चेन्नई, 6 मार्च : अलीकडेच तमिळनाडूमध्ये बिहारच्या मजुरांना मारहाण झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर काहीजण रेल्वेने आपल्या गावी परतले. याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यावरून बिहार आणि तामिळनाडूमध्येही राजकारण तापले आहे. या व्हायरल व्हिडिओची अद्याप पडताळणी झालेली नाही. तामिळनाडूतील उद्योग मालक चिंतेत आहेत, कारण जर हे प्रकरण पुढे गेले आणि उत्तर भारतीय कामगार परत जाऊ लागले तर औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की तामिळनाडूमध्ये उत्तर भारतातील 10 लाखाहून अधिक स्थलांतरित मजूर आहेत जे तेथे काम करत आहेत. जे अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतात. परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परतले तर याचा वाईट परिणाम तामिळनाडूतील उद्योग क्षेत्रावर होईल. तसे झाल्यास उद्योगधंद्यांचे कामकाज ठप्प होऊ शकते.
प्रश्न – उत्तर भारतातील कामगारांसोबत गैरवर्तन आणि माघारी जाण्याच्या बातम्यांमुळे तामिळनाडूमध्ये उत्पादक आणि उद्योगातील लोक चिंतेत का आहेत?
सरकारी आकडेवारीनुसार, उत्तर भारतातील सुमारे 10 लाख मजूर तामिळनाडूमध्ये काम करत आहेत. खरं तर, तामिळ उद्योगाधंद्यासाठी ही चिंतेची बाब आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिथे काम करणाऱ्या हिंदी भाषिक मजुरांशी गैरवर्तन केले जात आहे. अशा अफवा तिथे पसरवल्या जात आहेत आणि या अफवांच्या प्रभावामुळे तामिळनाडूचे उद्योग क्षेत्र चिंतेत आहे. चेन्नई डिस्ट्रिक्ट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सचिव जया विजयन सांगतात की, आम्ही उत्तर भारतातील मजुरांशिवाय काम करू शकत नाही. होळीनंतर तेथून किती मजूर परततील ते पाहत आहोत.
प्रश्न – पोलीस या संदर्भात काय कारवाई करत आहेत?
हे व्हिडिओ जाणूनबुजून पसरवले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे मॅसेज फेक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. तमिळनाडूच्या राज्यपालांनी कामगारांसोबतच्या गैरवर्तणुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे. राज्य सरकारने डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या बनावट व्हायरल व्हिडिओला राजकीय षडयंत्र देखील म्हटले जात आहे.
वाचा - धावत्या ट्रेनमधून उतरताना चिमुकल्यासह खाली कोसळली महिला, पुढे काय झालं? VIDEO
प्रश्न - ही समस्या कशी सुरू झाली?
ही समस्या उत्तर भारतीय मजुरांशी संबंधित असलेल्या दोन व्हिडिओंमधून सुरू झाली, व्हिडिओमध्ये त्यांना तामिळनाडूमध्ये मारहाण केली जात आहे. हे व्हिडिओ सोशल व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणि दोन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तर भारतीय हिंदी भाषिक मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने पावले उचलत एकमेकांशी चर्चा केली. नंतर हे दोन्ही व्हिडीओ तामिळनाडू पोलिसांनी खोटे ठरवून चुकीच्या हेतूने बनवल्याचे सांगितले.
प्रश्न – तामिळनाडूतील मजूरही स्थलांतरित झाले आहेत का?
तामिळनाडूतून 2000 हून अधिक हिंदी भाषिक मजूर स्थलांतरित झाले आहेत. रेल्वे सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस सुरुलिव्ह जे राज्य उद्योग संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. ते म्हणाले की, तीन दिवसांत 2000 हून अधिक मजूर राज्यातून बाहेर पडले आहेत. एकट्या कोईम्बतूरमध्ये 20000 हून अधिक उत्तर भारतीय मजूर वेगवेगळ्या औद्योगिक युनिट्समध्ये काम करतात.
वाचा - PHOTOS: फक्त आवाज ऐकण्यासाठी 2KM लांब लाईन; बागेश्वर बाबामध्ये असं काय आहे?
प्रश्न – तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावर काय पाऊल उचललं?
स्टॅलिन यांनी नितीशकुमार यांच्याशी संवाद साधला. हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कामगार परतत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी नितीश यांना या प्रकरणी मध्यस्थी करून कामगारांची समजूत काढण्यास सांगितले. ते म्हणाले, राज्यातील जनता चांगली असून कोणी कोणाचे नुकसान करत नाही. पोलीस बंदोबस्तासाठीही सज्ज आहेत.
प्रश्न – या व्हायरल व्हिडिओमुळे उत्तर भारतीय मजूर खरोखर घाबरले आहेत का?
चेन्नईतील एका बांधकाम अभियंत्याने सांगितले की, होळीच्या सणामुळे लोक आधीच गेले आहेत. परंतु, व्हिडिओमध्ये मारहाण वृत्त पसरवल्यानंतर मजूर घाबरले आहेत, म्हणूनच ते जात आहेत. या अफवा सातत्याने पसरत आहेत. त्यांना रोखणे सोपे नाही. होळीसाठी निघालेल्या काही मजुरांनी आता परतण्यास नकार दिला आहे. तामिळनाडूत अजूनही काही मजुरांची कुटुंबे परत जाण्यासाठी दबाव आणत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.