जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तुम्हाला मंकीपॉक्स आहे की नाही फक्त 50 मिनिटांत समजणार; मेड इन इंडिया Monkeypox Test Kit लाँच

तुम्हाला मंकीपॉक्स आहे की नाही फक्त 50 मिनिटांत समजणार; मेड इन इंडिया Monkeypox Test Kit लाँच

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एका भारतीय कंपनीने मंकीपॉक्सच्या टेस्टचा 50 मिनिटांत रिझल्ट देणारी आरटी-पीसीआर टेस्ट किट तयार केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 26 जुलै : जगभरात कोरोनासोबत आता मंकीपॉक्स थैमान घालतो आहेत. भारतातही मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात आतापर्यंत 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सचा उद्रेक होऊ नये म्हणून भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्याच आहेत पण आता एका भारतीय कंपनीने मंकीपॉक्सचं लवकरात लवकर निदान करणारी टेस्ट किटही तयार केली आहे. हरयाणातील Genes2Me या डायग्नोस्टिक कंपनीने मंकीपॉक्ससाठी एक आरटी-पीसीआर टेस्ट तयार केली आहे. ही पीओएक्स-क्यू मल्टीप्लेक्स (POX-Q Multiplexed) टेस्ट किट अवघ्या 50 मिनिटांत रिझल्ट देते, असा दावा कंपनीने केला आहे. झी न्यूज हिंदी च्या रिपोर्टनुसार कंपनीचे सीईओ आणि संस्थापक नीरज गुप्ता यांनी सांगितलं की, वेळेचं महत्त्व लक्षात घेता आम्ही मंकीपॉक्ससाठी ही आरटी-पीसीआर लाँच केली आहे. जी 50 मिनिटांत अचूक रिझल्ट देईल. सध्या कंपनीची आठवडाभरात 50 लाख टेस्ट किट बनवण्याची क्षमता आहे. मागणी वाढली तर एका दिवसात 20 लाख किट बनवू शकतो. हे वाचा -  Monkeypox vaccine : कोरोनानंतर जगात दहशत पसरवणाऱ्या मंकीपॉक्सवरही लस मिळाली? ही टेस्ट किट सामान्यपणे उपलब्ध असलेल्या आरटी-पीसीआर उपकरणांसह जेनेस2मी रॅपी-क्यू एचटी रॅपिड आरटी-पीसीआर डिव्हाइसवर प्वाइंट-ऑफ-केयर म्हणूनही उपलब्ध आहे. प्वाइंट-ऑफ-केयरचा उपयोग हॉस्पिटल, एअरपोर्ट, आरोग्य शिबीर अशा ठिकाणी स्क्रिनिंगसाठी वापरता येऊ शकतं, असंही कंपनीने सांगितलं आहे. मंकीपॉक्सची लक्षणं मंकीपॉक्सची लागण झाल्यास  ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा अशी लक्षणं दिसतात. त्यानंतर शरीरावर पुरळ येतो. हा आजार वेगाने पसरत असल्याने डब्ल्यूएचओने याला वर्ल्ड पब्लिक हेल्थ एमर्जन्सी घोषित केलं आहे. संपूर्ण जगाला अलर्ट करत, याला नियंत्रित करण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. हे वाचा -  मंकीपॉक्सपासून बचावासाठी इम्युनिटी हवी चांगली; आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 75 देशांत मंकीपॉक्सच्या 16000 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी तीन केरळमध्ये तर एक दिल्लीत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात