Home /News /explainer /

Global Warming: पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्याचा वेग प्रचंड वाढला; या गोष्टी कारणीभूत

Global Warming: पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्याचा वेग प्रचंड वाढला; या गोष्टी कारणीभूत

सन 2005 च्या तुलनेत पृथ्वीवरील उष्णतेचे (Earth Hit) प्रमाण दुप्पट झाले आहे आणि यामुळे आता महासागरामध्ये, हवेचे आणि जमिनीचे तापमान वाढत आहे. हा वेग इतका जास्त असेल अशी यापूर्वीच्या संशोधनांमध्ये अपेक्षा नव्हती.

    नवी दिल्ली, 18 जून : नासा (NASA) आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅथॉमॉफ्रिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या संशोधनात असे म्हटले गेले आहे की, सन 2005 च्या तुलनेत पृथ्वीवरील उष्णतेचे (Earth Hit) प्रमाण दुप्पट झाले आहे आणि यामुळे आता महासागरामध्ये, हवेचे आणि जमिनीचे तापमान वाढत आहे. हा वेग इतका जास्त असेल अशी यापूर्वीच्या संशोधनांमध्ये अपेक्षा नव्हती. इतकेच नाही तर संशोधनात असंही दिसून आलं आहे की, निसर्गात होणाऱ्या बदलांना केवळ मानवी हस्तक्षेप कारणीभूत नसून इतर कारणेही जबाबदार आहेत. हा अभूतपूर्व दर आहे अभ्यासाचे अग्रगण्य लेखक आणि नासाचे वैज्ञानिक नॉर्मन लोएब यांच्या भूगर्भशास्त्रीय संशोधन पत्रात 'पृथ्वी अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढते आहे' या विषयावर गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार हा तापमान वाढीचा वेग अभूतपूर्व आहे. पृथ्वीच्या उर्जा असंतुलनाचे मोजमाप करण्यासाठी संशोधकांनी उपग्रह डेटाचा उपयोग केला, त्यातून जो ग्रह सूर्यापासून शोषून घेणारी ऊर्जा आणि अवकाशात पुन्हा विखुरल्या जाणार्‍या उर्जामधील फरक आहे, असे दिसून आले. असंतुलन कसे आहे यूनिवर्सिटी एट बुफेलोतील हवामान शास्त्रज्ञ स्टुअर्ट इव्हान्सचे म्हणणे आहे की, जेव्हा असंतुलन पॉझिटिव्ह असते तेव्हा पृथ्वी कमी उष्णता सोडते आणि जास्त प्रमाणात शोषते. ग्लोबल वार्मिंगच्या दिशेने टाकले जाणारे हे पहिले पाऊल आहे .पृथ्वी ऊर्जा मिळवत असल्याचे हे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले. अभ्यासानुसार असे आढळले आहे की सन 2005 च्या तुलनेत 2019 मध्ये वातावरणातील हे असंतुलन जवळपास दुप्पट झाले आहे. एनओएएच्या पॅसिफिक मरीन एनवायरनमेंट लॅबोरेटरीचे या अभ्यासाचे सह-लेखक आणि समुद्रशास्त्रज्ञ ग्रेगरी जॉन्सन म्हणतात की, ही वाढ झालेली ऊर्जा खूप मोठी ऊर्जा आहे. हीरोशिमावर टाकल्या गेलेल्या अणूबॉम्बच्या प्रति सेकंदाला चार विस्फोटांइतकी ती भीषण आहे. किंवा दुसऱ्या उदाहरणात सांगायचे तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती एका वेळी वीस चहाच्या इलेक्ट्रिक केटलचा वापर करण्यासाठी वापरली जाणारी जेवढी शक्ती असेल. तेवढीही तापमानात वाढ आहे. संख्यात्मकरित्या ती मोजणं खूप कठीण का आहे. पूर्वी काय स्थिती होती पृथ्वीला सूर्याकडून प्रति चौरस मीटर सुमारे 240 वॅट्स ऊर्जा मिळते. 2005 मध्ये अभ्यासाच्या सुरूवातीस आपली पृथ्वी प्रति चौरस मीटर 239.5 वॅट दराने ऊर्जा प्रसारित करीत होती. ज्यामुळे अर्ध्या वॅटचे पॉझिटिव्ह असंतुलन निर्माण होत होते. परंतु, सन 2019 च्या शेवटी हा फरक प्रति चौरस मीटरपेक्षा जवळपास दुप्पट झाला आहे. हे वाचा - Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, मिळतील 8 पट अधिक अँटिबॉडीज, भारतीय उष्ण वातावरणासही अनुकूल समुद्र आणि उपग्रह डेटा  पृथ्वीवरील जास्तीत-जास्त उष्णता म्हणजे 90 टक्के उष्णता समुद्र शोषून घेतात. जेव्हा संशोधकांनी उपग्रहांच्या डेटाची तुलना समुद्राच्या सेन्सरच्या सिस्टमद्वारे नोंदविलेल्या तापमानाशी केली तेव्हा संशोधकांना अधिक खात्री झाली. डेटाचे दोन्ही संच अपेक्षेपेक्षा अधिक समान असल्याचे दिसून आले आणि असंतुलन वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हे वाचा - धक्कादायक! नदी, तलावांच्या पाण्यातही Corona विषाणू सापडत असल्यानं खळबळ वेग वाढण्याचे कारण? हा वेग कशामुळं उद्भवत आहे हा प्रश्न होता. अभ्यासानुसार ढग आणि समुद्रातील बर्फ कमी होण्याकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यानुसार सूर्याकडून येणार्‍या किरणांना प्रतिबिंबित करते. या व्यतिरिक्त, मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड यासारख्या ग्रीनहाऊस वायूंची वाढ, पाण्याची वाफ यासह इतर घटकांमधेही जास्त उष्णता जमा होण्याचे एक कारण आहे, ज्यामुळे हे असंतुलन वाढत आहे. या चक्रीय बदलांपासून मानवा निसर्गातील हस्तक्षेप परिणाम वेगळे करणे कठीण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Iceland, Nasa

    पुढील बातम्या