बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या देशभरात चर्चेत आहेत. त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. ते म्हणतात की भारत हिंदू राष्ट्र राहील. त्यांनी नुकताच टिकमगड येथे 'समृद्ध भारतातील सनातनची भूमिका' या कार्यक्रमाला सुरुवात केली.
या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा मोठं वक्तव्य केलं. हिंदु राष्ट्राच्या कल्पनेत भारतातील मुस्लीम जिथे असेल, तिथेच राहील, असे ते म्हणाले. कोणालाही भारत सोडण्याची गरज नाही. हिंदु राष्ट्राच्या कल्पनेत जसं हिंदू पाकिस्तानात राहतात, त्याचप्रमाणे मुसलमानही भारतात राहतील.
शास्त्री म्हणाले की, तरीही जर कोणाला काही अडचण असेल तर ते नक्कीच त्याचा पासपोर्ट बनवून देतील. 'समृद्ध भारतातील सनातनची भूमिका' या कार्यक्रमात समाजातील विचारवंत आणि जनतेसोबत प्रश्नोत्तरे घेण्यात आली. टिकमगडमध्ये मुस्लिम दगडफेक नाही तर फुलांचा वर्षाव करतात. त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात की हिंदू राष्ट्र म्हणजे सनातन धर्म, सनातन म्हणजे प्रत्येकाचे घर आहे. हिंदू राष्ट्राची गरज आहे, कारण भारतात रामयात्रेवर दगडफेक केली जाते. जातीवादाच्या नावाखाली भाकरी भाजली जाते, असंही ते म्हणाले.
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राची मागणी केल्यानंतर ते अनेकांच्या निशाण्यावर आले होते. त्यावर देशभरातील प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. प्रत्येक वेळी त्यांनी हिंदु राष्ट्राची मागणी केली.