तिरुवनंतपुरम, 27 जुलै : भारतात सध्या कोरोनाची दहशत थोडी कमी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जगात कोविड-19 च्या विषाणूनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. कोरोनाच्या केसेस चीनमध्ये सर्वांत आधी आढळल्यानंतर काही देशांमध्ये कोरोना पसरला. भारतातही कोविडच्या केसेस आढळायला सुरुवात झाली. सर्वांत पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण केरळ राज्यात आढळला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळले. कोरोनानंतर आलेल्या मंकीपॉक्सचाही पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला. बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शन्सचे देशातले पहिले रुग्ण सर्वांत आधी केरळमध्येच (Kerala Often Reports First Infections) आढळतात, ही गोष्ट या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेलं केरळ हे अप्रतिम राज्य आहे. इथल्या निसर्गासोबतच इथल्या सुशिक्षित नागरिकांमुळे केरळ कायम चर्चेत राहिलं आहे; मात्र हे सोडल्यास केरळ सध्या ओळखलं जातं, ते कोणत्याही व्हायरल आजाराचा पहिला रुग्ण सापडणारं राज्य म्हणून. त्यामागे कारणही तसंच आहे. चिकनगुनिया, जापनीज एनसेफ्लायटिस, एक्युट एनसेफ्लायटिस सिंड्रोम, वेस्ट नाइल एनसेफ्लायटिस, तसंच डेंग्यू, व्हायरल हिपेटायटीस, निपाह, स्वाइन फ्ल्यू या आजारांचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महाभयंकर कोरोनाचाही पहिला रुग्ण केरळमध्येच सापडला आणि आता नव्यानं आलेल्या मंकीपॉक्सचाही पहिला रुग्ण इथेच सापडला. मंकीपॉक्सच्या (Monkeypox) चारपैकी पहिले तीन रुग्ण केरळमध्ये सापडले. पहिला रुग्ण कोळ्ळम जिल्ह्यात, त्यानंतरचे कन्नूर आणि मलप्पुरम जिल्ह्यात सापडले. हे वाचा - तुम्हाला मंकीपॉक्स आहे की नाही फक्त 50 मिनिटांत समजणार; मेड इन इंडिया Monkeypox Test Kit लाँच केरळमध्ये सर्वांत आधी रुग्ण आढळण्याबाबत तज्ज्ञांनी सांगितलेली कारणं विचार करण्यासारखी आहेत. सतर्क यंत्रणा तज्ज्ञांच्या मते , या राज्यांमधल्या विशेषतः केरळमधल्या सर्व्हिलन्स यंत्रणा त्यासाठी कारणीभूत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) माजी सदस्य डॉ. ए. पी. सुगुनन यांच्या म्हणण्यानुसार, एक तर राज्यात इन्फेक्शन वेगानं पसरतं आहे किंवा सर्व्हेलन्स यंत्रणा (Surveillance System) अधिक सतर्क आहेत. त्यामुळेच इतक्या केसेस आढळत आहेत. जबाबदार नागरिक नागरिकांच्या सहभागावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात, असं पब्लिक पॉलिसी अँड हेल्थ सिस्टिम्समधले साथरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लाहरिया यांनी सांगितलं. कोळ्ळम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, तेव्हा तो रुग्ण यूएईवरून आला होता. त्याच्या तिथल्या संपर्कातल्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याचं कळताच त्यानं लगेच स्वतःची चाचणी केली. त्या वेळी त्याला कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. राज्यातील बहुतेक लोक परदेशात भारताच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के लोकसंख्या केरळमध्ये आहे; मात्र तिथून परदेशात गेलेले नागरिक बहुसंख्य आहेत. उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्तानं अनेक केरळी नागरिक जगभरात विखुरले गेलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हेही रुग्ण पहिल्यांदा आढळण्यामागचं एक कारण असू शकतं. केरळनंतर महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण केरळव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यांत रुग्ण आढळण्याचं प्रमाण जास्त असतं. दोन्ही तज्ज्ञांच्या नते, त्याचंही कारण या दोन राज्यांत परदेशांतून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असणं, हे असू शकतं. महाराष्ट्रात आजच्या (26 July) तारखेपर्यंत एकूण 80,35,046 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 67,10,792 रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये 19,48,955 इतके रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे 1,48,068 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या खालोखाल केरळमध्ये 70,393 मृत्यू झाले आहेत. हे वाचा - हृदयद्रावक! एकाच वेळी जन्मलेल्या पाचही बाळांचा मृत्यू; लग्नाच्या 7 वर्षांनंतर आई बनूनही रिकामीच राहिली कुस केरळमध्ये साथरोगाचे पहिले रुग्ण सापडण्यामागची ही काही कारणं असू शकतात; मात्र नेमकं एकच कारण सांगता येणार नाही; मात्र राज्याबद्दल चुकीचे काही ग्रह करून घेऊ नयेत, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.