मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सोनाली कुलकर्णीचा 'हे तर काहीच नाय' शो लवकरच येणार भेटीला

सोनाली कुलकर्णीचा 'हे तर काहीच नाय' शो लवकरच येणार भेटीला

झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे.

झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे.

झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे.

मुंबई, 1 डिसेंबर- झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये अप्सरा फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni )काही किस्से सांगताना दिसत आहे. तिचे किस्से ऐकून तुम्ही देखील म्हणाल हे तर काही नाय...यावरून हा कार्यक्रम कॉमेडी असल्याचे लक्षात येत आहे. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ट्रोल होत आहे.

झी मराठीने अधिकृत इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, अप्सरासुद्धा किस्से सांगण्यात पुढे हाय.नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' 10 डिसेंबरपासून शुक्र ते शनि रात्री.9:30 वाजता. मात्र कार्यक्रम सुरू होण्याआधी ट्रोल होऊ लागला आहे. कमेंट करत लोकांनी नापसंदी दर्शवली आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, एकदम भंगार विनोद तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,झी खरच पांचट झालंय तर आणखी एकाने म्हटलं आहे की, हे असले जोक बगत बसण्या पेक्षा कार्टून मधील पेपा पिग बघितलेल बर ते जास्त मनोरंजन आहे. तर आणखी एकाने झी मराठीवरचं थेट निशाणा साधत म्हटलं आहे की,झी चे लेखक दुसऱ्या चॅनल साठी काम करत आहे ..अस वाटत..अशा नकारात्मक कमेंट करून नेटकऱ्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाला नापसंती दर्शवली आहे.

वाचा : 'मी होणार सुपरस्टार' चा निरोप घेताना संस्कृती बालगुडे झाली भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली...

नेमकी या कार्यक्रमाची कनेस्पट काय आहे हे अद्याप समजलेली नाही. मात्र हा कार्यक्रम विनोदी असणार येवढे तरी समोर आले आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देते हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यासोबतच झी मराठीवर किचन कल्लाकार हा नवीन कुकिंगशी संबधीत शो देखील लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले परिक्षकाच्या भूमिकेत तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे झी मराठीवर लकवर मनोरंजनाची मेजवाणी पाहण्यास मिळणार आहे एवढे नक्की.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Son, Zee marathi serial