मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Birthday Ramanujan : कुलदेवी स्वप्नात येऊन गणित सोडवते, असे रामानुजन म्हणायचे, काय आहे यामागचं कारण?

Birthday Ramanujan : कुलदेवी स्वप्नात येऊन गणित सोडवते, असे रामानुजन म्हणायचे, काय आहे यामागचं कारण?

Birthday Math's Genius Srinivas Ramanujan : श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan), ज्यांना गणितातील (Maths) प्रतिभाशाली व्यक्ती मानले जाते, त्यांनी लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गणिताची अनेक सूत्रे रचली. ते स्वतः सांगत असत की अनेकवेळा जेव्हा ते एखाद्या कठीण प्रमेयात किंवा प्रश्नात अडकत असत आणि त्यावर उपाय मिळत नव्हता तेव्हा रात्री देवी (Goddess Namagiri) येऊन ते सोडवायची.

Birthday Math's Genius Srinivas Ramanujan : श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan), ज्यांना गणितातील (Maths) प्रतिभाशाली व्यक्ती मानले जाते, त्यांनी लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गणिताची अनेक सूत्रे रचली. ते स्वतः सांगत असत की अनेकवेळा जेव्हा ते एखाद्या कठीण प्रमेयात किंवा प्रश्नात अडकत असत आणि त्यावर उपाय मिळत नव्हता तेव्हा रात्री देवी (Goddess Namagiri) येऊन ते सोडवायची.

