मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: कोविड बाधितांच्या कुटुंबासाठी ईपीएफओच्या या आहेत योजना; खातेधारकांना मोठा आधार

Explainer: कोविड बाधितांच्या कुटुंबासाठी ईपीएफओच्या या आहेत योजना; खातेधारकांना मोठा आधार

गेल्या वर्षीही ईपीएफओने अशा प्रकारे अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती.

गेल्या वर्षीही ईपीएफओने अशा प्रकारे अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती.

गेल्या वर्षीही ईपीएफओने अशा प्रकारे अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती.

  • Published by:  Sunil Desale
नवी दिल्ली, 2 जून: कोविड-19 महासाथीच्या (Covid19 Pandemic) पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेअंतर्गत (EPFO) काही बदल केले आहेत. हे बदल एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत (ESIC) दिलं जाणारं पेन्शन आणि एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत दिला जाणारा विमा (Insurance Cover) या सदर्भात आहेत. या बदलांमुळे 'ईपीएफओ'च्या सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सध्याच्या कठीण काळात बराच मोठा आधार मिळणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स सात लाखांपर्यंत 'एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम'अंतर्गत (EDLI) दिल्या जाणाऱ्या विम्याची रक्कम सात लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. 'ईपीएफओ'च्या सर्व सदस्यांना या योजनेअंतर्गत निश्चित विमाकवच दिलं जातं. 'ईपीएफओ'च्या सदस्याचा नोकरीत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या नोंदणीकृत वारसाला (Registered Nominee) सात लाखांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात मिळू शकण्याची तरतूद EDLIमध्ये आहे. गेल्या 12 महिन्यांत त्या कर्मचाऱ्याचं वेतन किती होतं, त्यावर ही विमा रक्कम अवलंबून आहे. ती जास्तीत जास्त सात लाख रुपये असू शकते. परदेशी कोरोना लशींचं भारतात लोकल ट्रायल रद्द झाल्याने काय फायदा होणार? तसंच, 15 फेब्रुवारी 2020पासून पासून ही विमा रक्कम कमीत कमी 2.5 लाख रुपये दिली जाते. शार्दूल अमरचंद मंगलदास अँड कंपनीच्या पार्टनर पूजा रामचंदानी यांच्या म्हणण्यानुसार हा बदल खूप फायदेशीर आहे. कारण रक्कम म्हणून तर ती मोठी आहेच; पण नोकरीमध्ये बदल झाला असेल, तरी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना हा लाभ मिळतो. जे कर्मचारी कमीत कमी सलग 12 महिने ईपीएफओचे सदस्य असतील, ते सर्व कर्मचारी किमान अडीच लाखांचा विमा मिळण्यास पात्र होतात. अशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अधिकृत वारसांना विमा रक्कम दिली जाते. हे 12 महिने संबंधित कर्मचारी एकाच संस्थेत कार्यरत असला पाहिजे, असं बंधन आता ठेवण्यात आलेलं नाही. त्या कालावधीत तो एकापेक्षा अधिक संस्थांमध्ये कार्यरत असला, तरी तो ईपीएफओचा सदस्य असला पाहिजे, एवढीच अट ठेवण्यात आली आहे. दुसरा कोविड अ‍ॅडव्हान्स कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या पाच कोटींहून अधिक सदस्यांसाठी दुसऱ्या कोविड अॅडव्हान्सची (Covid Advance) सोय केली आहे. तीन महिन्यांचं मूळ वेतन (Basic Pay) आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) किंवा संबंधित कर्मचाऱ्याच्या ईपीएफ अकाउंटमध्ये असलेल्या रकमेच्या 75 टक्के रक्कम यांपैकी जी कमी असेल ती रक्कम काढण्याची मुभा कर्मचाऱ्याला दिली जाते. ती रक्कम परत भरावी लागत नाही. गेल्या वर्षीही ईपीएफओने अशा प्रकारे अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्या पहिल्या अ‍ॅडव्हान्सच्या वेळी लागू असलेल्या पद्धतीनेच दुसरा अ‍ॅडव्हान्स काढता येऊ शकतो.
First published:

Tags: Coronavirus, Epfo news

पुढील बातम्या