Home /News /explainer /

Explainer: केवळ 500 रुपयांमध्ये श्रीमंत व्हायचंय? कसा सुरु करणार चटणी बनवण्याचा व्यवसाय? जाणून घ्या

Explainer: केवळ 500 रुपयांमध्ये श्रीमंत व्हायचंय? कसा सुरु करणार चटणी बनवण्याचा व्यवसाय? जाणून घ्या

भारतीय खाद्यसंस्कृतीत चटणी या पदार्थाला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे विविध प्रकारच्या तिखट, गोड, आंबट अशा चविष्ट चटण्या आहारात समाविष्ट असतात.

    धावपळीच्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात प्रक्रियायुक्त (Processed food) किंवा तयार अन्नपदार्थांना (Ready to eat food) मोठी मागणी आहे. या पदार्थांचा वापर घरोघरी आणि हॉटेल्समध्ये सर्रास होतो. त्याचप्रमाणे परदेशातही अशा भारतीय अन्नपदार्थांना चांगली मागणी आहे. एकूण बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती या अन्नपदार्थांच्या निर्मितीचं स्टार्टअप (Start Up) सुरू करताना दिसत आहेत. कोरोना काळात नोकऱ्यांवर मोठा परिणाम झाल्यानं अशा स्टार्टअपच्या मदतीने अनेक युवक-युवती स्वतःसोबतच अन्य लोकांनाही रोजगार उपलब्ध करून देत आहेत. अन्नपदार्थांमध्ये विविध प्रयोग करण्याची आवड असलेली अनिंदिता सेंगर (Anindita Senger) हिनंदेखील अशीच वाट निवडली आणि चटणी चाची (Chatni chachi) नावाचा छोटासा स्टार्टअप सुरू केला. या माध्यमातून ती विविध प्रकारच्या चविष्ट चटण्या तयार करून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहे. तिचा हा स्टार्टअप आता बऱ्यापैकी स्थिरावला असून, चटणी चाचीच्या विविध उत्पादनांना मागणीदेखील चांगली आहे. नोकरी मिळत नाही, कोरोना काळात नोकरी गमावलीय म्हणून व्यवसाय (Top Business Idea for making money) सुरू करू इच्छिणाऱ्या नवोदित व्यावसायिकांसाठी अनिंदिता एक प्रेरणास्थान ठरलीय. तिनं हा स्टार्टअप कसा सुरू केला, त्यामागची कारणं, नियोजन, व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती `द बेटर इंडिया डॉट कॉम`नं दिली आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीत चटणी या पदार्थाला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे विविध प्रकारच्या तिखट, गोड, आंबट अशा चविष्ट चटण्या आहारात समाविष्ट असतात. या चटण्या प्रामुख्यानं भाज्या किंवा काही फळांपासूनही बनवलेल्या असतात. आहारातलं चटणीचं महत्त्व ओळखून खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रयोग करण्याची आवड असलेल्या अनिंदिता सेंगर हिनं चटणी चाची नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. हा चटणी उद्योग सध्या मुंबईत अनिंदिताच्या घरातूनच केला जात असून, या माध्यमातून ती देशभरातल्या खवय्यांना सेंद्रिय भाज्यांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या चविष्ट चटण्या पुरवते. हा स्टार्टअप अल्पावधीतच यशस्वी ठरला असून, मार्केटमधून तिला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. लॉकडाउनचा उपयोग अनिंदिताने व्यवसायवृद्धीसाठी केला. प्रॉडक्ट लाइन (Product Line) वाढवण्यासाठी नियोजन केलं आणि मार्केटिंगचे नवे पर्यायही शोधले. तिचा हा स्टार्टअप नवउद्योजकांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी म्हणावा लागेल. `मी हा व्यवसाय छोट्या स्वरुपात सुरू केला. यातून जो फायदा झाला, तो मी परत याच व्यवसायात गुंतवला. कोणत्याही व्यवसायात निश्चित असं काही नसतं. त्यामुळं व्यवसायात जोखीम आलीच. मी पण अजून नवीन गोष्टी शिकत आहे. त्यातून मी स्वतःला घडवत पुढे जात आहे. ज्या व्यक्तीला उत्तम लोणचं (Pickle) किंवा चटणी बनवता येते ती व्यक्ती अशा पद्धतीचा व्यवसाय अगदी घरबसल्या करू शकते. कोणत्याही व्यवसायात जोखीम असते. त्यामुळं ती पत्करून, अडचणींमधून मार्ग काढत पुढं जाण्याची तयारी असलेली व्यक्ती अशा प्रकारचा व्यवसाय करू शकते,` असा सल्ला अनिंदता सेंगर हिनं दिला. `कोणताही व्यवसाय करताना, तुम्ही चटण्या, लोणची किंवा अन्य काही तयार करणार असाल, तर तुम्ही निवडलेल्या एकाच उत्पादनावर लक्ष्य केंद्रित करणं गरजेचं आहे. ग्राहकांकडून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाल्यावरच अन्य उत्पादनांच्या निर्मितीचा विचार करावा. चटणीसारख्या पदार्थाचं उत्पादन घेण्यापूर्वी तुम्ही मसाले, भाज्या आदी कच्च्या मालाची एक यादी तयार करावी. हा पदार्थ उत्पादित करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणुकीची गरज नसते. अगदी 500 रुपयांतही तुम्ही उत्पादन सुरू करू शकता. तुमच्याकडे किती मागणी नोंदवली जाते, त्यावर उत्पादनाचं गणित मांडावं,` असं अनिंदितानं सांगितलं. `कोणताही व्यवसाय करताना, क्षणभर तुम्हीच ग्राहक (Customer) आहात असा विचार करून आपल्या उत्पादनाची निर्मिती आणि मार्केटिंग करावं. तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, पुढं जायचं असेल तर ग्राहकांचा विश्वास हा महत्त्वाचा असतो,` असं अनिंदितानं सांगितलं. `चटणी उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी दर्जा, चव आणि पोषणमूल्य या बाबींकडं विशेष लक्ष द्यावं. चटण्यांच्या निर्मितीसाठी कोणत्याही मोठ्या मशिनरींची गरज नसते. केवळ चांगला मिक्सर उपलब्ध असणं गरजेचं आहे. याशिवाय चाकू, प्लेट्स या स्वयंपाकघरातल्या दैनंदिन वापराच्या वस्तू हव्यात. तुमच्या उत्पादनाला जसजशी मागणी वाढेल त्या हिशोबानं तुम्ही मशिनरी किंवा अन्य साहित्य खरेदी करू शकता. चटणी तयार करण्यासाठी खलबत्ता आणि पाटा-वरंवटा असेल तर उत्तमच. कारण यामुळे चटणी अधिक चविष्ट होते,` असं अनिंदितानं सांगितलं. हे वाचा - Sex in the space : अंतराळवीर अंतराळात सेक्स करतात का? `तुम्ही अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला `एफएसएसएआय` (FSSAI) प्रमाणपत्र घेणं जरूरी आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही असा व्यवसाय मुंबईत करत असाल तर कायदेशीर कामं करणाऱ्या कोणत्याही एजन्सीची यासाठी मदत घेऊ शकता. ही प्रक्रिया खूप सोपी असल्यानं तुम्ही स्वतः ती केलीत तर अधिक चांगलं. `एफएसएसएआय`सोबत न्यूट्रिशनल तपशीलाचं (Nutritional Value) प्रमाणपत्र घेणंही महत्त्वाचं असतं. तसं `एफएसएसएआय`च्या प्रमाणपत्रावर काम भागू शकतं. परंतु, तुम्ही जर तुमचं उत्पादन दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवणार असाल तर दुकानदार तुमच्याकडे याबाबत चौकशी करू शकतात. यासाठी मुंबईत अनेक एजन्सीज आहेत. परंतु, अॅग्रोबायोमिक्स लॅब तुम्हाला यासाठी निश्चित मदत करू शकते,` असं अनिंदितानं सांगितलं. `आपल्या उत्पादनाचं मूल्य किंवा किंमत (Price) ठरवणं ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. एखादं उत्पादन तयार करण्यासाठी खरेदी केलेल्या एकूण कच्च्या मालाच्या किमतीला वापरलेल्या कच्च्या मालाच्या प्रमाणानुसार भागावं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनाची किंमत कळेल. त्यात पॅकेजिंगचा खर्च आणि तुमच्या मेहनतीचा खर्च मिळवावा आणि अंतिम किंमत ठरवावी. या आकडेमोडीत तुम्ही तुमचं मार्जिनही