Birthday Math's Genius Srinivas Ramanujan : श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan), ज्यांना गणितातील (Maths) प्रतिभाशाली व्यक्ती मानले जाते, त्यांनी लहानपणापासूनच विलक्षण प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गणिताची अनेक सूत्रे रचली. ते स्वतः सांगत असत की अनेकवेळा जेव्हा ते एखाद्या कठीण प्रमेयात किंवा प्रश्नात अडकत असत आणि त्यावर उपाय मिळत नव्हता तेव्हा रात्री देवी (Goddess Namagiri) येऊन ते सोडवायची.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 डिसेंबर : आजच्याच दिवशी 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूच्या (Tamil Nadu) इरोड येथे एका व्यक्तीचा जन्म झाला, ज्यांची गणितातील प्रतिभा संपूर्ण जगाने ओळख मान्य केली. त्यांचं नाव म्हणजे श्रीनिवास रामानुजन. लहान वयातच त्यांनी असंख्या प्रमेये रचली असतील. गणितात नवीन सूत्रे दिली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एखादं गणित किंवा प्रमेयात ते इतके हरवून जायचे की तहानभूकही विसरत होते. कधी उत्तरं मिळायची तर कधी नाही. अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वप्नात मिळत, असे सांगितले जाते. रामानुजन स्वतः लोकांना सांगत असत की स्वप्नात देवी नामगिरी येऊन त्यांना गणित सोडवण्यासाठी मदत करते. देवी नामगिरी ही त्यांची कुलदैवत होती. ज्यावर त्यांच्या कुटुंबाचा अनेक पिढ्यांपासून विश्वास होता. गणितात ते 100 पेक्षा जास्त मार्गांनी कोणताही प्रश्न सोडवू शकत होते. रामानुजन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांचे वडील कपड्याच्या दुकानात काम करत होते. त्यांची आस्तिक आई देवळात भजने म्हणायची. देवळात मिळणाऱ्या प्रसादाने एक वेळ घरी जेवण मिळायचे, पण दुसऱ्या वेळी वडिलांच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. कधी-कधी असं होतं की रामानुजनच्या कुटुंबाला एकाच वेळच्या जेवणावर भागवावं लागत असे. मोठ्या वर्गाचे प्रश्न सोडवायला सुरुवात लहानपणापासूनच रामानुजन यांनी गणितात आपली विलक्षण प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या आईवडिलांकडे जास्त प्रती (कागद) विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे, रामानुजन पहिल्यांदा पाटीवर गणिताचे प्रश्न सोडवायचे आणि नंतर थेट कॉपीवर अंतिम उत्तर लिहायचे जेणेकरून कॉपी लवकर भरू नये. काही दिवसातच त्यांच्या वर्गाची पुस्तके वाचून त्यांनी मोठ्या वर्गातील मुलांचे प्रश्नही सोडवायला सुरुवात केली. त्यांच्या वरच्या वर्गातील मुलेही गणितात मदतीसाठी रामानुजन यांच्याकडे येऊ लागली. रामानुजन यांना यामुळे अधिक अभ्यास करण्याची संधी मिळू लागली. गणितात पूर्ण गुण पण इतर विषयातही नापास या लहान मुलाची प्रतिभा पाहून त्यांच्या एका ब्रिटीश शिक्षकाने एकदा टिपणी केली, की माझ्याकडे असे कोणतेही ज्ञान शिल्लक नाही जे मी या मुलाला देऊ शकेन. जर मला 100 पैकी 101 किंवा 1000 देण्याची परवानगी असती तर मी रामानुजन यांना ते मार्क देऊ इच्छितो. कालांतराने रामानुजन यांचे मन गणितातच मग्न होऊ लागले. इयत्ता 11वी मध्ये त्यांना गणितात पूर्ण गुण मिळाले पण इतर सर्व विषयात ते नापास झाले. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली शिष्यवृत्तीही गमवावी लागली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न यामुळे रामानुजन इतके अस्वस्थ झाले की त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. वाचल्यानंतर ते कसेतरी सर्व विषयांचा अभ्यास करून बारावी उत्तीर्ण झाले आणि लिपिक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करू लागले. मात्र, त्यांच्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे गणित. गणिताचे अवघड प्रश्न सोडवणे. देवळांऐवजी शाळेत जायला सांगणारे बाबा! काय होतं जगण्याचं सोपं गणित? कारकून म्हणून काम करायचे आणि प्रमेये सोडवायचे बंदरावर लिपिक म्हणून काम करताना उर्वरित वेळेत ते गणितातील अत्यंत कठीण प्रमेये सोडवत असत. यासोबत ते आणखी एक काम करायचे ते म्हणजे ब्रिटिश गणितज्ञ जीएच हार्डी यांना पत्रे लिहिणे. त्यावेळी हार्डी यांची गणितातील प्रतिभावंत म्हणून जगभरात ओळख होती. रामानुजन यांना त्यांच्यासोबत राहून गणितावर काम करायचे होते. इंग्लंडमध्ये बसलेल्या हार्डीने सुरुवातीला एका भारतीय कारकुनाची पत्रे गंमतीने घेतली, पण नंतर लक्षात आले की ही पत्र काही सामान्य माणसाची नव्हती. त्यांनी रामानुजन यांना केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि त्यांना सातासमुद्रापार येण्याचे आमंत्रण पाठवले. इंग्लंडमध्ये नवीन जीवन सुरू रामानुजन यांनी इंग्लंडमध्ये नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये त्यांना कोणतीही चिंता न करता रात्रंदिवस गणिताचा अभ्यास करण्याची परवानगी देण्यात आली. रामानुजन यांनी येथील विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिकत असताना 20 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. येथेच त्यांनी विज्ञान विषयात पदवी मिळवली आणि लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्वही मिळवले, हा त्याकाळी भारतीयांसाठी अत्यंत कठीण सन्मान समजला जात होता. रामानुजन हे सर्वात कमी वयात सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय होते. पुढे त्यांना ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिपही मिळू लागली. इंग्लंडचे थंड हवामान मानवले नाही एकीकडे रामानुजन यशाची शिखरे चढत होते तर दुसरीकडे त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत होती. इंग्लंडचे थंड हवामान उष्ण ठिकाणच्या रामानुजन यांना मानवले नाही. अभ्यासादरम्यान त्यांना थंड हवामान आणि अशक्त अन्नामुळे टीबी झाला. आता त्यांची सूत्रे घेऊन वैज्ञानिक शोध लावले जात आहेत सततच्या आजारपणामुळे त्यांना देशात परतावे लागले आणि 26 एप्रिल 1920 रोजी रामानुजन यांनी जगाचा निरोप घेतला. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात रामानुजन यांनी जगाला अशी सूत्रे दिली आहेत, ज्यांच्या मदतीने वैज्ञानिक शोध सातत्याने लावले जात आहेत. ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीतील त्यांची एक जुनी नोटबुक आजही जगभरातील गणितज्ञांसाठी एक गूढ आहे, ज्याची अनेक प्रमेये अद्याप उलगडलेली नाहीत. Sanjay Gandhi Birthday: आणीबाणीच्या काळात संजय गांधी वादग्रस्त का ठरले? उनका घर माना जाता है गणितज्ञों का तीर्थ आस्तिक रामानुजन म्हणायचे की गणिताचा अवघड प्रश्न सोडवताना रात्री कुलदेवी स्वप्नात येते आणि उत्तर सांगते. असे नाही की तो विनोद म्हणून असे म्हणत असे. एकदा ते एका मुलाखतीत म्हणाले होते, 'माझ्यासाठी त्या गणिताला काही अर्थ नाही, जे मला अध्यात्मिक आराम देत नाहीत.' एकेकाळी वाचण्यासाठी कॉपी-पुस्तकांच्या टंचाईशी झगडणारे आणि अन्नासाठी मंदिराच्या प्रसादावर अवलंबून असलेले रामानुजन यांचे घर आता एक संग्रहालय बनले आहे. जगभरातील गणितज्ञांसाठी हे तीर्थक्षेत्र आहे. 22 डिसेंबर 2012 रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Manmohan singh, Maths

    पुढील बातम्या