मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी होणार सुपरस्टार' चा निरोप घेताना संस्कृती बालगुडे झाली भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली...

'मी होणार सुपरस्टार' चा निरोप घेताना संस्कृती बालगुडे झाली भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली...

 गेल्या तीन महिन्यांपासून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा  (Me Honar Superstar Grand Finale) नुकताच पार पडला.

गेल्या तीन महिन्यांपासून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा (Me Honar Superstar Grand Finale) नुकताच पार पडला.

गेल्या तीन महिन्यांपासून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा (Me Honar Superstar Grand Finale) नुकताच पार पडला.

   मुंबई, 1 डिसेंबर-    गेल्या तीन महिन्यांपासून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा   (Me Honar Superstar Grand Finale)  नुकताच पार पडला. स्टार प्रवाह (Star Pravah Dance show) या वाहिनीवरचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला होता. या शोच्या निमित्ताने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने  (Sanskruti Balgude) सुमारे दहा वर्षांनंतर मराठी टीव्हीवर कमबॅक केलं होतं. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका (Me Honar Superstar Host) म्हणून संस्कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रम संपल्यानंतर एका मोठ्या इन्स्टाग्राम   (Sanskruti Balgude Insta post)  पोस्टच्या माध्यमातून तिने चॅनलचे, टीमचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

  या शोचा जज आणि अभिनेता अंकुश चौधरी  (Ankush Chaudhari)  याच्यासोबतचा सेटवरचा एक फोटो अपलोड करून, संस्कृतीने कॅप्शनमध्ये (Sanskruti Balgude) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी हे खूप भावनिक होऊन लिहिते आहे. असं म्हणतात, की चांगला काळ अगदी भरभर निघून जातो आणि ‘मी होणार सुपरस्टार’चे (Me Honar Superstar) गेले तीन महिने हे असेच निघून गेले. हा शो संपल्याचं दुःख तर आहेच; पण या अविस्मरणीय प्रवासाचा एक छोटासा भाग होता आलं याचा आनंदही आहे. या शोच्या माध्यमातून मला माझ्यातले चांगले गुण, कला ओळखण्याची आणि दाखवण्याची संधी मिळाली, जी मी कधीच विसरू शकणार नाही,” अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

  (हे वाचा:सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट)

  या पोस्टमध्ये तिने स्टार प्रवाह (Star Pravah), सतीश राजवाडे (Satish Rajwade), फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी आणि टीममधल्या इतर सदस्यांना टॅग करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. हा प्रवास या सर्वांच्या मदतीशिवाय शक्य नव्हता, असंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ या (Me Honar Superstar Jallosh Dance cha) कार्यक्रमात ‘दी लायन्स क्रू,’ ‘विजय-चेतन,’ ‘नेहुल-समीक्षा’ आणि ‘मायनस थ्री’ या चौघांमध्ये अंतिम लढत रंगली. यात नेहुल-समीक्षा (Nehul-Samiksha in Me Honar Superstar) या जोडीने महाविजेतेपदाला गवसणी घातली. लायन्स क्रू हे उपविजेते ठरले, तर विजय-चेतन या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला. मायनस थ्री ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यात हाताला दुखापत होऊनही केलेला बेस्ट परफॉर्मन्स समीक्षा आणि राहुलला विजेतेपदापर्यंत घेऊन गेला.

  First published:
  top videos

   Tags: Marathi actress, Marathi entertainment