Home /News /entertainment /

VIDEO : बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवलेंचा 'होम मिनिस्टर'साठी मजेदार उखाणा

VIDEO : बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवलेंचा 'होम मिनिस्टर'साठी मजेदार उखाणा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

    मुंबई, 11 नोव्हेंबर: कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणारा झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आणि महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा (Aadesh Bandekar) अत्यंत आवडता आहे. गेली 17 वर्ष हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठिणी देऊन सन्मान आणि कौतुक करतोय. सध्या दिवाळी विशेष भागांमध्ये काही खास पाहुणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असंच एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांची पत्नी या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale)आणि त्यांच्या पत्नी होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रामदास आठवले आले, की त्यांनी काहीतरी चारोळी सादर करणं अपेक्षितच आहे. तसेच आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी असाच एक मजेदार उखाणा कार्यक्रमात घेतला. वाचा: KBC 13: रोहित शेट्टीनं बिग बींसमोर का जोडले हात? रंगली जुगलंबदी बांदेकर भावोजींनी लग्नाची तारीख विचारली असताना आठवले यांनी स्वतःच्या अंदाजात उखाणा घेतला - 'माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा'. त्यांचा हा मजेदार उखाणा ऐकून बांदेकर भाओजींसोबत सगळेच हसून लोटपोट झाले.
    त्यामुळे होम मिनिस्टरचा हा विशेष भाग पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. याशिवाय अन्य काही विविध क्षेत्रातील जोड्या देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सध्या मात्र सगळीकडे चर्चा आहे ती रामदास आठवले यांनी घेतलेल्या उखाण्याची. रामदास नेहमीच त्यांच्या मजेदार शैलीमुळे चर्चेत असतात. आता या कार्यंक्रमाच्या माध्यमातून त्यांची ही विनोदी साईड पुन्हा अनुभवता येणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Ramdas aathavale, Zee marathi serial

    पुढील बातम्या