मराठी बातम्या /बातम्या /explainer /कोणत्या ऋतूमध्ये लघुग्रहाने डायनासोरचा नाश केला? संशोधनात अनेक गोष्टी जगासमोर

कोणत्या ऋतूमध्ये लघुग्रहाने डायनासोरचा नाश केला? संशोधनात अनेक गोष्टी जगासमोर

पृथ्वीवर 6.6 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाविनाशाची (Mass Extinction) सुरुवात लघुग्रहाच्या (Asteroids) टक्करेने झाली होती. त्यामुळे संपूर्ण जगाच्या दोन तृतीयांश प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या. नवीन संशोधनात, ही घटना ज्या वर्षी घडली ती कोणत्या ऋतूत घडली हे निश्चित करण्यात आले आहे.

पृथ्वीवर 6.6 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाविनाशाची (Mass Extinction) सुरुवात लघुग्रहाच्या (Asteroids) टक्करेने झाली होती. त्यामुळे संपूर्ण जगाच्या दोन तृतीयांश प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या. नवीन संशोधनात, ही घटना ज्या वर्षी घडली ती कोणत्या ऋतूत घडली हे निश्चित करण्यात आले आहे.

पृथ्वीवर 6.6 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाविनाशाची (Mass Extinction) सुरुवात लघुग्रहाच्या (Asteroids) टक्करेने झाली होती. त्यामुळे संपूर्ण जगाच्या दोन तृतीयांश प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या. नवीन संशोधनात, ही घटना ज्या वर्षी घडली ती कोणत्या ऋतूत घडली हे निश्चित करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...

,मुंबई, 13 डिसेंबर : पृथ्वीवरील (Earth) जीवनाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही एक रहस्यच आहेत. अशा विषयांवर अजूनही सखोल संशोधन केलं जात आहे. यातील एक म्हणजे पृथ्वीवरून डायनासोर (Dinosaurs) नष्ट होण्याचं कारण काय होतं. यातील सर्वात वैध सिद्धांत असा आहे की क्रेटासियसच्या उत्तरार्धात एक महाकाय लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळला, त्यानंतर मोठी उलथापालथ झाली. वातावरणात बदल झाले, ज्यामध्ये डायनासोर तग धरू शकले नाहीत. परिणामी डायनासोरच्या जवळजवळ सर्व प्रजाती नष्ट झाल्या.

हंगामी वेळेची पुष्टी

अभ्यासात फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमचा समावेश होता. या टीमने त्या वर्षीच्या हंगामी वेळेची पुष्टी केली आहे, ज्यावेळी विनाशकारी Chicxulub लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याने डायनासोर मारले गेलेले . वसंत ऋतूच्या वेळी, म्हणजे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला 16.5 कोटी वर्षांपूर्वी मोठ्या विनाशाच्या घटनांची मालिका सुरू झाली होती.

वेळेचे महत्त्व

सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील विनाशाच्या सुरुवातीच्या टप्प्यांबद्दल माहिती मिळवण्याची क्षमता खूप वाढली आहे. या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रॉबर्ट डी पाल्मा म्हणाले की, जीवांच्या अनेक जैविक कार्यांसाठी वर्षाची वेळ खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

आश्चर्यकारक नाही

डि पाल्मा म्हणाले की, वर्षातील वेळ जीवांचे प्रजनन, आहाराचे धोरण, परजीवींशी संवाद, हंगामानुसार सुप्तता आणि पुनरुत्पादक स्वभाव इत्यादी ठरवते. त्यामुळे, जगावर होणार्‍या प्रतिकूल परिणामांमध्ये जागतिक नुकसानीची वेळ मोठी भूमिका बजावते यात आश्चर्य वाटायला नको.

महाविनाशात डायनासोर संपले! पण मगरी कशी वाचल्या?

अजूनपर्यंत माहित नव्हते

म्हणूनच चिक्सुलबच्या टक्करवरील हवामानाच्या वेळेचा त्या आपत्तीत मोठा वाटा असावा. या प्रश्नाचे उत्तरही आजतागायत मिळू शकले नाही. 6.6 कोटी वर्षांपूर्वी युकाटन द्वीपकल्पात चिक्सुलब लघुग्रहाची टक्कर झाल्याचे अनेक दशकांपासून ज्ञात होते. संपूर्ण जगावर त्याचा जैविक आणि पर्यावरणीय प्रभाव आजही दिसून येतो.

अभ्यास कुठे झाला?

हा अभ्यास 2014 मध्ये सुरू करण्यात आला होता. Chicxulub च्या टक्करवेळी जगाचे हवामान कसे होते हे निर्धारित करण्यासाठी सिग्नलची मालिका एकत्रित करण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर केला. संशोधकांनी उत्तर डकोटा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रेटासियस पॅलेओजीन सीमा कालावधीतील स्थळांचा अभ्यास केला ज्यामुळे विनाशाच्या घटनेचे अंतर्गत कार्य समजले.

नवीन माहिती जगासमोर

या संशोधनातून संशोधकांना नवा पण अत्यंत महत्त्वाचा डेटा मिळाला. सर्व पुराव्यांचा अभ्यास करून ही घटना कोणत्या ऋतूत घडली हे जेव्हा त्यांना कळू शकले तेव्हा त्यांना अजिबात आश्चर्य वाटले नाही. या अभ्यासाने याची देखील कात्री झाली की टक्करेनंतर एक प्रचंड पूर आला ज्यामुळे अनेक प्राणी एकाच वेळी नष्ट झाले.

आज मध्यरात्रीनंतर होणार जेमिनीड उल्कावर्षाव! पृथ्वीला धोका तर नाही?

संशोधकांना स्पष्टपणे आढळून आले की वसंत ऋतूमुळे ही टक्कर दक्षिण गोलार्धापेक्षा उत्तर गोलार्धात अधिक विनाशकारी ठरली. लघुग्रहाची टक्कर हेच मोठ्या विध्वंसाचे मुख्य कारण होते की नाही याचा शोध वैज्ञानिक अजूनही घेत आहेत. काहींचा असा विश्वास आहे की हे सर्व एकाच हंगामात झालेल्या प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे घडले. दोन्ही घटना एकाच वेळी झाल्याचीही शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Earth, Science, अंतराळ