मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनिकेत-मानसीचं लग्न मोडणार? 'पाहिले न मी तुला'मध्ये येतोय नवा ट्विस्ट

अनिकेत-मानसीचं लग्न मोडणार? 'पाहिले न मी तुला'मध्ये येतोय नवा ट्विस्ट

 झी मराठीवरील (Zee Marathi)  मालिका ‘पाहिले न मी तुला’(Pahile Na Mi Tula)  अल्पावधीतचं चांगली लोकप्रिय झाली आहे.

झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका ‘पाहिले न मी तुला’(Pahile Na Mi Tula) अल्पावधीतचं चांगली लोकप्रिय झाली आहे.

झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका ‘पाहिले न मी तुला’(Pahile Na Mi Tula) अल्पावधीतचं चांगली लोकप्रिय झाली आहे.

मुंबई, 12 मे-  झी मराठीवरील (Zee Marathi)  मालिका ‘पाहिले न मी तुला’(Pahile Na Mi Tula)  अल्पावधीतचं चांगली लोकप्रिय झाली आहे. याचा मोठा चाहतावर्ग सुद्धा निर्माण झाला आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये अनिकेत (Aniket)  मानसीला(Mansi)  आपलं लग्न मोडण्याचं बोलत आहे. हे पाहून चाहतेसुधा अवाक् झाले आहेत. कारण ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. आणि म्हणूनचं त्यांनी गुपचूप लग्न देखील केल आहे. मग अचानक असं काय झालं हा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

‘पाहिले न मी तुला’ मालिकेचा नुकताच नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये दाखवण्यात आलं आहे. मानसी अनिकेतला फोन करते. मात्र अनिकेत तिच्याशी थोडा अलिप्त वागतो. ते मानसीला खटकत. त्यामुळे ती तिला विचारते की नेमकं काय झालं आहे. त्यावर अनिकेत कडून काहीही उत्तर येत नाही. परत मानसी त्याला भेटण्यासाठी बोलावते. मात्र अनिकेत भेटण्यास नकार देतो.

मानसी पुन्हा घाबरते, तिला समजत नाही की अनिकेत असा का वागत आहे. त्यामुळे ती त्याला परत परत विचारते. त्यावर अनिकेत सांगतो की मानसीच्या बाबांनी त्याचा खुपचं अपमान केला आहे. त्याचं घर, त्याची नोकरी, त्याचा पगार या सर्वचं बाबतीत त्याची खिल्ली उडवली आहे. आणि ते फक्त मानसीचे बाबा होते. म्हणून मी गप्प बसल्याच अनिकेत सांगतो. यावर मानसी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र अनिकेत काहीच ऐकायच्या मनस्थित नसतो.

(हे वाचा:सातारा ते मुंबई! पाहा 'राजा-रानीची...' फेम श्रुती अत्रेचा थक्क करणारा प्रवास )

अनिकेत मानसीला भेटायला नकार देतो. यावर मानसी म्हणते आपलं नात नकोय का तुला. यावर अनिकेत म्हणतो असचं समज. आणि हे लग्नही नकोय मला, आणि फोन कट करतो. त्यांनतर मानसीला खडबडून जग येते.आणि मग नंतर समजत की हे फक्त एक वाईट स्वप्न होतं. तर असा हा प्रोमो सध्या खुपचं चर्चेत आहे.

(हे वाचा:गौतमी देशपांडेला नवरा कसा हवा?; चाहत्याच्या प्रश्नावर दिलं भन्नाट उत्तर )

‘पाहिले न मी तुला’ मध्ये मानसी आणि अनिकेत एकमेकांवर अफाट प्रेम करत असतात. मात्र अनिकेतची परिस्थिती बेताचि असल्याने मानसीचे बाबा हे मान्य करणार नाहीत. असं या दोघांना वाटतं. आणि यामुळेच ते गुपचूप लग्नसुद्धा करतात. आत्ता हे दोघे आपल्या लग्नाचं सत्य बाबांना कस सांगणार याकडे चाहत्यांच लग्न लागलं आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial