Home /News /entertainment /

मोहितला मिळणार डच्चू; स्विटू सर्वांसमोर ओमचं प्रेम मान्य करणार का?

मोहितला मिळणार डच्चू; स्विटू सर्वांसमोर ओमचं प्रेम मान्य करणार का?

मोहितला नाकारून ओम - स्विटू एकमेकांवरचं प्रेम मान्य करणार आहेत. अखेर ओम ने आता प्रेमाची कबूली सगळ्यासमोर दिली आहे.

  मुंबई 20 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)  आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. तर स्विटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) मनातील भावना आता सगळ्यांना समजू लागल्या आहेत. पण तरीही स्विटूच्या आईने म्हणजेच नलूने स्विटूच्या लग्नाचा घाट घालत तिचं लग्न मोहितशी ठरवंल आहे. पण तो पदोपदी साळवी कुटुंबला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. पण अखेर आता ओमने सगळं काही सगळ्यासमोर मान्य केल आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. स्विटू आणि मोहितचा साखरपुड्याचा मुहुर्त आता जवळ येत आहे. तर साळवी कुटुंबात साखरपुड्याची लगबग सुरू आहे. याशिवाय ओमनेही अंबरनाथलाच स्विटूच्या घरी थान मांडलं आहे. व स्विटूचा साखरपुडा होईपर्यत इथून जाणार नाही असं त्याने म्हटलं होतं. तर तो स्विटूच्या साखरपुड्यासाठी मदतही करतही असतो. आता स्विटूचा साखरपुडा पार पडत आहे. पण स्विटूचं सगळं लक्ष हे ओम वरचं असतं. हे पाहून मोहित मात्र फार संतापतो व अवनी माझ्यावर प्रेम नाही असं म्हणतो. व तिच्या मनात आणखी कोणीतरी असल्याचं म्हणतो.
  साखरपुड्यात चाललेला हा सगळा प्रकार पाहून ओम देखिल मोहितवर संतापतो व स्विटू चांगली मैत्रिण असल्याचं सगळ्यांना सांगतो. व याशिवाय त्यांच स्विटूवर प्रेम असल्याचंही तो सगळ्यांसमोर मान्य करतो. त्यामुळे हे सगळं ऐकून उपस्थित मालविकाला मात्र मोठा धक्का बसला आहे. तर इतर सगळेच हे ऐकून थक्क होतात. 'आई माझी काळूबाई' फेम रश्मीचं साडी कलेक्शन; पाहा अभिनेत्रीचा मनमोहक लूक त्यामुळे आता मोहितची पुढची चाल नक्की काय असणार व स्विटू आणि ओमचा सखरपुडा होणार का? याशिवाय मालविका आणि नलू या लग्नाला परवानगी देणार का? हे पाहणं रंजक ठरेल. प्रेक्षक मात्र ओम आणि स्विटूची लव्हस्टोरी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या