मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात होणार 'या' व्यक्तीचा खून, पाहा VIDEO

ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात होणार 'या' व्यक्तीचा खून, पाहा VIDEO

‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) मध्ये आता आणखी एकाचा बळी जाणार.

‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) मध्ये आता आणखी एकाचा बळी जाणार.

‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) मध्ये आता आणखी एकाचा बळी जाणार.

मुंबई, 28 सप्टेंबर ; सध्या सोशल मीडायावर झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) या मालिकेची चर्चा सुरू आहे. आता या मालिकेत एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या कुणी तरी येणार गं...ची चर्चा आहे. या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा ही गरोदर म्हणजे तिला डोहाळे लागले आहेत. रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतं आहे. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ऐन रंगात असताना यांच्यातील एका व्यक्तीचा खून (Horror Thrialler Zee Marathi Serial )  झाल्याचं समोर आले आहे.

रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडले आहे आणि घडत आहे. घरच्या मंडळींशी, कुटुंबाशी कोणाचा काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाहे. आधी अभ्याचा खून झाला त्या धक्क्यातून सावरले न सावरले तोच मॅण्डीचा मृतदेह स्विमींगपूलमध्ये आढळला. आता आणखी एकाचा बळी लवकरच जाणार असल्याचा प्रोमोत समोर आले आहे.

रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण थाटात करण्याचं सर्वजण ठरवतात. सगळेच या डोहाळे जेवणात भरपूर धम्माल करताना, नाचताना दिसत आहेत. हा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना अनुजा स्वयंपाकघरात काहीतरी आणण्यासाठी जाते. तिथे तिला एक सावली दिसते. टिक्या समजून ती त्याला हाका मारत जंगलात त्याच्या पाठीपाठी जाते आणि क्षणार्धात ती आकृती मागे वळून अनुजाच्या पोटात सुरा खुपसते. अशाप्रकारे अनजाचा खून होतो. आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

वाचा : Bigg Boss 15: रिया चक्रवर्तीची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्टुडिओबाहेर दिसली अभिनेत्री

झी मराठीने इन्स्टावर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ इन्स्टावर देखील शेअर केला आहे. नेहमी गंभीर भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांचा विनोदी अंदाज देखील चाहत्यांना भलताच आवाडला आहे. सर्वजण मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील कुणी तरी येणार येणार गं... या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे एकदम दिलखुलास डान्स करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial, Zee media