• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप; या दिवशी असणार शेवटचा एपिसोड

झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप; या दिवशी असणार शेवटचा एपिसोड

झी मराठी वरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

 • Share this:
  मुंबई 9 जुलै : झी मराठीवर (Zee Marathi) सध्या अनेक मालिका सुरू आहेत. पण काही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. मालिकेची सुरुवात अतिशय दमदार झाली होती. तर आता मालिकेला वेगळं वळण मिळालं होतं पण आता मालिका बंद होणार असल्याचं समोर येत आहे.

  ऐश्वर्याआधी संगीता बिजलानीवर होतं सलमान खानचं प्रेम; लग्नही ठरलं होतं पण..

  ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या मालिकेचं पुढील पर्व ‘अग्गबाई सूनबाई’ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. पण अवघ्या चारच महिन्यात ही मालिका गुंडाळावी लागत आहे. पहिलं पर्व हे सासूबाई वर आधारित होतं तर दुसरं पर्व हे सूनबाई वर आधारित आहे. या पर्वात आसावरी म्हणजेच शुभ्राची सासू तिला साथ देत आहे असं दाखवण्यात आलं होतं तर आता ती शुभ्राला सोहमला सोडून जाण्यासाठी ही मदत करत आहे.
  पण लवकरच मालिकेचं शूटिंग पूर्ण होणार असून मालिका बंद होणार आहे. या महिना अखेरीस मालिकेचं चित्रीकरण पूर्ण होणार आहे. तर पुढील महिन्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. मालिकेची कथा आता लवकरात लवकर पुढे सरकताना दिसत आहे. तेव्हा शेवटी नक्की काय घडणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
  याशिवाय दुसऱ्याची मालिका बंध होणार असल्याचं म्हटलं जातं होतं पण अद्याप त्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकाही शेवटच्या टप्प्यात आल्याचं कळत होतं पण आता कथा आणखी वळणं घेत आहे.
  Published by:News Digital
  First published: