मुंबई, 9 डिसेंबर : तुम्हाला कदाचित नाव माहिती नसेल पण हा चेहरा तुम्हा अनेकदा पाहिला असेल. या आहेत म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू की (Aung San Suu Kyi). यांना नुकतीच तिथल्या लष्करी सरकारने चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे त्या जगभरात चर्चेत आल्या आहेत. पण, सू की या केवळ या घटनेमुळेच चर्चेत आहेत असं नाही. त्यांची लोकप्रियता त्यांच्या इतिहासाशी निगडीत आहे. म्यानमारमधील अनेक दशकांच्या लष्करी राजवटीविरुद्ध त्यांनी लोकशाहीसाठी (Democracy) दीर्घकाळ लढा दिला आहे. पण तरीही त्यांच्या जागतिक प्रतिमेत चढ-उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या अटकेची बातमी जगभरातील माध्यमांमध्ये पसरली आहे.
आंग सान सू की कोण आहेत?
76 वर्षीय आंग सान स्यू की या म्यानमारमधील लोकशाही नेत्या आहेत, ज्यांनी तेथे लष्करी राजवटीविरुद्ध अनेक दशके लढा दिला आहे. त्यांचे वडील आंग सॅन यांनी बर्माच्या स्वातंत्र्यासाठी दुसऱ्या महायुद्धात जपानी लोकांशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर 1947 मध्ये ब्रिटनकडून बर्माच्या स्वातंत्र्याची मागणी केली. त्याच वर्षी त्यांची हत्या झाली. सू की यांचे संगोपन त्यांच्या आईने केले. त्यांना बर्मी, इंग्रजी, फ्रेंच आणि जपानी भाषांचे ज्ञान आहे.
या वर्षी पुन्हा तुरुंगात
1991 मध्ये त्यांना त्यांच्या संघर्षासाठी नोबेल शांतता पुरस्कारही मिळाला होता. त्यावेळी त्या नजरकैदेत होत्या. 2015 मध्ये त्यांनी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) चे नेतृत्वात 25 वर्षांत पहिल्यांदाच म्यानमारमध्ये निवडणूक जिंकली. पण 2021 मध्ये लष्कराने त्यांना हटवले. आता त्यांना देशद्रोह आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विजयानंतरही अध्यक्ष होऊ शकल्या नाहीत
म्यानमारच्या बौद्ध बहुसंख्य समुदायांमध्ये त्या खूप लोकप्रिय आहे. सू की यांनी 1989 ते 2010 पर्यंत 15 वर्षे तुरुंगात घालवली आणि लोकशाहीसाठी अत्याचाराविरुद्धचा त्यांचा शांततापूर्ण संघर्ष आंतरराष्ट्रीय उदाहरण बनला. 2015 मध्ये विजयानंतरही म्यानमारच्या संविधानामुळे त्या देशाच्या राष्ट्रपती होऊ शकल्या नाहीत, कारण त्यांच्या मुलांचे नागरिकत्व परदेशी होते.
सत्तेच्या जवळ आणि नंतर लष्कराचा हस्तक्षेप
सू की यांना म्यानमारच्या निर्विवाद सर्वोच्च नेत्या मानले जाते. त्याचे अधिकृत पद राज्य सल्लागाराचे होते आणि अध्यक्ष विन मिंट हे 2021 च्या सत्तापालटापर्यंत त्यांचे जवळचे मित्र होते. 2020 मध्ये त्यांच्या पक्षाने पुन्हा एकदा मोठ्या फरकाने बहुमत मिळवले, जे 2015 च्या मतांपेक्षा जास्त होते. पण बलाढ्य सेनेने निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला. आणि संसदेच्या पहिल्याच दिवशी लष्कराने सू की यांना इतर राजकारण्यांसह तुरुंगात टाकले.
भारताच्या लोकसंख्येला लागणार ब्रेक? जगभरातील लोकसंख्याही कमी होणार
सू की अनेक वर्षे परदेशात राहिल्या
1960 मध्ये सू की त्यांच्या आई डॉ. खिन की यांच्यासोबत भारतात आल्या, त्यांची दिल्लीत म्यानमारचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. चार वर्षांनंतर त्या ऑक्सफर्डमध्ये गेल्या, जिथं त्यांची भेट मायकेल एरिसशी झाली, ज्यांच्याशी त्यांनी नंतर लग्न केलं. यानंतर जपान, भूतानमध्ये काहीकाळ राहून नंतर तिच्या कुटुंबासह यूकेमध्ये राहिल्या. 1988 मध्ये आजारी आईची काळजी घेण्यासाठी त्या यंगूनला परतल्या. जेव्हा म्यानमारमध्ये राजकीय अस्थिरता सुरू होती.
लोकशाहीसाठी नेतृत्व
त्यावर्षी लोकशाहीतील सुधारणांच्या मागणीसाठी हजारो लोकांनी जनरल नी विन यांच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनाचं नेतृत्व स्यू की यांनी केलं. त्यांचं शांततेचे आंदोलन दडपून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. 1990 मध्ये लष्करी सरकारने निवडणुका घेतल्या ज्यात सू की यांच्या पक्षाने विजय मिळवला. मात्र, जुन्या लष्करी राजवटीने त्यांना सत्ता दिली नाही. यानंतर त्यांना अनेकवेळा अटक करून सोडण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्यू की यांच्या प्रतिमेत नेहमीत चढ-उतार झाले आहेत. म्यानमारमधील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या समस्यांकडे त्यांच्या पक्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. 2017 मध्ये जेव्हा लष्करी अत्याचारांमुळे लाखो रोहिंग्या शेजारच्या बांगलादेशात निर्वासित झाले. म्यानमारमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात अजूनही नरसंहाराचा खटला सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.