गृहीत धरावं; मात्र ते प्रमाणापेक्षा अधिक नसावं तर संतुलित असावं. एखाद्या ग्राहकानं तुमचं उत्पादनाची किंमती एवढी का असं विचारलं तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे, या दृष्टीनं सर्व हिशोब असावा,` असं अनिंदितानं सांगितलं. उत्पादनाच्या पॅकेजिंगबाबत अनिंदिता सांगते, की `तुमचं उत्पादन घरगुती, चविष्ट, तसंच पौष्टिक असेल तर या बाबी पॅकिंगवर नमूद करणं आवश्यक आहे. चटण्यांचं पॅकिंग करताना विशेषतः डब्यांचा वापर करावा. कारण यामुळं चटणीची चव, पोषण एकदम काचेच्या जारमधल्या चटणीसारखं राहील.` `खाद्यपदार्थांचा व्यवसाय करताना पदार्थ आपण आपल्या कुटुंबासाठी बनवत आहोत, असा विचार करून उत्पादन करा. जसं आपण घरी स्वच्छता राखत अन्नपदार्थ बनवतो, तशीच स्वच्छता राखून ग्राहकांसाठी चटणी बनवा. चटणीसाठी कोणता स्वाद निवडायचा हे तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही मिरची निवडलीत तर तिची चव वेगळी असते. टोमॅटो निवडलात तर त्याची चव वेगळी असते. यातील मिरची जास्त तिखट असेल तरी चटणीची चव बिघडू शकते. अशा स्थितीत चटणीची चव कायम राहण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. ते करण्याचं कसब आणि तयारी तुमच्याकडं असावी. चटणीसाठी लागणारा कच्चा माल खराब झाल्यास त्याचा वापर करणं टाळा. तुम्ही चटण्या सेंद्रीय भाज्यांपासून बनवल्याचा दावा करत असाल तर प्रत्यक्षात अन्य भाज्यांचा वापर न करता सेंद्रिय भाज्यांचाच वापर करावा. एखाद्या वेळी अशा भाज्या उपलब्ध नसतील आणि चटणीला मागणी आली तर ग्राहकांना सेंद्रिय भाज्या उपलब्ध नाहीत असं स्पष्ट सांगा. यामुळे तुमच्यावरचा विश्वास वाढेल. प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या सुधारणेला वाव असेल, तर त्याचा जरूर वापर करा. आपल्या उत्पादनाविषयी ग्राहकांकडून वारंवार प्रतिक्रिया जाणून घ्या. घेतलेल्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करा. काही अडचणी असतील तर ग्राहकांशी थेट बोला,` असा सल्ला अनिंदिता हिनं नवोदित व्यावसायिकांना दिला आहे. मार्केटिंगबाबत (Marketing) अनिंदितानं सांगितलं, की `माउथ पब्लिसिटी हे मार्केटिंगचं सर्वांत महत्त्वाचं माध्यम आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभावी वापर मार्केटिंगसाठी करा. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपल्या उत्पादनाचं पेज तयार करून त्यावर उत्पादनांची माहिती सातत्यानं शेअर करा.` `यश–अपयशाचा विचार करून व्यवसाय करू नका, तर पूर्ण विचार करून व्यवसाय करा. मनात आलं व्यवसाय करायचा, तर त्यावर तातडीनं अंमल करा. तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही उत्तम व्यावसायिक होऊ शकता, तर एकदा प्रयत्न जरूर करा,` असा सल्ला अनिंदिता सेंगर हिनं नवउद्योजकांना दिला. हे वाचा - Explainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक? अशी वाढणार भारतीय लष्कराची ताकद व्यवसाय कोणताही असो, चटणी, लोणचं निर्मिती किंवा अन्य काही, तुम्ही किती प्रामाणिकपणे आणि अभ्यासू वृत्तीनं करता, यावर त्याचं यश-अपयश अवलंबून असतं. अनिंदिता सेंगरनं खाद्यपदार्थांवर प्रयोग करण्याची आवड व्यवसायात आजमावली आणि आज तिचा चटणी चाची हा ब्रॅंड यशस्वी ठरला आहे. या ब्रॅंडचा विस्तार देशातल्या अन्य शहरांमध्ये करायचं तिचं स्वप्न आहे. नवउद्योजकांसाठी तिची वाटचाल आणि व्यावसायिक सल्ला मोलाचा म्हणावा लागेल.
    First published:

    Tags: Business, Money

    पुढील बातम्या