मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Indo-Pak War 1971: 'बोगराच्या लढाईत' जेव्हा पाक ब्रिगेडियरला लोकांनी रस्त्यावर पळूपळू मारलं..

Indo-Pak War 1971: 'बोगराच्या लढाईत' जेव्हा पाक ब्रिगेडियरला लोकांनी रस्त्यावर पळूपळू मारलं..

vijay diwas 50th anniversary: 'बोगराची लढाई' (Battle of Bogura) ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील सर्वात क्रूर युद्धांपैकी एक आहे. बोगरा ताब्यात घेतल्याशिवाय बांगलादेश मुक्ती युद्ध जिंकणे शक्य नव्हते. या युद्धाचा शेवट पाकिस्तानी ब्रिगेडियरला जनतेने रस्त्यावर पळूपळू मारहाणीने झाला.

vijay diwas 50th anniversary: 'बोगराची लढाई' (Battle of Bogura) ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील सर्वात क्रूर युद्धांपैकी एक आहे. बोगरा ताब्यात घेतल्याशिवाय बांगलादेश मुक्ती युद्ध जिंकणे शक्य नव्हते. या युद्धाचा शेवट पाकिस्तानी ब्रिगेडियरला जनतेने रस्त्यावर पळूपळू मारहाणीने झाला.

vijay diwas 50th anniversary: 'बोगराची लढाई' (Battle of Bogura) ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील सर्वात क्रूर युद्धांपैकी एक आहे. बोगरा ताब्यात घेतल्याशिवाय बांगलादेश मुक्ती युद्ध जिंकणे शक्य नव्हते. या युद्धाचा शेवट पाकिस्तानी ब्रिगेडियरला जनतेने रस्त्यावर पळूपळू मारहाणीने झाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 15 डिसेंबर : 16 डिसेंबर 1971 च्या ऐतिहासिक विजयाचा (Vijay Diwas 2021) आनंद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात उत्साह भरतो. या दिवशी भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला हतबल केलं होतं. या दिवसाला 50 वर्ष (vijay diwas 50th anniversary) पूर्ण होत असल्याने यंदा वेगळं महत्व देखील आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील (Indo-Pakistan War 1971) 'बोगराच्या लढाई'चे (Battle of Bogura) महत्त्व अनेक अर्थांनी पूर्णपणे वेगळे आहे. वास्तविक, बोगराची लढाई ही एकमेव अशी लढाई होती, जी 1971 च्या युद्धापूर्वी सुरू झाली आणि युद्ध संपल्यानंतरच संपली. 23 नोव्हेंबर 1971 रोजी सुरू झालेली बोगराची लढाई 18 डिसेंबर 1971 रोजी अंतिम शरणागतीने संपली. याशिवाय, 1971 च्या भारत-पाक युद्धातील बोगराची लढाई ही एकमेव लढाई होती, जी निवासी भागात लढली गेली होती.

बोगराच्या लढाईचा संदर्भ देत लेफ्टनंट जनरल जेबीएस यादव यांनी त्यांच्या एका लेखात लिहिले की, 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या इतिहासात बोगराची लढाई अद्वितीय होती. निवासी भागात लढलेली ही बहुधा एकमेव लढाई असावी. या लढाईत शत्रूकडून  क्रूरतेचा कळस गाठलेला दिसून आला. ही लढाई प्रत्येक इंच जमिनीसाठी लढली गेली. बोगरा ताब्यात घेणे हा भारतीय सैन्यासाठी एक ऐतिहासिक विजय होता, ज्यामध्ये 5/11 गोरखा रायफल्सच्या प्रत्येक सैनिकाने शत्रूविरूद्ध महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पूर्व पाकिस्तानसाठी बोगरा शहर अत्यंत महत्वाचे होते

बांगलादेश मुक्तिसंग्राम यशस्वी करण्यात बोगराच्या लढाईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वास्तविक, पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) मधील बोगरा शहर हे पाकिस्तानी लष्कराच्या 16 इन्फंट्री डिव्हिजन आणि 205 इन्फंट्री ब्रिगेडचे धोरणात्मक मुख्यालय होते. पाकिस्तानने या शहराला एक मोठं लॉजिस्‍टिक बेस म्हणून विकसित केलं होतं. याशिवाय उत्तर-पश्चिम भागात असलेले हे बोगरा शहर पाक लष्कराचे महत्त्वाचे दळणवळण केंद्र तर होतेच, पण ढाकाला रेल्वे, रस्ते आणि ऑपरेशन एअर स्ट्रिपद्वारे पूर्व पाकिस्तानच्या इतर भागांशी जोडले होते.

