नवी दिल्ली, 23 जुलै : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू झाले आहे. या काळात अनेक विधेयके मांडली जाणार आहेत. यापैकी एक चर्चेत असलेले विधेयक म्हणजे लोकसंख्या नियंत्रण बिल (Population Control Bill). भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी या विधेयकाबाबत मत व्यक्त केल्यापासून ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. खरे तर पावसाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना रवी किशन म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणावरील विधेयक खाजगी सदस्य मांडणार आहोत. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले. पण, रवि किशन यांच्यावर ट्रोलर्स का तुटून पडले? काय आहे लोकसंख्या नियंत्रण विधेयक?
रवि किशन ट्रोल्सच्या निशाण्यावर का आले?
पत्रकारांशी बोलताना रवी किशन म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा असेल तेव्हाच आपण विश्व गुरू होऊ शकतो. लोकसंख्या नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर लोकांनी विविध कमेंट्स करत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. याचे कारण म्हणजे रवी किशन हे स्वतः चार मुलांचे वडील आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. याच कारणामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.
उपराष्ट्रपती पदाला कमी समजू नका! घटनेतील ह्या तरतुदी देतात शक्तीशाली अधिकार
काय आहे लोकसंख्या नियंत्रण विधेयक Population Control Bill
प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार कोणतेही जोडपे दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ शकत नाही. जर एखाद्या जोडप्याला दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना सरकारी नोकऱ्या, सरकारी योजना आणि सरकारी सवलती इत्यादींचा लाभ दिला जाणार नाही. हे देखील जाणून घेण्यासारखे आहे की दोन अपत्य धोरण संसदेत 35 वेळा मांडले गेले आहे. पण त्याला कधीच हिरवा सिग्नल मिळू शकलेला नाही.
संविधान काय म्हणते
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने मांडलेल्या सामाजिक प्रगती आणि विकासावरील 1969 च्या ठरावाच्या अनुच्छेद 22 मध्ये म्हटले आहे की कोणत्याही जोडप्याला त्यांना किती मुले होतील हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच, मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवल्याने कलम 16 यांसारख्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होते, म्हणजे सार्वजनिक रोजगारात सहभाग आणि कलम 21 म्हणजे जीवन आणि स्वातंत्र्याचे संरक्षण.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Population, Ravi Kishan