Home /News /explainer /

ED Raid | कशी टाकतात रेड? वेगवेगळ्या एजन्सीच्या प्रक्रियेत काय फरक आहे?

ED Raid | कशी टाकतात रेड? वेगवेगळ्या एजन्सीच्या प्रक्रियेत काय फरक आहे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

    मुंबई, 23 मार्च : गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग (Income Tax) आणि सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीच्या छाप्यांची देशभर चर्चा सुरू आहे. देशातील अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या विभागांकडून छापेमारी सुरू आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) अनेक मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा (ed) ससेमिरा लागला आहे. अशातच आता ईडीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अशा स्थितीत या एजन्सी छापे कसे टाकतातच? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या तीन मोठ्या एजन्सींचे काम वेगवेगळे असू शकते, पण सर्च, छापा आणि सर्वेक्षणाची पद्धत जवळपास सारखीच आहे. तीनही मोठ्या एजन्सी एकाच प्रक्रियेनुसार सर्वेक्षण, सर्च आणि छापे टाकतात. एजन्सीच्या अधिकार्‍यांचे वर्तन संबंधित घरी किंवा ठिकाणी सारखेच असते. दरम्यान, अनेकदा एखाद्या घरी किंवा कार्यालयात छापा मारल्यानंतर बेड, उशा, गाद्या किंवा सामान अस्ताव्यस्त पडलेले तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल. याबद्दल विचारले असता एजन्सी सूत्रांनी याची पुष्टी केली नाही. पण, रेड, सर्च आणि सर्व्हेक्षणात काय फरक आहे. ICICI Bank ने वाढवले FD व्याजदर, नवे दर आजपासून लागू छापा किंवा रेड यासाठी न्यायालय किंवा अधिकृत प्राधिकरण प्रथम सर्च वॉरंट जारी करते. वॉरंट जारी झाल्यानंतरच छापा म्हणडे रेड टाकता येते. हे कधीही होऊ शकते. छापा म्हणजे अधिकृत अधिकार्‍यांनी कोणत्याही इमारतीवर किंवा जागेवर केलेली व्यापक शोध मोहीम. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही अघोषित मालमत्तेवर विश्वास ठेवण्यासाठी किंवा गुन्ह्याबद्दल संशयास्पद असल्याचे कोणतेही सबळ पुरावे असतील. शोध/सर्च संबंधित अधिकृत अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली कोणत्याही इमारतीत किंवा ठिकाणी सर्च करता येते. फक्त ती जागा त्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत असावी. आयजी स्तरावरील वरिष्ठ अधिकारी सर्च मोहीम राबवू शकतात. हे सूर्योदयानंतर कोणत्याही दिवशी होऊ शकते आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहू शकते. सर्च दरम्यान, संपूर्ण जागा शोधली जाऊ शकते, अघोषित मालमत्ता शोधण्यासाठी कुलूप उघडले जाऊ शकतात. संबंधित अधिकाऱ्यालाही जप्तीचे अधिकार आहेत. या कामात पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेता येते. BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, सेनेच्या शिलेदारांना बोलावले स्नेहभोजनाला! सर्वेक्षण या अंतर्गत व्यवसाय किंवा व्यवसायाच्या ठिकाणीच कारवाई करता येते. संबंधित कागदपत्रे निवासी ठिकाणी ठेवल्याशिवाय निवासी ठिकाणी सर्वेक्षण प्रक्रिया करता येत नाही. सर्वेक्षण केवळ व्यवसायाच्या दिवसांमध्ये व्यवसायाच्या वेळेत केले जाऊ शकते. सर्वेक्षण पूर्ण झाले नाही तर कामकाजाच्या वेळेनंतरही ते सुरू राहू शकते. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला कोणतीही वस्तू जप्त करण्याचा अधिकार नाही. या कामासाठी पोलिसांची मदत घेता येत नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Raid, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या