मुंबई, 06 नोव्हेंबर: : कौन बनेगा करोडपतीचा प्रत्येक एपिसोड उत्कंठा वाढवणारा असतो. त्यातच ‘केबीसी 13’ (KBC 13) च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या फिल्डमधल्या प्रसिध्द व्यक्ती हॉट सीटवर येतात. हा गेम मग चांगलाच रंगतो. यावेळेसही शानदार शुक्रवारमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar), कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) सहभागी झाले होते. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना तर त्यांनी उत्तरं दिलीच पण त्याचबरोबर बिग बींच्या बरोबर त्यांचे फेमस डायलॉग्जही या तिघांनी सादर केले. पाच नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झालेल्या सूर्यवंशी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे तिघंजण केबीसीमध्ये सहभागी झाले होते. कॅटरीना आणि बिग बीमध्ये तर डायलॉग्जची जुगलबंदीही चांगलीच रंगली. कॅटरीनाला अमिताभच्या ‘अग्निपथ’ या सिनेमातील प्रत्येक डायलॉग पाठ आहे. त्यामुळे अर्थातच शो आणखीनच रंगला. आपल्याला ‘अग्निपथ’ (Agnipath) सिनेमातील संवाद खूप आवडतात, पण कॅटरीनाला तर या सिनेमातील प्रत्येक डायलॉग पाठ आहे असं रोहित शेट्टीनं सांगितलं. इतकंच नाही तर अनेकदा ती हे डायलॉग्ज म्हणत असते असंही तो म्हणाला. हे ऐकून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेचच कॅटरीनाला अग्निपथमधील संवाद म्हणायला सांगितलं. कॅटरीनानं त्यातील प्रसिध्द ‘विजय दीनानाथ चौहान’ हा डायलॉग म्हणून दाखवला. त्यावर टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण तुम्ही तर आमच्या पोटावर लाथ मारताय असं म्हणत अमिताभनंही कॅटरीनाचं कौतुक केलं. Bhaubeej 2021 : सोनाली कुलकुर्णी भावासोबत दिसली फुल मस्ती मूडमध्ये यानंतर कॅटरीनानं अमिताभला संवाद म्हणून दाखवण्याची विनंती केली. बिग बी नं मग आपल्या दमदार आवाजात या सिनेमातील प्रसिध्द संवाद म्हणून दाखवला. अर्थातच त्यानंतर पूर्ण सेटवर कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. या जुगलबंदीला तर चाहत्यांची दाद मिळालीच. पण अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीनं यात विशेष रंगत आणली. त्यांनी रोहित शेट्टीला मला तुमच्या पुढच्या सिनेमात घ्या अशी विनंती केली. ‘तुम्ही मला लाजवताय सर’ असं म्हणत रोहितनं बिग बीं समोर हात जोडले. आता अमिताभ खरोखरच रोहितच्या पुढच्या सिनेमात दिसणार का याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.