मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘अग्गंबाई सूनबाई’ ठरतंय ‘माझ्या नवऱ्याची बायको 2.0’, नव्या ट्विस्टने प्रेक्षकांनी सांगितलं पुढचं स्क्रिप्ट

‘अग्गंबाई सूनबाई’ ठरतंय ‘माझ्या नवऱ्याची बायको 2.0’, नव्या ट्विस्टने प्रेक्षकांनी सांगितलं पुढचं स्क्रिप्ट

ट्विस्टने प्रेक्षक मात्र पुरते गोंधळून गेले आहेत. व या मालिकेची तुलना आता झी मराठी वरीलच अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेशी जात आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 मे : झी मराठीची (zee Marathi serial) लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सूनबाई’ने (Aggabai Sunbai) अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. मालिकेत दिवसेन दिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. तर आता शुभ्राच्या (Shubhra) आयुष्यात एक नवी व्यक्ती आली आहे.

पण या सगळ्या ट्विस्टने प्रेक्षक मात्र पुरते गोंधळून गेले आहेत. व या मालिकेची तुलना आता झी मराठी वरीलच अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेशी जात आहे. तर अनेकांनी याला ‘माझ्या बायकोचा नवरा’ अस शिर्षकही दिलें आहे. इतकच नव्हे तर काहींनी स्क्रिप्टही सांगितली आहे.

‘अग्गबाई सासुबाई’चं हे नवं पर्व ‘अग्गबाई सूनबाई’ असून या पर्वात अनेक बदल दाखवण्यात आले आहेत. सोहमला (Soham) सडेतोड उत्तर देणारी शुभ्रा आता सोम्य झाली आहे. याशिवाय ती एक मुलाची म्हणजेच बबडूची आई आहे. तर सोहम हा अतिशय धुर्त आहे. तर आता तो शुभ्राला धोखाही देत आहे. सुझेनशी त्याचं अफेअर सुरू आहे. व याविषयी आता शुभ्रालाही समजलं आहे. त्यामुळे ती मोठ्या दुःखात पडली होती.

पण आता शुभ्राच्या आयुष्यात अनुराग गोखले नावाची नवी व्यक्ती आली आहे. तर या नव्या पात्रविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. व हा अनुराग शुभ्राच्या आयुष्यात नक्की काय बदल घडवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. पण प्रेक्षकांनी मात्र आधीच मालिकेची स्क्रिप्ट तयार केली आहे.

ईदला सलमान पोहोचला लस घ्यायला; भाईजानला पाहून मुली ओरडल्या 'सल्लू लव्ह यू' , पाहा VIDEO

अनुराग हे पात्र अभिनेता चिन्मय उद्गीरकर साकारत आहे. तेव्हा आता खरचं मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेच्या सिक्वल कडे वळतेय का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

First published:

Tags: Marathi entertainment, Television show, Zee marathi serial