जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अर्धवटराव झाले 100 वर्षांचे; मराठीतल्या पहिल्या प्रयोगाचा भव्य सोहळा

अर्धवटराव झाले 100 वर्षांचे; मराठीतल्या पहिल्या प्रयोगाचा भव्य सोहळा

अर्धवटराव झाले 100 वर्षांचे; मराठीतल्या पहिल्या प्रयोगाचा भव्य सोहळा

भारतीय टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच एका बोलक्या बाहुल्याची शंभरी साजरी होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मे- अर्धवटराव म्हटलं की रमेश पाध्ये यांचा बोलका बाहुला आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हाच बाहुला आता शंभर वर्षांचा झाला आहे आणि भारतीय टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच एका बोलक्या बाहुल्याची शंभरी साजरी होत आहे. रसिकांसाठी नेहमीच हटके काहीतरी घेऊन येणाऱ्या ‘झी मराठी’ने (zee marathi )  एका खास सोहळ्याचे आयोजन केले आहे. ‘अर्धवटराव शंभर नॉट आऊट’ हा सोहळा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रामदास पाध्ये  ( ramdas padhye )  यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून काही वर्षांपूर्वी ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. झी मराठीने एक प्रोमो जारी केला असून शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी तो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये आवडाबाई अर्धवटरावसाठी उखाणा घेताना दिसत आहे. ती म्हणतेय, “ऐका हं उखाणा घेते बरं का. राव आमचे अर्धवट, राव आमचे अर्धवट, शंभरीत सुद्धा टकाटक.” या व्हिडिओला चाहत्यांनीही चांगलीच पसंती दिली आहे. तर पाध्ये यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “भारतीय टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच एका बोलक्या बाहुल्याची शंभरी साजरी होत आहे एका भव्य सोहळ्यात. बघा शब्दभ्रम व बाहुली कलेचा सगळ्यात मोठा सोहळा “अर्धवटराव शंभर नॅाट आऊट” नक्की पहा हा धमाल कार्यक्रम, रविवार, २९ मे ला संध्या. ७ वा. झी मराठीवर.” वाचा- धनुष आमचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या जोडप्याला अभिनेत्याने पाठवलं नोटीस दरम्यान, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात शब्दभ्रमकला रुजविली. त्यांनीच तयार केलेल्या ‘अर्धवटराव’ने शंभरी पूर्ण केली आहे.  तर आता झी मराठीवर रविवार, दि. २९ मेला संध्याकाळी ७ वाजता ‘अर्धवटराव शंभर नॉट आऊट’ या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हा बाहुलाही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात रमलेल्या रामदास पाध्ये यांना त्यांच्या पत्नी अपर्णा यांची साथ मिळाली. आता रामदास व अपर्णा आणि त्यांची दोन मुले सत्यजित व परीक्षित आणि सत्यजितची पत्नी व रामदास-अपर्णा यांची सून ऋतुजा हे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात