाढवण्याचा प्रयत्न करा आणि गाडीचा वेगही कमी ठेवा, अशावेळी एसीचे काही चांगले परिणाम मिळतील. अनेक वेळा अशा परिस्थितीत एसीवर जास्त भार टाकला तर तो खराब होण्याची शक्यता असते. Gene mutation ने हॉलीवूड चित्रपटांसारखा मानव अधिक बुद्धीवान होणार! काय आहे रहस्य? खोलीतील एसी कोणत्या तापमानासाठी डिझाइन केलेले आहेत? तुमच्या घराचे एसी देखील अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत आणि त्यांची क्षमता अशी आहे की ते बाहेरील तापमानात केवळ 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत चांगले काम करतात. त्यानंतर ते पुन्हा अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त होते, तेव्हा खोलीचे तापमान थंड ठेवण्यासाठी एसी जास्त शक्ती घेतात. अशा परिस्थितीत त्यांच्यात बिघाड होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात तुमच्या कारचा एसी सुरक्षित ठेवा कारची एसी सिस्टीम नियमितपणे सर्व्हिस करत रहा. दिवसा वाहनातून बाहेर पडणे टाळा. सकाळ आणि संध्याकाळची वेळ चांगली आहे. यामुळे तुमच्या कारच्या एसी सिस्टिमवरही कमी भार पडेल. इंजिन ऑइल नेहमी योग्य पातळीवर ठेवा. CoolN देखील नेहमी तपासत रहा.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या