मुंबई, 20 जानेवारी- झी मराठीवरली **(Zee Marathi )**लोकप्रिय हे तर काहीच नाय (He Tar Kahich Nay ) या कॉमे़डी शोने कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मंचावर अनेक दिग्दज कलाकारांनी हजेरी लावत हे तर काहीच नाय म्हणत अनेक किस्से शेअर केले आहेत. आता या मंचावार बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन ( amitabh bachchan) या मंचवार हजेरी लावणार आहेत. अनेकांना विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खऱे काय आणि खोटे काय हे नक्की लक्षात येईल. झी मराठीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की हे तर काहीच नायच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी एंट्री केली आहे. विशेष म्हणजे हे अमिताभ बच्चन नसून त्यांचे डुप्लीकेट म्हणून लोकप्रिय असलेले शशिकांत पेडवाल **( shashikant pedwal )**आहेत. हे फक्त अमिताभ सारखे दिसत नाही तर त्यांच्यासारखा आवाज आणि उंची देखील सारखीच आहे. त्यामुळे अनेकांची पाहता क्षणी फसगत होते. झी मराठीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, बच्चन साहेब लावणार हजेरी आता मजा येणार खरी.
आता अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट म्हणून लोकप्रिय असलेले शशिकांत पेडवाल कोणता किस्सा सांगणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिवाय यावेळी मंचावर देखील आनंदाचे वातावरण दिसत आहे. या भागात सर्वांनीची धमाल केल्याची दिसून येत आहे. वाचा- आणखी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय ‘श्री’, लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला शशिकांत पेडवाल हे मुळचे पुण्याचे आहेत. अनेकदा ते अमिताभ यांची मिमिक्री करताना दिसतात. शशिकांत पेडवाल अनेक कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करताना दिसतात. शशिकांत पेडवाल अमिताभ बच्चन यांचा दीवार सिनेमातील लोकप्रिय डायलॉग ‘मेरे पास मां है’ त्यांच्या सारखाच म्हणताना दिसतात. त्यांनी आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त शो केले आहे. परदेशातही त्यांनी शो केले आहे. अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ते देशासह परदेशात देखील लोकप्रिय आहेत.