मराठी बातम्या /बातम्या /explainer /प्रसिद्ध मंदिराचं निर्माण करणारे महान चोल राजे हिंदू नव्हते का? त्यांच्या धार्मिक अस्मितेवरून का होतोय वाद?

प्रसिद्ध मंदिराचं निर्माण करणारे महान चोल राजे हिंदू नव्हते का? त्यांच्या धार्मिक अस्मितेवरून का होतोय वाद?

तामिळ चित्रपट निर्माते वेत्रीमारन यांनी राजा राज चोल हा हिंदू राजा नसल्याचा दावा करून वाद निर्माण केला होता.

तामिळ चित्रपट निर्माते वेत्रीमारन यांनी राजा राज चोल हा हिंदू राजा नसल्याचा दावा करून वाद निर्माण केला होता.

तामिळ चित्रपट निर्माते वेत्रीमारन यांनी राजा राज चोल हा हिंदू राजा नसल्याचा दावा करून वाद निर्माण केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

चेन्नई, 9 ऑक्टोबर : तमिळनाडूतील तंजावर येथील बृहदीश्‍वर मंदिराच्या निर्माणासह अनेक वास्तू उभारणारे महान चोल राजे धार्मिक कारणावरुन वादात आले आहेत. या मंदिरात दरवर्षी लाखो भाविक येतात. राजा राज प्रथम याने बृहदेश्वर मंदिर 1003 ते 1010 ईसवीच्या दरम्यान बांधले. हे मंदिर त्यांच्या राज्याच्या विस्तारामागील प्रेरक शक्ती असल्याचे सांगितले जाते.

चोल राजवंशाचे जीवन आणि जीवनपद्धती नेहमीच लोकांना भुरळ घालते. कल्की कृष्णमूर्ती यांच्या तमिळमधील कादंबरीवर आधारित पोन्नियिन सेल्वन (पोन्नीचा मुलगा) यांनी अरुलमोझिवर्मनची चित्रित केलेली कथा अजूनही लोकांच्या मनात कोरलेली आहे. अरुलमोझिवर्मन नंतर राजा राज चोल म्हणून ओळखले जाऊ लागले.

वाद काय आहे?

अलीकडेच तमिळ चित्रपट निर्माते वेत्रीमारन यांनी राजा राज चोल हे हिंदू राजा नसल्याचा दावा करून वाद निर्माण केला होता. त्यांना अभिनेते आणि मक्कल निधी मैयामचे संस्थापक कमल हसन आणि काँग्रेस खासदार एस जोथिमनी यांचा पाठिंबा मिळाला. मणिरत्नम यांचा 'पोनियिन सेल्वन' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे हे वक्तव्य आले आहे. हा चित्रपट लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे.

वादावर विविध लोकांची विधाने

राजा यांना गैर-हिंदू म्हणून चित्रित करण्याच्या प्रयत्नावर आश्चर्य व्यक्त करताना, तेलंगणा आणि पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन म्हणाले की तामिळनाडूमध्ये हिंदू सांस्कृतिक ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सुंदरराजन हे तामिळनाडूचे आहेत.

त्याच वेळी, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय सचिव एच राजा, राजा राज चोलन हे भगवान शिवाचे निष्ठावान भक्त असल्याचा दावा करत वेत्रीमारन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी प्रश्न केला, की “बृहदीश्वर मंदिराच्या उभारणीचे श्रेय त्यांना दिले जाते. राजा चोल यांनी चर्च किंवा मशिदी बांधल्या आहेत का? त्यामुळे त्यांना गैरहिंदू म्हणताय?

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, तिरुवल्लुवर आणि राजा राज चोलन या तमिळ विद्वानांचे भगवेकरण करण्याचे सतत प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे म्हणणे फेटाळून लावत भाजप नेते एच राजा यांनी दिग्दर्शकाला राजा राज चोलन यांनी बांधलेल्या किमान दोन चर्च किंवा मशिदी दाखवण्याचे आव्हान दिले.

वाचा - मोहन भागवतांच्या वक्तव्यविरोधात पुण्याच्या ब्राह्मण महासंघाचा संताप, थेट RSS कार्यालयात पोहोचले

 अभिनेता कमल हसन वादात

अभिनेता कमल हसन यांनी चित्रपटातील कलाकार आणि प्रॉडक्शन टीमसोबत चित्रपट पाहिला. हसन म्हणाले की, या चोल राजाच्या काळात हिंदू धर्म असा कोणताही शब्द नव्हता. त्यांनी दावा केला, “तिथे वैष्णव, शैव आणि श्रमण परंपरा होती. इंग्रजांनी हिंदू हा शब्द तयार केला.

एएसआयच्या माजी अधिकाऱ्याचे काय म्हणणे आहे?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे माजी एपिग्राफी संचालक पी वेंकटेशन म्हणाले, “राजा राज चोलन हे सुद्धा अधिक वैश्विक आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भगवान शिव, गणेश आणि विष्णूची मंदिरे बांधली होती. पण, जैन किंवा बौद्ध मंदिरे बांधू इच्छिणाऱ्यांना उदारपणे निधी देखील दिला होता.

वैष्णव आणि शैव हे दोन्ही धर्म हिंदू धर्माच्या शाखा मानल्या जातात. वास्तविक, या राजाने बृहदेश्वर मंदिरातील एका गोपुरमचे नाव 'दक्षिणा मेरू' ठेवले. व्यंकटेशन यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले की, 'राजा राज चोलन यांनी श्रीलंका आणि अनेक आशियाई देशांमध्ये मंदिरे बांधली होती. ते विष्णूचे अवतार होते असे ताम्रपटावर लिहिलेले आहे." ते म्हणाले की तो असा राजा होता ज्याने कोणत्याही धर्माला विरोध केला नाही आणि प्रजेला समान मानले. ते म्हणाले की अनेक शिलालेख त्यांचे अनुदान किंवा देणगी याचीच साक्ष देतात.

First published:
top videos

    Tags: Hindu, Tamilnadu