मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Turkey Economy | तुर्कीत महागाईचा भडका, स्वस्त ब्रेडसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा! जनता अध्यक्षांना का देतेय दोष?

Turkey Economy | तुर्कीत महागाईचा भडका, स्वस्त ब्रेडसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा! जनता अध्यक्षांना का देतेय दोष?

गेल्या काही आठवड्यांत तुर्कस्तानमधील (Turkey) आर्थिक संकट (Economic Crisis) अधिकच गडद होत चालले आहे. देशाचे चलन तुर्की लिरा सतत घसरत असून महागाई गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या बेरोजगारीने लोक त्रस्त आहेत. स्वस्त ब्रेड खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यांत तुर्कस्तानमधील (Turkey) आर्थिक संकट (Economic Crisis) अधिकच गडद होत चालले आहे. देशाचे चलन तुर्की लिरा सतत घसरत असून महागाई गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या बेरोजगारीने लोक त्रस्त आहेत. स्वस्त ब्रेड खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यांत तुर्कस्तानमधील (Turkey) आर्थिक संकट (Economic Crisis) अधिकच गडद होत चालले आहे. देशाचे चलन तुर्की लिरा सतत घसरत असून महागाई गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या बेरोजगारीने लोक त्रस्त आहेत. स्वस्त ब्रेड खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

अंकारा, 17 डिसेंबर : तुर्कस्तानची (Turkey) आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाईचा भडका उडाला असून तुर्कीचे चलन तुर्की लिरा (Turkish Lira) घसरत आहे. स्वस्त ब्रेड खरेदीसाठी दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दूध, औषधे, टॉयलेट पेपर यासारख्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन Recep Tayyip Erdogan) यांनी तुर्कीच्या लिरामध्ये घसरण झाल्याने किमान वेतनात 50 टक्के वाढ केली आहे. तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेची ही अवस्था का आणि कशी झाली याचे तज्ज्ञांना आश्चर्य वाटत नाही. तुर्कस्तानच्या आर्थिक स्थितीत राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे ते सांगत आहेत.

कोरोनाकाळात परिस्थिती आणखी बिघडली

काही काळापासून, विशेषत: कोरोनाच्या काळात तुर्कीमधील परिस्थिती बिघडू लागली होती. गेल्या महिन्यातच, कामगार संघटनांच्या महासंघाने म्हटले होते की बेरोजगारी, जीवनावश्यक किंमतीतील महागाई, वाढत्या किंमती सर्वसामान्यांचं जगणं अवघड करत आहेत. तेव्हापासून परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

महामारीच्या आधीच सुरुवात

कोविड महामारीचा उद्रेक होण्याआधी आणि जगातील अर्थव्यवस्थांची पुरवठा साखळी व्यवस्था बिघडायला सुरुवात होण्याच्या दोन वर्षापूर्वीही तुर्की मंदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. कर्ज वाढत होते, तुर्की लिरा घसरत होता. मात्र, गेल्या काही आठवड्यांत या संथ गतीला वेग आला आहे, ज्यासाठी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोन हे अधिक जबाबदार मानले जात आहेत.

व्याजदर कमी करण्यासाठी दबाव

तुर्कस्तानच्या आर्थिक समस्यांची मुळे खोलवर आहेत. परंतु, अध्यक्ष एर्दोआन यांनी व्याजदर कमी करण्यासाठी केलेल्या दबावामुळे अलीकडील संकट उद्भवले आहे. वाढत्या महागाईमुळे एर्दोगन यांनी हे पाऊल उचलले. मात्र, जगभरातील अर्थतज्ञ ज्या धोरणाची शिफारस आहेत, त्या धोरणाच्या हे अगदी विरुद्ध होते.

सायबेरियामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद! WMO चा जगाला इशारा

पूर्वी असे नव्हते

रजब तय्यप एर्दोगन हे 18 वर्षांपासून तुर्कस्तानवर राज्य करत आहेत. 2003 मध्ये ते सत्तेवर आले तेव्हाही देशाची अर्थव्यवस्था फारशी चांगली नव्हती. त्यावेळी त्यांची विकासाची रणनीती खूप प्रभावी ठरली होती. पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प स्वीकारून त्यांनी परदेशी गुंतवणूक आकर्षित केली. त्याचे परिणामही दिसू लागले आणि एर्दोगन यांच्या राजवटीच्या पहिल्या दशकात तुर्कस्तानमधील गरिबी कमी झाली, परकीय गुंतवणूकही वाढली.

चलनवाढ आणि घसरण याकडे लक्ष दिले नाही

पण हा ट्रेंड चालू राहू शकला नाही. अशा परिस्थितीत कर्ज काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केवळ कर्जातच वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली, उच्च व्याजदरामुळे परदेशी गुंतवणूकदार जोखीम घेण्यास प्रवृत्त झाले आणि ते पैसे देत राहिले. एर्दोन यांनी कर्ज घेणे सुरूच ठेवले. मात्र, त्याचवेळी महागाई आणि तुर्की लिराच्या घसरणीकडे लक्ष दिले नाही.

कोणाचेच ऐकलं नाही

एर्दोआन दीर्घकाळापासून यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, तुर्कीचा महागाई दर वाढत असताना त्यांनी व्याजदरात कपात करणे सुरूच ठेवले. देशाच्या राष्ट्रीय बँकेने महागाई नियंत्रणात आणावी अशी सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि इतरांची अपेक्षा असते. मात्र, तुर्कीचे केंद्रीय बँकर्स आणि अर्थमंत्री एर्दोआन यांच्या मर्जीविरोधात काहीही करू शकत नाहीत.

अमेरिका, ब्रिटन यांनी रसद पाठवूनही 1971 मध्ये भारताने पाकिस्तानला कसं नमवलं?

आज क्या हो गया है हाल

आज तुर्की लिरा 15 डॉलरपेक्षा जास्त झाला आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 7 डॉलर होता. तरुणांची बेरोजगारी 25 टक्क्यांवर पोहोचली आहे. एर्दोगन यांची लोकप्रियताही कमी होत आहे. उच्च व्याजदर हे महागाईचे कारण असल्याचे एर्दोआन ठामपणे सांगतात. कमी व्याजदराने जास्त पैसे येतील, लोक जास्त पैसे घेतील आणि खर्च करतील. त्यामुळे निर्यात वाढेल आणि परदेशी ग्राहक अधिक येतील. मात्र, यामुळे वाहन, औषधे, इंधन आदींच्या आयातीवर विपरीत परिणाम होत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. महागाई वाढली असून गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होत आहे.

First published:

Tags: Inflation, Turkey, Turky