Home /News /explainer /

78 वर्षांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता! यामागची गोष्ट माहित आहे का?

78 वर्षांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता! यामागची गोष्ट माहित आहे का?

First Time Tricolour Hoist : 78 वर्षांपूर्वी भारतीय तिरंगा फडकवण्याचे श्रेय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाते. हे काम त्यांनी अंदमान निकोबारमध्ये केले. खरे तर दुसऱ्या महायुद्धात जपानने हे बेट ब्रिटनकडून जिंकून घेतले होते. त्यानंतर ते सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला देण्यात आले. त्यानंतर 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस पोर्ट ब्लेअरला गेले आणि तेथे तिरंगा फडकवला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 डिसेंबर : 78 वर्षांपूर्वी भारतीय तिरंगा फडकवण्याचे श्रेय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाते. 29 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे पोहोचले. ते येथे 3 दिवसांसाठी आले होते. यावेळी 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजींनी जिमखाना मैदानावर तिरंगा फडकवला. आज त्याचा 78 वा वर्धापन दिन आहे. काय होती यामागची गोष्ट? भारत स्वतंत्र्य होण्याच्या अगोदर ब्रिटशांनी तिरंगा कसा फडकू दिला? चला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ. दुसऱ्या महायुद्धात जपानने या बेटावर ताबा मिळवला होता. ते 1942 मध्ये ताब्यात घेण्यात आले, जे 1945 पर्यंत टिकले. 29 डिसेंबर रोजी त्यांनी ते सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारकडे सुपूर्द केले. मात्र, त्यावर जपानचे प्रत्यक्ष नियंत्रण राहिले. आधी डच आणि ब्रिटिशांचा ताबा नंतर जपान.. सुरुवातील हे बेट हॉलंडकडे होते. नंतर ते ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी ते युद्धात जिंकले. दुसर्‍या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर ते पुन्हा ब्रिटनकडे आले. नेताजींकडून अंदमानचं शहीद द्विप असं नामकरण 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकवला तेव्हा त्यांनी अंदमानचे नाव शहीद आणि निकोबारचं नाव स्वराज्य ठेवलं. सुभाष यांनी जो तिरंगा फडकवला होता, तो तिरंगा काँग्रेसने अंगिकारला होता, मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यावर फिरणारा चरखा होता. यानंतर आझाद हिंद सरकारने जनरल लोकनाथन यांना येथे राज्यपाल केलं. 1947 मध्ये ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. आम्ही भारतीय भूमीवर असू, असे नेताजी म्हणाले होते या वर्षाच्या अखेरीस आझाद हिंद फौज नक्कीच भारतीय भूमीवर पाऊल ठेवेल, असे नेताजींनी यापूर्वी जपान आणि सिंगापूरमधील भाषणांमध्ये सांगितले होते. पोर्ट ब्लेअरला पोहोचल्यावर त्यांनी सेल्युलर जेलमध्ये जाऊन एकेकाळी येथे कैद झालेल्या भारतीय क्रांतिकारकांना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सुभाषचंद्र बोस यावेळी काय म्हणाले? अंदमानवर भारतीय तिरंगा फडकवल्यानंतर सुभाषचंद्र बोस तीन दिवस इथेच राहिले. 1 जानेवारीला ते सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरमधील भाषणात ते म्हणाले, आझाद हिंद फौज भारतात क्रांतीची ज्योत जागवेल, ज्यामध्ये ब्रिटीश साम्राज्य जळून राख होईल. अंतरिम आझाद हिंद सरकार, ज्यांच्या अधिकाराखाली आज अंदमान आणि निकोबार बेटे आहेत आणि ज्याला जर्मनी आणि जपानसह जगातील नऊ महान देशांनी मान्यता दिली आहे. त्यांनी आमच्या सैन्याला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. Shaheed Udam Singh : 'जालियनवाला हत्याकांडाचा बदला' हा जीवनाचा उद्देश कसा बनला? अंदमानचा अर्थ काय आहे? अनमन हा शब्द हनुमान या मलय भाषेतील शब्दावरून आला आहे जो हिंदू देवता हनुमानाच्या नावाचे सुधारित रूप आहे. निकोबार हा शब्दही याच भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ नग्न लोकांची भूमी असा होतो. येथे एकूण 572 बेटे आहेत, जे सौंदर्यात ऐकापेक्षा एक आहेत. स्वातंत्र्यलढ्यात यांचं महत्त्व काय? स्वातंत्र्य चळवळीतील दडपशाही धोरणांतर्गत क्रांतिकारकांना भारतापासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिश राजवटीने या जागेचा वापर केला. त्यामुळे हे ठिकाण आंदोलकांमध्ये काळा पाणी म्हणून ओळखले जात होते. पोर्ट ब्लेअरमध्ये एक वेगळे तुरुंग, सेल्युलर जेल, कैद्यांसाठी बांधले गेले, जे ब्रिटिश इंडियासाठी सायबेरियासारखेच होते. या कारागृहात 694 सेल आहेत. या सेल बनवण्यामागचा उद्देश कैद्यांचा परस्पर संवाद रोखणे हा होता. ऑक्टोपससारख्या सात फांद्या पसरलेल्या या विशाल कारागृहाचे आता फक्त तीन भाग उरले आहेत. कारागृहाच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. येथे एक संग्रहालय देखील आहे जिथे स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करण्यात आलेली शस्त्रे पाहायला मिळतात. पेरियार यांनी हिंदू देवता आणि धार्मिक ग्रंथांविरुद्ध बोललेल्या वादग्रस्त गोष्टी सुभाषचंद्र यांच्या नावावर एक बेट येथे एक बेट आहे, ज्याला सुभाषचंद्र बोस द्वीप असेही म्हणतात. हे ब्रिटिशकालीन वास्तुकलेच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. हे बेट 200 एकरांवर पसरले आहे. येथे विविध पक्षी पहायला मिळतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Subhash chandra bose death

    पुढील बातम्या