बोगराचे सामरिक महत्त्व पाहता भारतीय लष्कराने हे शहर ताब्यात घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. हे शहर ताब्यात घेतल्याने पाक सैन्याचा पूर्व पाकिस्तानच्या उर्वरित भागांशी असलेला संपर्क संपवता करता आला असता. तसेच पाक सैन्याला मिळणारी सामरिक मदत, रसद आणि लष्करी मदत यावर अंकुश ठेवता येणार होतं. मेजर जनरल लक्ष्मण सिंग यांच्या नेतृत्वाखाली 20 माउंटन डिव्हिजनला बोगरा ताब्यात घेण्याची जबाबदारी मिळाली. त्याचवेळी या लढ्याचे नेतृत्व पाकिस्तानकडून ब्रिगेडियर तजम्मुल हुसैन मलिक यांच्याकडे देण्यात आले होते.

Indo-Pak War 1971: पुण्यात जन्मलेल्या 21 वर्षीय जवानाने जर कंमांडरचा आदेश पाळला असता तर..

बोगरा ताब्यात घेतल्यानंतर पाक सैन्याचं आत्मसमर्पण

भारतीय लष्कराच्या 5/11 जीआरने बोगरा काबीज करण्यासाठी दक्षिण आणि आग्नेयेकडून शहरावर हल्ला केला. त्याचवेळी, भारतीय सैन्याच्या 6 गार्ड्स आणि 69 सशस्त्र रेजिमेंटने T-55 रणगाड्यांसह बोगरा शहरावर हल्ला केला. भारतीय लष्कराचा मुकाबला करण्यासाठी, पाकिस्तानने 205 इन्फंट्री ब्रिगेड तैनात केले होते, ज्यात 32 बलुच, 8 बलुच आणि 4 फ्रंटियर फोर्सचा समावेश होता. भारतीय लष्कराचा आक्रमक पवित्रा पाहून पाक लष्कराने बोगरा शहराचे किल्ल्यामध्ये रूपांतर केले आणि सर्वत्र पाकिस्तानी स्नायपिंग आणि एम-24 चाफी रणगाडे तैनात केले.

भारतीय सैन्याच्या शौर्यासमोर शत्रूचा एकही प्रयत्न कामी आला नाही. भारतीय सैन्याने बघता बघता एकामागून एक सर्व परिसर आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इमारती ताब्यात घेतल्या. भारतीय रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या सर्व चौक्यांवर गोळीबार करून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर प्रत्येक आघाडीवर पराभूत झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या आत्मसमर्पणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम 32 बलुच मेजर रझा, मेजर जनरल राव अली आणि 205 इन्फंट्री ब्रिगेडचे सुभेदार सरकार यांनी आत्मसमर्पण केले.

16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत, 54 जूनियर कमीशन अधिकारी, 48 अधिकारी आणि पाकिस्तानी लष्करातील विविध श्रेणीतील 1538 अधिकारी भारतीय लष्कराला शरण आले होते. भारतीय सैन्याने आत्मसमर्पण केलेल्या पाकिस्तानी सैनिकांकडून 79 एलएमजी, 1030 रायफल आणि 238 स्टेन गन जप्त केल्या आहेत. मात्र, बोगरा येथील लढाईचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिगेडियर तजम्मुल हुसैन मलिक यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. त्यानंतर मेजर जनरल नजर हुसैन शाह यांना खास आत्मसमर्पण करण्यासाठी पाठवण्यात आले.

अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला कसं लावलं? काय होती भारताची रणनिती?

मेजर जनरल नजर हुसैन शाह यांनी भारतीय लष्कराच्या मेजर जनरल लक्ष्मण सिंग यांच्या 20 इन्फंट्री डिव्हिजनसमोर पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण 16 इन्फंट्री डिव्हिजनला आत्मसमर्पण केले. त्याचवेळी ब्रिगेडियर तजम्मुल हुसेन मलिक हा नोटोरमधून आपल्या जीपमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, त्याला स्थानिक लोकांनी त्याच्या एस्कॉर्टसह पकडले. स्थानिक लोकांनी धावत जाऊन तजम्मूलला रस्त्यात मारहाण करून त्याचे हातपाय मोडले. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक लोकांनी तजम्मूलला मुक्ती वाहिनीकडे सुपूर्द केले. प्रकृती चिंताजनक झाल्यावर मुक्ती वाहिनीने तजम्मूलला युद्धकैदी म्हणून भारतीय लष्कराच्या स्वाधीन केले.

First published:

Tags: Indian army, War, War hero