• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सोहमला वठणीवर आणायला पुन्हा जुनी शुभ्रा परतणार; 'अग्गंबाई सुनबाई'मध्ये नवा ट्वीस्ट

सोहमला वठणीवर आणायला पुन्हा जुनी शुभ्रा परतणार; 'अग्गंबाई सुनबाई'मध्ये नवा ट्वीस्ट

शुभ्रातील बदलामुळे आता अग्गंबाई सुनबाई (Aggabai sunbai) मालिकेला नवं वळण मिळणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 जून: झी मराठी (Zee Marathi) वरील सतत चर्चेत असणारी मालिका ‘अग्गंबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai) मध्ये लवकरच आता शुभ्राचं (Shubhra) नवं रूप पाहायला मिळणार आहे. गोड, सोज्वळ शुभ्रा आता खमकी होणार आहे. तर यामुळे सोहमला (Soham) मात्र मोठा धक्का बसणार आहे. ‘अग्गबाई सुनबाई’च्या या पर्वात मागील पर्वापेक्षा शुभ्राचं रुप हे अतिशय सौम्य दाखवण्यात आलं आहे. मागील पर्वात म्हणजेच ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये शुभ्रा ही सोहमला तोडीस तोड उत्तरं देत होती. मात्र आता ती सौम्य असून ती एका मुलाची म्हणजेच बबडूची आई आहे आणि आता ती फक्त घर आणि मूल सांभाळत आहे. तर आसावरी म्हणजेच तिची सासू मात्र आता ऑफिसचं काम सांभाळत आहे.
  पण आता शुभ्राला तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला जात असल्याचं लक्षात आलं आहे आणि वेळोवेळी समजावून देखील सोहम त्याचं सुझेनशी असलेलं अफेअर थांबवत नाही. त्यामुळे आता शुभ्राने तिच्या वेगळ्या शैलीत उत्तर द्यायचं ठरवलं आहे. ती सोहमला सुझेनशी असलेले सगळे सबंध तोडून टाकायला सांगते. पण सोहम तिला उद्धटपणे उत्तर देत असतो. तेव्हा शुभ्रा आवाज चढवत त्याला आवाज कमी कर असं म्हणते. पण शुभ्राचं हे रूप पाहून सोहमला मात्र मोठा धक्का बसतो. HBD: महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा पटकावला आहे किताब, वाचा तेजश्री प्रधानचा प्रवास काही दिवसांपूर्वी शुभ्राने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. आता ती ऑफिसमध्येही लक्ष देत आहे. दुसरीकडे मात्र सुझेन कुलकर्णींच्या घरातून शुभ्राला घालवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला शुभ्राची जागा घ्यायची आहे. त्यामुळे आता शुभ्राला तिचं हे रूप आणखी कठोर करण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता शुभ्राच्या  नव्या रुपाने मालिकेत नक्की काय वळण येणार? तसंच सोहम खरंच सुधारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published: