Home /News /explainer /

Indira Gandhi | मोरारजी देसाई म्हणाले होते 'लिटिल गर्ल'! मग त्यांनाच पराभूत करुन कशा झाल्या पहिल्या महिला पंतप्रधान

Indira Gandhi | मोरारजी देसाई म्हणाले होते 'लिटिल गर्ल'! मग त्यांनाच पराभूत करुन कशा झाल्या पहिल्या महिला पंतप्रधान

First Woman Prime Minister of India : नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्या इंदिरा गांधी यांना 'लिटिल गर्ल' म्हणून मोरारजी देसाईंनी नाकारले. त्याच देसाईंना पराभूत करुन देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

    मुंबई, 19 जानेवारी : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांची एकुलती एक कन्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना पंतप्रधान होणे जास्त कठीण गेले नाही. अगदी सुरुवातीपासूनच नेहरू इंदिराजींसाठी मार्ग तयार करत राहिले. नेहरूंनी इंदिराजींना आयुष्यभर सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले असले तरी पक्षापासून ते मंत्रालयापर्यंतची बहुतांश कामे इंदिराजींच्या देखरेखीखाली झाली. नेहरूंनी कधीही उघडपणे त्यांच्या मुलीचे नाव त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ठेवले नाही. मात्र, लाल बहादूर शास्त्री यांच्यासह त्यांच्या जवळच्या लोकांचा असा विश्वास होता की त्यांची मुलगी उत्तराधिकारी असावी, असं नेहरुंना वाटत होते. विशेष म्हणजे नेहरूंच्या मृत्यूनंतर मोरारजी देसाईंनी ज्यांना 'लिटिल गर्ल' म्हणून नाकारले, त्यांनाच वरचढ ठरत आजच्याच दिवशी इंदिराजी पंतप्रधान (First Woman Prime Minister of India) झाल्या. पण, त्यावेळच्या घडामोठी खूप रोचक आहेत. लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 च्या रात्री ताश्कंद येथे निधन झाले. यानंतर प्रश्न निर्माण झाला की आता देशाचा पुढचा पंतप्रधान कोण? गुलझारी लाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवण्यात आले. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांच्या खांद्यावर आली. त्यावेळी काँग्रेसला पक्षाचे ऐकून घेणार्‍या पंतप्रधानाची गरज होती. या दृष्टिकोनातून पक्षासमोर दोन नावे होती- एक इंदिरा गांधी आणि दुसरे मोरारजीभाई देसाई. याशिवाय कामराज स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यावेळी सिंडिकेट नेत्यांचा पक्ष प्रबळ होता आणि कामराज त्याचे प्रमुख होते. सर्व नेते कामराज यांच्यावर पंतप्रधान होण्यासाठी दबाव आणत होते. त्याचे कारण असे की, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी कधीही जाहीरपणे सांगितले नाही. त्याच वेळी, शास्त्रींच्या मृत्यूनंतर, इंदिराजींनी त्यांच्या जवळच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली. डीपी मिश्रा हे अशा नेत्यांपैकी एक होते जे कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने हवा निर्माण करू शकत होते. त्यावेळी डीपी मिश्रा यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य म्हटले जात होतं. अशा डीपी मिश्रा यांना इंदिराजींनी दिल्लीला बोलावले होते जेणेकरून ते योग्य वेळी त्यांना पंतप्रधान होण्यासाठी मदत करतील. डीपी मिश्रा यांनी आपलं पुस्तक सक्सेशन इन इंडिया'मध्ये (Succession In India 1967)लिहलंय, की काळजीवाहू पंतप्रधान गुलजारी लाल नंदा यांनाही या पदावर कायम राहायचे होते. त्यांच्या समर्थनासाठी त्यांनी इंदिराजींची भेटही घेतली होती. यावेळी इंदिराजींनी एक युक्ती खेळली आणि त्यांना सांगितले की जर इतरांनी साथ दिली तर मीही द्यायला तयार आहे. गुलजारी लाल नंदा यांनीही डीपी मिश्रा यांच्याकडे पाठिंबा मागितला. याबद्दल ते लिहितात, "मला इंदिराजींचे हेतू आधीच माहित होते आणि हे ऐकून मला नंदाची दया आली. 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांनी पंतप्रधानपदी राहावे अशी गुलझारी लाल नंदा यांची इच्छा होती. कामराज यांच्यासमोरही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, गुलझारी लाल नंदा यांच्याबाबत राम बहादूर राय यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात, "गुलझारी लाल नंदा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत नव्हते. नंदा कृपेने पंतप्रधान झाले. ते ज्येष्ठ नेते होते, त्यामुळे वर्किंग पीएम झाले. ना ते स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते आणि ना त्यांच्यावर कोणाचा विश्वास होता. इंदिरा गांधींची लाटही NTR यांना रोखू शकली नाही, काय होतं कारण? इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि गुलझारी लाल नंदा हे तिघेही स्वत:साठी जवळच्या व्यक्तींकडून पाठिंबा मिळवत होते, पण सिंडिकेटचे नेते के. कामराज पंतप्रधानपदाशिवाय इतर कशाचाही विचार करत नव्हते. वास्तविकता अशी होती की, पंतप्रधानपदासाठी इंदिरा गांधींचे नाव त्यांच्या मनातही नव्हते. डीपी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, 13 जानेवारीच्या रात्री सिंडिकेट नेत्यांची गुप्त बैठक झाली. या भेटीत कामराज यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला, पण इतर कोणालाही त्याची माहितीही नव्हती. या बैठकीत इंदिराजींच्या नावाची चर्चा झाली नाही. 14 जानेवारी रोजी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांबाबत कोणताही निष्कर्ष निघाला नसला, तरी शास्त्री यांच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा 19 तारखेला होणार असल्याचे निश्चित झाले. Mayawati Birthday: कांशीराम यांनी मायावती विषयी केलेली भविष्यवाणी कशी ठरली खरी? 14 मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांचा इंदिरा गांधींना पाठिंबा दरम्यान, डीपी मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. त्यात कामराज पंतप्रधान होण्यास राजी झाल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल आणि नकार दिल्यास इंदिराजींच्या नावाने चर्चा होईल, असे ठरले होते. बैठकीनंतर डीपी मिश्रा, एमएल सुखाडिया, व्हीपी नायक आणि केबी सहाय यांनी कामराज यांची भेट घेतली. यावेळी कामराज यांनी पंतप्रधान होण्यापेक्षा काँग्रेस अध्यक्षपदावर राहणे पसंत करणार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी हे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करणार असल्याचंही सांगितले. प्रसंग पाहून लगेच डीपी मिश्रा यांनी कामराज यांच्याकडे इंदिराजींच्या उमेदवारीचा विषय काढला. त्यांची संमती मिळाल्यानंतर सर्व 14 मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यापैकी 12 मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा देण्याचे बोलले. डीपी मिश्रा स्वतःबद्दल सांगतात की त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला कारण त्या वेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील सर्व उमेदवारांमध्ये त्या सर्वोत्तम होत्या. त्यांचा असा विश्वास होता की इंदिराजींना भारतीयत्व आणि आधुनिकता या दोन्हींचा समतोल कसा साधावा हे माहित आहे. इंदिरा गांधींच्या समर्थनाची बातमी फुटली "या बैठकीनंतर इंदिरा गांधींच्या समर्थनाची बातमी कामराज यांच्या अधिकृत वक्तव्यापूर्वीच फुटली. नंतर कामराज यांनी स्वत: अधिकृतपणे विधान केले की जवळजवळ सर्व मुख्यमंत्र्यांना इंदिरा गांधी पंतप्रधान व्हाव्यात असे वाटते. परंतु, येथे त्यांनी ते कोणाचे समर्थन करतात हे सांगितले नाही. या घोषणेनंतर मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यात थेट लढत झाली. हे सर्व माहीत असतानाही मोरारजी देसाई मागे हटायला तयार नव्हते ही वेगळी गोष्ट. अन् इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशिवाय कोणीही मोरारजी देसाईंच्या बाजूने नव्हते. नेहरूंच्या मृत्यूनंतरही मोरारजी देसाईंनी पंतप्रधानपदासाठी स्वत:ला पुढे केले होते. त्यावेळीही त्यांच्या नावावर एकमत झाले नव्हते. याचे कारण ते कोणाचेही ऐकत नव्हते. शास्त्रींच्या मृत्यूनंतरही त्यांची हीच अडचण होती. शास्त्री यांच्या निधनानंतर 8 दिवसांनी 19 जानेवारी रोजी पंतप्रधानपदासाठी मतदान झाले होते. यामध्ये इंदिरा गांधींना 355 तर मोरारजी देसाई यांना केवळ 169 मते मिळाली. अशा प्रकारे इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदासाठी निवड झाली आणि त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मोरारजी देसाई भारताचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री झाले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Indira gandhi, Politics, Woman in politics

    पुढील बातम्या